१३. सण एक दिन स्वाध्याय प्रश्न उत्तरे स्वाध्याय
सण एक दिन स्वाध्याय प्रश्न उत्तरे - 5वी मराठी पाठ १२ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - सण एक दिन इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता पाचवी विषय मराठी सण एक दिन स्वाध्याय - -सण एक दिन प्रश्न उत्तरे - ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे सण एक दिन स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.
स्वाध्याय
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ)
बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे?
उत्तर: बैलांच्या कपाळावर बाशिंग बांधले आहे.
(आ) अवखळ कोण आहे?
उत्तर: तरुण बैल अवखळ आहे.
(इ)बैलांच्या गळ्यात काय आहे.
उत्तर: बैलांच्या गळ्यात घुंगुरांच्या माळा आहेत.
(ई)झुलीखाली काय असेल असे कवीला वाटते?
उत्तर: झुलीखाली चाबकांचे वळ असतील असे कवीला वाटते.
(उ)वर्षभर बैल काय करतात?
उत्तर: वर्षभर बैल मालकासाठी ओझी वाहतात.
प्र.२.दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ)
या सणाला बैलांना कसे सजवतात?
उत्तर: या सणाला बैलांची शिंगे विविध रंगांनी रंगली
जातात. त्यांच्या कपाळावर बाशिंगे बांधली जातात. पाठीवर झुली चढवतात. गळ्यांत
घुंघुरमाळा घातल्या जातात.अशा प्रकारे बैलांना या सणाला सजवतात.
(आ)
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे
मिरवत नेतात?
उत्तर: बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवले जाते .
वाद्य वाजवत लेझीम खेळत बैलांना मिरवत नेतात.
(इ)
बैलाला वेसण का घातलेली असते?
उत्तर: बैलाने मान झटकू नये. त्याने योग्य मार्गाने
जावे . बैलावर धान्याचा ताबा राहावा यासाठी बैलाला वेसन घातलेली असते.
(ई) 'सण एक दिन' असे कवी का म्हणतो?
उत्तर: वर्षभर राबणाऱ्या बैलाचे फक्त वर्षातून एक दिवस
बैलपोळ्याच्या दिवशी कौतुक केले जाते. बाकी वर्षाचे इतर दिवस चाबकाचे फटके सोसत
धान्यासाठी राबराब राबावे लागते. त्यांना ओझी वाहावी लागतात. म्हणून ‘सण एक दिन’
असे कवी म्हणतात.
San ek din swadhyay prashna uttare - San ek din question answer - San ek din prashn uttar - 5th standard Marathi question answers
प्र . ४. जोड्या जुळवा .
' अ ' गट |
(उत्तरे) |
' ब ' गट |
(अ)
रंगवलेली |
शिंगे
|
(१)
गोंडे |
(आ)
शोभिवंत |
गोंडे
|
(२)
खोंडे |
(इ)
दुलदुलणारी |
वाशिंडे
|
(३)
शिंगे |
(ई)
अवखळ |
खोंडे
|
(४)
वशिंडे |
प्र.३. खालील सणांच्या सजावटीला कोणकोणत्या वस्तू
वापरतात?
(अ) गणेशोत्सव
उत्तर: गणेशोत्सव सणाला सजावटीसाठी विविध रंगांचे दिवे
लावले जातात, सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात, गणेश मूर्तीच्या स्थापनेसाठी
देवघर सजवले जाते.
(आ) दिवाळी
उत्तर: विजेच्या दिव्यांची रोषणाई केली जाते, तेलाचे
दिवे अंगणात लावले जातात. दिवाळीच्या दिवसांत रांगोळ्या काढल्या जातात, घरासमोर
आकाशकंदील लावला जातो.
(इ) ख्रिसमस
उत्तर: ख्रिसमस च्या झाडावर दिव्यांची रोषणाई केली
जाते. चांदणीसारखा चमकदार दिवा लावला जातो.
प्र.५. बैलपोळ्याच्या सणाचा दिवस संपल्यावर बैलाला काय
वाटत असेल, याविषयी कल्पना करून थोडक्यात लिहा.
उत्तर:
बैलपोळ्याच्या
दिवशी मी खूप खुश असतो कारण त्या दिवशी माझे खूप कौतुक केले जाते. वर्षातून येणारा
तो एक दिवस माझा सगळा क्षीण नाहीसा करून टाकतो. परंतु बैलपोळ्याचा दिवस संपल्यावर
पुन्हा माझ्या रोजच्या दिनक्रमाला सुरुवात होते. माझ्या धान्यासाठी शेतामध्ये राब
राब राबावे लागते. वेळ प्रसंगी चाबकाचे फटके सुद्धा सहन करावे लागतात. जोखडाचे वजन
झेलून अंग कितीही दुखत असले तरीही धन्यासाठी खूप कष्ट करावे लागतत. पण मी आत्ता
त्यातच खूप खुश असतो.