19. अन्न घटक इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Annaghatak swadhyay prashn uttare 5vi

पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न घटक स्वाध्याय अन्न घटक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Annaghatak questions and answers
Admin

१९. अन्न घटक स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न घटक स्वाध्याय - अन्न घटक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय.

1.काय करावे बरे ?
शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत .

उत्तर: शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवी असल्यास खालील गोष्टींचा आहारात समावेश कराव्यात.

1)    विविध कडधान्ये , डाळी , शेगदाणे, दुध व दही, खवा यांसारखे दुधाचे पदार्थ.

2)   अंडी, मांस व मांस यांतून जास्त प्रमाणत प्रथिने आपल्या शरीराला मिळते. प्रथिने पुरेश्या प्रमाणात मिळवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी कडधान्ये तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा.

 
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न घटक स्वाध्याय  अन्न घटक प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी  Parisar abhyas bhag 1 swadhya  Annaghatak questions and answers Annaghatak  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1  5vi swadhyay


2. जरा डोके चालवा.

रोज दूध प्यायला का सांगतात .

उत्तर:दुधामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात त्यांच्यापासून शरीराला उर्जा मिळते.
1)    दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप हे स्निग्ध पदार्थ दुधापासून मिळतात.
2)   आपल्या शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेस शरीराला छोटी-मोठी इजा होते. त्याची दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिनेसुद्धा दुधातून मिळतात.
3)   दुधाने शरीराची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो म्हणून रोज दुध प्यायला सांगतात.

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

 

3.खालील प्रत्येक अन्नघटकाचे दोन स्रोत सांगा ?

(अ) खनिजे (आ) प्रथिने (इ) पिष्टमय पदार्थ

उत्तर:

(अ)        खनिजे : विविध फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये.

(आ)     प्रथिने : मांस, अंडी, दुध, मासे.

(इ)            पिष्टमय पदार्थ : बटाटा, धान्यांची पीठे, साबुदाणा, गहू, तांदूळ .

 

Parisar abhyas bhag 1 swadhya - Annaghatak questions and answers - Annaghatak  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay

4.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .


(अ)        ……………..मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.

उत्तर: जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते


(आ)     कॅल्शिअममुळे आपली हाडे ……………….होतात .

उत्तर: कॅल्शिअममुळे आपली हाडे मजबूत होतात .


(इ)     गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या ………………असतात.

उत्तर: गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात.


(ई)   सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला ………………आहार म्हणतात .

उत्तर: सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात .


 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.


5. प्रश्नांची उत्तरे लिहा.


(अ)        पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो ?

उत्तर: पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेमुळे शरीराला उर्जा मिळते. ही उर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या उर्जेचा उपयोग होतो.


(आ)     तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते ?

उत्तर: धान्याचा कोंडा, फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत.


(इ)       कर्बोदके कशाला म्हणतात ?

उत्तर: पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात.


(ई)     कुपोषण कशाला म्हणतात ?

उत्तर:  शरीराचे नित पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्नघटक पुरेश्या व योग्य प्रमाणत मिळणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्नघटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नित पोषण होत नाही. याला कुपोषण असे म्हणतात.

 

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 

6. जोड्या जुळवा .

 

' ' गट

' ' गट(उत्तरे)

(१) स्निग्ध पदार्थ

 (आ) तेल

(२) प्रथिने

(ई) कडधान्ये

(३) जीवनसत्त्वे

(इ) धान्याचा कोंडा

(४) खनिजे

(उ) लोह

(५) पिष्टमय पदार्थ

 (अ) ज्वारी

 

स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.