१९. अन्न घटक स्वाध्याय प्रश्न उत्तरे
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न घटक स्वाध्याय - अन्न घटक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय.
1.काय करावे बरे ?शरीराला पुरेशी प्रथिने
मिळायला हवीत .
उत्तर: शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवी असल्यास खालील गोष्टींचा आहारात समावेश कराव्यात.
1) विविध कडधान्ये , डाळी , शेगदाणे, दुध व दही, खवा यांसारखे दुधाचे पदार्थ.
2) अंडी, मांस व मांस यांतून जास्त प्रमाणत प्रथिने आपल्या शरीराला मिळते. प्रथिने पुरेश्या प्रमाणात मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी कडधान्ये तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा.
2. जरा डोके चालवा.
रोज दूध प्यायला का सांगतात .
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
3.खालील प्रत्येक
अन्नघटकाचे दोन स्रोत सांगा ?
(अ) खनिजे (आ) प्रथिने (इ)
पिष्टमय पदार्थ
उत्तर:
(अ)
खनिजे : विविध फळे, पालेभाज्या, मोड
आलेली कडधान्ये.
(आ)
प्रथिने : मांस, अंडी, दुध, मासे.
(इ)
पिष्टमय पदार्थ : बटाटा, धान्यांची
पीठे, साबुदाणा, गहू, तांदूळ .
Parisar abhyas bhag 1 swadhya - Annaghatak questions and answers - Annaghatak prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
4.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .
(अ) ……………..मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.
उत्तर: जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते
(आ) कॅल्शिअममुळे आपली हाडे ……………….होतात .
उत्तर: कॅल्शिअममुळे आपली हाडे मजबूत होतात .
(इ) गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या ………………असतात.
उत्तर: गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात.
(ई) सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला ………………आहार म्हणतात .
उत्तर: सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात .
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
5. प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो ?
उत्तर: पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेमुळे शरीराला उर्जा मिळते. ही उर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या उर्जेचा उपयोग होतो.
(आ) तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते ?
उत्तर: धान्याचा कोंडा, फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत.
(इ) कर्बोदके कशाला म्हणतात ?
उत्तर: पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात.
(ई) कुपोषण कशाला म्हणतात ?
उत्तर: शरीराचे नित पोषण
होण्यासाठी आहारात सर्व अन्नघटक पुरेश्या व योग्य प्रमाणत मिळणे आवश्यक असते.
एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्नघटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नित पोषण
होत नाही. याला कुपोषण असे म्हणतात.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
6. जोड्या जुळवा .
' अ ' गट |
' ब ' गट(उत्तरे) |
(१) स्निग्ध पदार्थ |
(आ)
तेल |
(२) प्रथिने |
(ई) कडधान्ये |
(३) जीवनसत्त्वे |
(इ) धान्याचा कोंडा |
(४) खनिजे |
(उ) लोह |
(५) पिष्टमय पदार्थ |
(अ)
ज्वारी |
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *