16.सफर मेट्रोची स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी | Safar metrochi swadhyay prashn uttare 6vi marathi question answers

इयत्ता सहावी विषय मराठी सफर मेट्रोची स्वाध्याय सफर मेट्रोची स्वाध्याय इयत्ता सहावी. Safar metrochi eyatta sahavi swadhyay prshn हावी मराठी पाठ १६
Admin

16.सफर मेट्रोची स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता सहावी मराठी पाठ १६ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - सफर मेट्रोची  प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी सफर मेट्रोची  प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी सफर मेट्रोची  स्वाध्याय

स्वाध्याय

 

प्र. १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ)        मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते?

उत्तर: मेट्रो पायलट होण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअर व्हावे लागते. अवघड चाचणी परीक्षा पास व्हावे लगते. चाचणी परीक्षा पास झाल्यावर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते. या सर्व चाचण्या पास झाल्यानंतर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या टप्प्यांतून मेट्रो पायलट होण्यासाठी जावे लागते.


(आ)     पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती?

उत्तर: पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर असल्याने तिच्या मनात थोडी धाकधूक होती. सर्वांना व्यवस्थित घेऊन जैन की नाही अशी तिला काळजी वाटत होती. पण एकदातिने मेट्रो चालवायला सुरुवात केल्यावर मनातील सर्व भीती नाहीशी झाली.आणि ती बिनधास्तपणे मेट्रो चालवू लागली.


(इ)            मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता?

उत्तर: मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता .  कारण मेट्रो चे उद्घाटन झाल्यानंतर पहिली मेट्रो चालवण्या ची जबाबदारी रुपलीवर होती. पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी, मिडिया तसेच रुपालीच्या घरचे सर्व मंगळी त्या ठिकाणी उपस्थित होती. या सर्वांना घेऊन जायची जबादारी रुपालीवर होती.

 


प्र. २. मेट्रोबाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा.


(अ)        केबिन

उत्तर: केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते. केबिन मध्ये मेट्रो चालवण्याची संपूर्ण यंत्रणा बसवलेली असते.


(आ)     कॅमेरे

उत्तर: मेट्रोच्या डब्यात आणि स्टेशनवर सी.सी.टीव्ही कॅमेरे लावलेले असतात. हे कॅमेरे प्रवाश्यांचा सुरक्षिततेसाठी असतात.


(इ)            जिने

उत्तर: मेट्रोच्या दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी जिने असतात.


(ई)            मेट्रोचा प्रवास

उत्तर: मेट्रोचा प्रवास हा आनंददायी आणि सुखकारक आहे. पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो, तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भासतो.


(उ)           दरवाजे

उत्तर: स्टेशन आल्यावर दरवाजे आपोआप उघडतात मात्र आपोआप बंद होत नाहीत. मेट्रोचे दरवाजे पायलट ला बंद करावे लगतात. मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रीपेड कार्ड दिले जाते किंवा टोकन दिले जाते हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडतात


(ऊ)         प्रवासी संख्या

उत्तर: मेट्रोमध्ये एकावेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात.


(ए) इंजिन

उत्तर: मेट्रोच्या दोन्ही बाजूला इंजिन असते. हे इंजिन विजेवर चालते. त्यातील तंत्रज्ञान आधुनिक असते. इंजिन पायलटच्या केबिन मध्ये असते.


(ऐ) तिकीट

उत्तर: मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रीपेड कार्ड दिले जाते किंवा टोकन दिले जाते हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडतात. या प्रीपेड कार्ड मधले पैसे संपल्यावर ते पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचे असते.

 

प्र. ३. खालील आकृती पूर्ण करा.

मेट्रोची वैशिष्ट्ये

उत्तर:

अत्याधुनिक यंत्रणा

स्टेनलेसस्टील चे डबे

वातानुकुलीत डबे

सी.सी.टीव्ही. कॅमेरे

दरवाजे अपोआप उघडतात.

 

Safar metrochi  eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Safar metrochi
swadhyay safar metorchi - safar metrochi swadhyay path prshn uttare

प्र. ४. मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा.

उत्तर:

मी मेट्रो बोलत आहे.

        मी माझ्या बाबांबरोबर मेट्रोने प्रवास करत असताना अचानक कोणी तरी मला हाक मारल्याचा आवाज आला वळून पहिले तर कोणी नव्हते. तेवढ्यात पुन्हा आवाज आला तेव्हा काय आश्चर्य चक्क मेट्रोच माझ्याशी बोलत होती. ती पुढे बोलू लागली.

        मित्रा तुझे खूप खूप स्वागत आहे. आधुनिक जगाच्या आधुनिक ट्रेन मध्ये तू प्रवास करत आहेस. माझा प्रवास हा सर्वांना हवा हवासा वाटतो. मी सर्वांना आरामदायी सेवा देते. इतर रेल्वे गाड्यांपेक्षा माझा वेग हा खूप असतो. आणि मी कोणतेही प्रदूषण करीत नाही कारण मी इंधन म्हणून विजेचा वापर करते. मला बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. माझे दरवाजे स्टेशन आल्यावर आपोआप उघडतात. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी स्टेशनवर , सी.सी.टीव्ही लावले गेले आहेत. आधुनिक तिकीट प्रक्रियेमुळे माझ्यातून प्रवास करताना कोणीच विनातिकीट प्रवास करू शकत नाही. आहे की नाही गंमत! माझ्यामुळे प्रवाश्यांचा विनाकारण वाया जाणारा प्रवासाचा वेळ वाचतो शिवाय त्यांचा प्रवास आनादायी आणि सुखकारक होतो.

        मेट्रो माझ्याशी बोलत असतानाचा आमचे स्टेशन आले दरवाजे आपोआप उघडले आणि आम्ही मेट्रोचा निरोप घेतला.

 

प्र. ५. तुम्हांला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल? का ते सांगा.

उत्तर: मला मोठे झाल्यावर बस चालवायला खूप आवडेल. कारण मी लहान पानापासूनच बस ने प्रवास करीत असल्याने मला तेव्हापासूनच बस चालवण्याचे खूप आकर्षण आहे.  बस घेऊन प्रत्येक प्रवाश्याला त्याच्या गावी नेऊन सोडणे आणि गावातील प्रवाश्यांना शहरात घेऊन येणे. मला खूप आवडेल.

 

प्र. ६. तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस.टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्‍न तयार करा

उत्तर: रिक्षाचालक प्रश्न

१)   तुम्ही रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतलेत?

२)   रिक्षा चावण्यासाठी कोण कोणत्या पायऱ्या पार कराव्या लागतात?

३)   रिक्षा चावण्यासाठी कोणत्या इंधनाची आवश्यकता असते?

४)   तुम्ही रिक्षा किती वर्षांपासून चालवता?

५)   तुम्हाला रिक्षा चालवताना आलेला अनुभव सांगा .


एस.टी. चालक प्रश्नावली

१)     तुम्ही एस.टी.  चालवण्याचे प्रशिक्षण कुठे घेतलेत? 

२)     एस.टी.  चावण्यासाठी कोण कोणत्या परीक्षा पास कराव्या लागतात?

३)     एस.टी.  चावण्यासाठी कोणत्या इंधनाची आवश्यकता असते?

४)     तुम्ही एस.टी.  किती वर्षांपासून चालवता?

५)     एस.टी. मधून एकाचवेळी किती प्रवासी प्रवास करतात?



(अ)        वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा.

उत्तर: झुक झुक झुक झुक अगीनगाडी

धुरांच्या रेघा हवेत काढी

पळती झाडे पाहूया

मामाच्या गावाला जाऊया…

मामाचा गाव मोठा

सोन्याचांदीच्या पेठा

शोभा पाहुन येऊया

मामाच्या गावाला जाऊया…


(आ)     महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रांत नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या  क्षेत्रांची यादी करा.

उत्तर: वैमानिक , अंतराळवीर, मेट्रो पायलट, ट्रेन पायलट, बस ड्राईव्हर, इंजिनिअर, वैज्ञानिक.

 

·                   पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा.

( खालील तक्ता पाहण्यासाठी मोबाईल TILT करा.)

वाक्य

कर्ता

कर्म

क्रियापद

१. तेजवंत फुटबॉल खेळतो.

तेजवंत

फुटबॉल

खेळतो

२. शिक्षक कविता गातात.

शिक्षक

कविता

गातात

३. निशा निबंध लिहिते.

निशा

निबंध

लिहिते.

४. जोसेफ रस्त्यात पडला.

जोसेफ

-

पडला

५. दादा घरी आला.

दादा

-

आला

६. सुरेश उद्यापुण्याला जाईल.

सुरेश

-

जाईल

 

 हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.



✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.