14. आतां उजाडेल! स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता सहावी मराठी पाठ १४ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - आतां उजाडेल प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी आतां उजाडेल प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी आतां उजाडेल स्वाध्याय - आतां उजाडेल स्वाध्याय इयत्ता सहावी.
स्वाध्याय
प्र. १. दोन-तीन ओळींत उत्तरे लिहा.
(अ) किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते?
उत्तर: आत्ता पहाट झाल्यानंतर जेव्हा गडद अंधार ओसरेल तेव्हा उगवत्या किरणांची कलाबूत मोहरेल असे कवीला वाटते.
(आ) आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहेत?
उत्तर: आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत.
(इ) पानांवर दहिंवर केव्हा हसेल?
उत्तर: जेव्हा मुग्ध हिरवेपणात वर हसेल, तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहींवर हसेल.
(ई) गारवा कशामुळे थरारेल?
उत्तर: सकाळ होताच जेव्हा पारिजात आपल्या फुलांची उधळण करील तेव्हा त्या फुलांच्या सुगंधामामुळे गारवा ठरलेल.
(उ) प्रकाशाचे महादान कोणते?
उत्तर: आता उजाडल्यामुळे दाहीदिशा उजळतील. सगळीकडे प्रकाश पसरेल हेच प्रकाशाचे महादान असेल.
(ऊ) उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे?
उत्तर: उजाडल्यामुळे अंधाराचे
भय संपणार आहे.
प्र. २. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते?
उत्तर: उजाडल्यामुळे रात्रीचा कला अंधार ओसरून जाईल आणि सगळीकडे किरणांची कलाबूत मोहरेल, आपल्या मृदू मधुर गळ्यांत पक्षी गाऊ लागतील, गहिवरलेल्या प्रकाशात दहिवर मिसळेल. पानापानांत वारा हसेल, उजाडताच पारिजातक फुलांची उधळण करेल, दाही दिशा प्रकाशमान होऊन जातील , अंधाराची भीती नाहीशी होईल , इत्यादी घटना उजाडल्यामुळे निसर्गात होतील असे कवीला वाटते.
(आ) ‘पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल’ या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा.
उत्तर: रात्रीच्या खिन्न अंधारामुळे भीती वाटते. पण सकाळी उजाडल्याने सारा आधान ओसरून दाही दिशांमध्ये प्रकाश परसतो आणि अंधाराची भीती नाहीशी होते. म्हणून प्रकाशाचे वरदान हे आपल्यासाठी एक आशीर्वादच आहे.
Aatta ujadel eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Atta ujadelswadhyay Atta ujadel - Atta ujadel swadhyay path prshn uttare
(अ) खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार.
उत्तर: खिन्न अंधार म्हणजे उदासवाणे दुखीः मन होय. पहाटेच्या सूर्य किरणांनी हा सगळा गडद अंधार ओसरून जाईल आणि मनात नवी उमेद जागृत होईल.
(आ)
आनंदात पारिजात उधळील बरसात.
उत्तर: सकाळी सकाळी पारिजातकाच्या झाडावर सुगंधी फुले उमलतात. पारिजातकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडतो. जणू काही पहाटेच्या आनंदात पारिजातक फुलांचा वर्षाव करते.
(इ) मृदु गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल.
उत्तर: पाहाट होताच पाखरे आनंदाने किलबिल करू लागतात. ती त्यांच्या मृदू मधुर गळ्यांतून जणू गाणेच गातात असे कवीला वाटते.
(ई) प्रकाशाचे महादान कणाकणांत स्फुरेल.
उत्तर: पाहाट झाल्यावर सूर्याची किरणे दाही दिशांत पसरून साऱ्या दिशा प्रकाशमान करतात. प्रकाश हे एक सूर्याने दिलेले एक मोठे दान आहे.
प्र. ४. ‘आतां उजाडेल !’ या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. ‘आता पाऊस पडेल!’ व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या चार ओळी लिहा.
आतां उजाडेल!
खिन्न आंधळा अंधार
आतां ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत
मोहरेल
आतां उजाडेल!
उत्तर:
आता पाऊस पडेल!
सारी
सृष्टी चिंब भिजेल
रानीवनी
मोरांचा
रंगीबेरंगी
पिसारा फुलेल
प्र. ५. या कवितेत शब्दांना
लावलेली विशेषणे लिहा.
(अ) शुभ्र आनंदाच्या लाटा
(आ) निळे आकाश
(इ) मृदू गळ्यांत
(ई) गोड,
कोवळा गारवा