२६.पाण्याची गोष्ट स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता पाचवी विषय मराठी पाण्याची गोष्ट स्वाध्याय / पाण्याची गोष्ट प्रश्न उत्तरे / ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाण्याची गोष्ट स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. / Panyachi gosht swadhyay prashna uttare
स्वाध्याय
प्र.१. दोन-तीन वाक्यांत
उत्तरे लिहा.
(अ)
रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार
होता?
उत्तर: मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असल्याने तिला
पाणी भरायचे होते त्यामुळे रत्नाला शाळेत यायला उशीर होणार होता.
(आ)
या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या
दिवशी पाणी येते?
उत्तर: या संवादातील मुलांकडे मंगळवार, रविवार तर
कोणाकडे सोमवारी पाणी येते.
(इ) कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती
तयारी करतात?
उत्तर: कौशाच्या घरी रविवारी पाणी येत असल्याने पाणी भरण्याची
तयारी शनिवारी करावी लागते. सगळे हंडे, कळश्या, तपेल्या, बादल्या डबे नेऊन रांगेत ठेवले
जातात. आणि सकाळी नळाजवळ थांबावे लागते.
(ई) पाऊस कमी पडल्यामुळे काय होते?
उत्तर: पाऊस कमी पडल्याने कोरडा दुष्काळ पडतो.
पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर नाहीच पण प्यायला सुद्धा पाणी मिळेनासे
होते. अन्नधान्य, जनावरांचा चार, वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. गावोगावी
पाणीपुरवठा करावा लागतो.
(उ) जमिनीला पाण्याची ‘बँक' असे का म्हटले आहे?
उत्तर: पावसाचे पाणी जमिनीत जिरते आणि साठून राहते.
जमिनीत जीरलेले पाणी आपल्याला हव्या त्या वेळी विहिरीच्या माध्यमातून, तसेच कूपनालीकेच्या
माध्यामतून उपलब्ध होते. पावसाचे पाणी हे जमिनीमध्ये साठून राहते म्हणून जमिनीला
पाण्याची बँक असे म्हटले आहे.
प्र.२. ' दुष्काळ ' या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा.
उत्तर: दुष्काळ
ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असे दुष्काळाचे दोन
प्रकार पडतात. एखाद्या वर्षी अगदी कमी पाऊस पडला तर तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर नाहीच
पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही.अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो. जनावरांना
चारा मिळत नाही. गावांना पाण्याच्या गाडीने पाणी पुरवण्याची वेळ येते. याउलट
प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने ओला दुष्काळ पडतो.नद्या, नाल्यांना पूर येतो,
शेते, घरे, रस्ते पाण्याखाली जातात आणि नष्ट होतात. अन्नधान्याची कमतरता
भासते.दोन्ही प्रकारच्या दुष्काळात केवळ नुकसानच होते.
Panyachi gosht swadhyay prashna uttare - Panyahchi gosht question answer - Panyachi gosht prashn uttar - 5th standard Marathi question answers
प्र.३. निरीक्षण करा, सांगा व लिहा.
(अ) तुमच्या घरी पाणी कसे येते? किती वेळा? पाणी भरण्याचे काम कोण करते?
उत्तर: आमच्या घरात येणारे पाणी हे सार्वजनिक पाणीपुरवठा
योजने द्वारे येते. पाणी दिवसातून एकदाच येते. सकाळी ७.३० ते ९.३० दोन तास पाणीपुरवठा
केला जातो. आमच्या घरी पाणी भरण्याचे काम आई, ताई आणि मी करतो.
(आ)
तुम्ही अंघोळीसाठी दररोज अंदाजे किती
पाणी वापरता? त्यात कशी बचत करता येईल?
उत्तर: मी अंघोळीला दररोज अंदाजे १८ लिटर पाणी वापरतो.
अंघोळीला शॉवर चा वापर मी टाळला तर पाण्याची काही प्रमाणात बचत करता येईल.
(इ) घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ
नये,
म्हणून काय करता येईल, ते चर्चा करून लिहा.
१.
शाळा.
उत्तर: शाळेत हात धुताना
पाण्याचा नळ सतत चालू ठेऊ नये.
२. जलतरण तलाव.
उत्तर: जलतरण तलावातील पाण्याचे
शुद्धीकरण करून त्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी केला जावू शकतो.
३.
शेती.
उत्तर: शेतीला पाणी देताना
ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन पद्धतीचा
अवलंब करू शकतो.
४.
सार्वजनिक नळ.
उत्तर: आपल्याला हव्या तितकाच
वेळ पायाचा नळ चालू ठेवावा. विनाकारण नळ चालू ठेवू नये.
५.
हॉटेल
उत्तर: हॉटेल मध्ये ग्राहकाला
पाणी देताना पूर्ण ग्लास भरून न देता थोडे कमी द्यावे . ग्राहक त्याच्या गरजेनुसार
अधिक पाणी घेऊ शकतो.
(ई) पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहांचे अर्थ जाणून
घ्या . ते वापरून वाक्ये बनवा.
१. पाणी जोखणे.अर्थ: एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे.
वाक्य : राजू वर्गात खरे बोलतोय की खोटे याचे
गुरुजींनी पाणी जोखले.
२. पाणी पाजणे-अर्थ: पराभूत
करणे.
वाक्य : लांब उडीच्या
स्पर्धेत सार्थक ने सर्व खेळाडूंना पाणी पाजले.
3. डोळ्यांत पाणी आणणे-अर्थ: रडू येणे.
वाक्य: डोळ्यांत पाणी आणून सखा दादाने मुलीला सासरी
जाण्यासाठी निरोप दिला.
4. पाणी पडणे-अर्थ: वाया जाणे.
वाक्य: चोरी करून पाळणाऱ्या
चोरांना पोलिसांनी रस्त्यातच पकडल्याने चोरांच्या मेहनतीवर पाणी पडले.
5.पालथ्या घड्यावर पाणी-अर्थ: तीच तीच
चूक पुन्हा करणे.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत
नाही ते सांगा.
१) उठतो, बसतो,
हसतो, पळतो, मुलगा.
उत्तर: मुलगा (इतर शब्द क्रियापदे आहेत)
२) तो, तुला,
मुलीला, त्याने आम्ही.
उत्तर: मुलीला ( इतर शब्द सर्वनामे आहेत)
३) सुंदर, फूल, टवटवीत, कोमेजलेले, हिरवेगार.
उत्तर: फूल (इतर शब्द विशेषणे आहेत)
४) रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर,
बीड.
उत्तर: जिल्हा ( इतर शब्द विशेषनाम आहे)
५) पालापाचोळा, सगेसोयरे, दिवसरात्र, दगडधोंडे.
उत्तर: सगेसोयरे ( इतर शब्द निर्जीव आहेत)
६) सौंदर्य, शांतता, शहाणपणा, गोड, श्रीमंती.
उत्तर: गोड (
गोड हे विशेषण आहे)
७) नदया, झाड, फुले, पाने, फळे.
उत्तर: नद्या ( इतर शब्द झाडाशी संबंधित आहेत)
८) इमारत, वाडा,
खोली, खिडकी, बाग.
उत्तर: बाग (
इतर शब्द इमारतीशी संबधित आहेत)
९) खाल्ला, खेळते, लिहिले, वाचले, पाहिले.
उत्तर: खेळते ( इतर सर्व क्रियापदे भूतकाळातील आहेत.)
१०) जाईल, येईल,
बोलेल, आला, लिहीन.
उत्तर: आला ( इतर क्रियापदे भविष्यकालीन आहेत)
११) प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार,
गैरसमज.
उत्तर: