२०.माझं शाळेचं नक्की झालं स्वाध्याय प्रश्न उत्तरे
माझं शाळेचं नक्की झालं! 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - माझं शाळेचं नक्की झालं! इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता पाचवी विषय मराठी माझं शाळेचं नक्की झालं! स्वाध्याय - माझं शाळेचं नक्की झालं! प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) लेखिका कोठे राहत होती?
उत्तर: लेखिका कोल्हापूरमधल्या कालबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागून असलेल्या पंधरा वीस झोपड्यांमधील एका झोपडीत राहत होत्या.
(आ) झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा?
उत्तर: झोपडीच्या भिंती कच्च्या विटांनी बांधलेल्या होत्या त्यातच कौलेही गळायची त्यामुळे झोपडीच्या आतली जमीन सतत ओलसर असायची त्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा.
(इ) लेखिकेचे आईबाबा कुठे जायची तयारी करत होते?
उत्तर: लेखिकेचे आईबाबा बोरगावला जायची तयार करत होते.
(ई) दादा इमीला आईबाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता?
उत्तर: दादा इमीला शाळेत घालणार असल्याने तो इमीला आईबाबांबरोबर पाठवायला तयार नव्हता.
(उ) वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले?
उत्तर: इमीच्या शाळेत नाव
दाखल केल्यावर शाळेत सव्वा रुपया द्यायचा होता म्हणून वहिनीने लताक्काकडे पैसे का
मागितले.
प्र.२. कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
(अ) " कित दस हितं बसून खायाचं ?
उत्तर: असे आई अशोकदादाला म्हणाली
(आ) “चांगल शिकल तर कुठंतर नोकरी करील.”
उत्तर: असे अशोकदादा बाबांना म्हणाला.
(इ) “पोरांना जेवायला घालून शाळत पाठव.”
उत्तर: असे अशोकदादा सुमाला म्हणाला.
(ई) “मुलीचं पूर्ण नाव काय?”
उत्तर: असे शाळेतल्या बाई सुमावाहिनीला म्हणाल्या.
(उ) “ तुमच्याजवळ सव्वा रुपया आहे का?”
उत्तर: असे सुमा वाहिनी लताक्काला
म्हणाली.
Maz shalech nakki zal swadhyay prashna uttare - Maz shalech nakki zal question answer - Maz shalech nakki zal prashn uttar - 5th standard Marathi question answers
प्र.३. खालील शब्दांमध्ये
लपलेले शब्द शोधा
उदा . , झोपायला झोपा , पाय , पाला ,
झोला .
१. आजकाल
उत्तर: आज, काल.
२. घालताना
उत्तर: घाल , लता, ताल, नाल.
३. माझ्याजवळ
उत्तर: माझ्या, जवळ, माज, माळ, माव, जमा, मावळ.
४. आठवण
उत्तर: आठ, आव, आण, आठव.
प्र. ४.'फुटकीतुटकी ' यासारखे पाठात आलेले जोडशब्द लिहा .
उत्तर:
- डोस्कबिस्क
- बारीकसारीक
- आजकाल
- मायलेकर
प्र.५. धाड्कन यांसारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर:
- काड्कन
- खाड्कन
- फाड्कन
- ताड्कन
हे सुद्धा पहा: