18. पर्यावरण आणि आपण इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Paryavarn aani aapan swadhyay prashn uttare 5

पर्यावरण आणि आपण. प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Paryavarn aani aapan questions and answers५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्या
Admin

१८. पर्यावरण आणि आपण स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरण आणि आपण. स्वाध्याय - पर्यावरण आणि आपण. प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय


१.    काय करावे बरे ?
 नदी , तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे .

उत्तर: नदी,तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली असेल तर ती वेळोवेळी काढून टाकावी.  जलपर्णी मुळे पाण्यातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते त्यामुळे त्या जलाशयात असणाऱ्या जलचर प्राण्यांना ऑक्सिजन ची कमतरता भासते. तसेच जलपर्णी मुळे सूर्यप्रकाश जलचर प्राण्यांपर्यंत पोहचत नाही. म्हणून ही जलपर्णी ची चादर वेळोवेळी काढून टाकवी.


५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरण आणि आपण. स्वाध्याय पर्यावरण आणि आपण. प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Paryavarn aani aapan questions and answers Paryavarn aani aapan  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 


२.    जरा डोके चालवा .

एखादया ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल ?

उत्तर: घार हा पक्षी छोट्या प्राण्यांची शिकार करून खातो. जर एखाद्या ठिकाणातील घारी राहिल्या नाही तर त्या ठिकाणी छोटे पक्षी, उंदीर, यांसारख्या प्राण्यांची संख्या बेसुमार वाढेल. आणि घारीवर अन्नासाठी अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत घट होईल.


३.    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

(अ)        स्थलांतर म्हणजे काय ?

उत्तर: प्राणी, पक्षी हवामान बदलानुसार वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायम स्वरूपी जातात. यालाच स्थलांतर असे म्हणतात.


(आ)     पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा .

उत्तर: पक्षी घरट्यात अंडी घालालात. काही काळासाठी ही अंडी घरट्यात उबवली जातात. अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्यांची काळजी घेतली  जाते. पिल्लू मोठे होऊन ते उडू लागले की ते घरट्यातून उडून जाते.


(इ)            हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा .

उत्तर: १)उद्योगधंदे, कारखाने यांतून बाहेर पडणारा धूर

२)वाहनातून बाहेर पडणारा धूर.

 

( ई ) जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो ?

उत्तर: जमिनीवरील उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण शेती, उद्योगधंदे, जळावू लाकूड , आयुर्वेदिक औषधे , उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल यासाठी उपलब्ध वनक्षेत्राचा आपण वापर करतो.

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.


४.    कारणे लिहा .


(अ)        जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे .

उत्तर: जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे कारण जर जैविकघटकांपैकी एक जरी घटक कमी झाला तर त्याचा परिणाम त्याच्या इतर घटकांशी संबंधांवर परिणाम होऊन निसर्गाचा समतोल बिघडेल याचा परिणाम मानवावरही होईल. म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे.


Parisar abhyas bhag 1 swadhya - Paryavarn aani aapan questions and answers - Paryavarn aani aapan  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay


(आ)     वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे .

उत्तर: वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे कारण,

१)   मानवाने बेसुमार केलेल्या जंगलतोडीमुळे पर्यावरणातील विविध सजीवांचे निवारे नष्ट झाले.

२)   जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सर्व गरजा या जंगलातच पूर्ण होतात परंतु मानवच्या हस्तक्षेपामुळे ही जंगलेच नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले.

३)   वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांच्या प्रजातींवर गंभीर परिणाम दिसून  आला

 

 ५. चूक की बरोबर ते लिहा .

(अ) अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो .

उत्तर: बरोबर

 

(इ)     जैवविविधता जपणे आवश्यक आहे .

उत्तर: बरोबर

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


६ . खाली दिलेल्या वस्तू / पदार्थ / घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा . माती , घोडा , दगड , जलपर्णी , पुस्तक , सूर्यप्रकाश , डॉल्फीन, पेन , खुर्ची , पाणी , कापूस , टेबल , झाडे , वीट .

उत्तर:

मानव निर्मित

निसर्ग निर्मित

पुस्तक

माती

पेन

घोडा

खुर्ची

दगड

टेबल

जलपर्णी

वीट

सूर्यप्रकाश

 

डॉल्फीन

 

पाणी

 

कापूस

 

झाडे

 

 

स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.