२०. आपले भावनिक जग स्वाध्याय प्रश्न उत्तरे
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 आपले भावनिक जग स्वाध्याय - आपले भावनिक जग प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
(अ) माणूस विचारक्षम असतो , तसाच तो ...................असतो .
उत्तर: माणूस विचारक्षम असतो , तसाच तो भावनाशील असतो .
(आ) आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये
जे ..............गुण आहेत , त्यांचा प्रथम विचार करावा .
उत्तर: आपल्या
मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत , त्यांचा प्रथम विचार करावा .
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ) व्यक्तिमत्त्व संतुलित कसे बनते ?
उत्तर: भावनांचा योग्य मेल घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते.
(आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ?
उत्तर: आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही , तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.
(इ) आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे?
उत्तर: आपल्या स्वभावातील
दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Parisar abhyas bhag 1 swadhya - Aapale bhavanik jag questions and answers - Aapale bhavanik jag prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
३ . पुढील प्रश्नांची तीन - चार वाक्यांत उत्तरे लिहा .
(अ) भावनिक समायोजन म्हणजे काय ?
उत्तर: माणूस हा विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशील असतो. आपले विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घातला आला पाहिजे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, यालाच ‘भावनिक समायोजन’ असे म्हणतात.
(आ) रागाचे कोणते दुष्परिणाम होतात?
उत्तर: रागाने पुढील दुष्परिणाम
होतात.
१)समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. २)आपण रंगीत व हट्टी होतो. ३) रागाच्या भारत आपण इतरांचे मन दुखावतो.४) आपल्याला डोकेदुखी, निरुत्साह, निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते.
(ई) आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला का असावी ?
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
३. तुम्हांला काय वाटते ते लिहा .
(अ) तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत .
उत्तर: मी निराश झालो, मला शिक्षकांचा रागही आला.
(आ) घरातील निर्णय घेताना आईबाबा तुम्हांलाही विचारतात .
उत्तर: मला आनंद होतो.
(इ) मित्राला मोठे बक्षीस मिळाले .
उत्तर: माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल.
(ई) वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात .
उत्तर: मला खूप आनंद होतो.
(उ) रोहनने वर्गात तुमचा अपमान केला .
उत्तर: मला त्याचा राग येईल.
४. तुम्ही या प्रसंगी काय कराल ?
(अ) रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला .
उत्तर: रोहिणीचे मी अभिनंदन करेन. तिने स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंध कशा प्रकारे लिहिला त्याबाबत माहिती विचारेन. चांगला निबंध कसा लिहावा याबाबत अधिक माहिती तिच्याकडून जाणून घेईन.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
(आ) कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही.
उत्तर: कविताच्या रागाचे कारण जाणून घेऊन तिची समजूत काढेन तिला अन्नावर राग काढू नको असे सांगून तिला डबा खाण्यास सांगेन.
(इ) वीणा शाळेत एकटी वावरते .
उत्तर: मी वीणा बरोबर मैत्री करेन. तिच्याशी बोलून तिला आम्हां सर्वांसोबत सामावून घेईन.
(ई) मकरंद म्हणतो , ' माझा स्वभावच हट्टी आहे '.
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *