१३.अन्न टिकवण्याच्या पद्धती इयत्ता ५वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय - अन्न टिकवण्याच्या पद्धती प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय.
प्र.१.काय करावे बरे ?
(अ) पापड सादळले आहेत.
उत्तर: सादळलेल्या पापडांना वाळवण्यासाठी उन्हात ठेवावे. तीन –चार कडक उन्हे लागल्यावर पापड हवाबंद डब्यात ठेवावेत.
हे सुद्धा पहा: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १
(अ) आंबा , कैरी , आवळा , पेरू अशी फळे , तर मटार , मेथी , कांदा , टोमॅटो अशा भाज्या ठरावीक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत .
प्र.२. जरा डोके चालवा .
शेवया अनेक दिवस चांगल्या
राहतात ;
परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते , असे का?
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
प्र.३. चूक की बरोबर ते सांगा . चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा .
(अ) पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो .
उत्तर: बरोबर.
(आ) सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले , की आपले अन्न खराब होत नाही .
उत्तर: चूक. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते.
(इ) उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत .
उत्तर: चूक. उन्हाळ्यात वळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात.
(ई) फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते .
Parisar abhyas bhag 1 swadhya - Anna tikvnyachya padhati questions and answers - Anna tikavnyachya padhati swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
प्र.४.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
(अ) अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते ?
उत्तर: अन्न वळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे त्याच प्रमाणे विविध परीरक्षके वापरून विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते.
(आ) खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो ?
उत्तर: १)खरब झालेले अन्न खाल्ल्याने पोट दुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात.२) अशा अन्नाचे पोषणमूल्य कमी झालेले असते.३)काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो. म्हणून आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो.
(इ) फळांचे मुरांबे का केले जातात ?
उत्तर: वर्षातून एका हंगामात
येणारी फळे जास्त काळ टिकून राहत नाहीत.
सुक्ष्मजीवांच्या प्रक्रियेमुळे ही फळे खराब होतात. अशी फळे टिकवून
ठेवण्यासाठी त्यांत साखरेसारखे परीक्षके घालतात त्यामुळे ती फळे मुरंब्याच्या
स्वरुपात वर्षभर टिकतात. एखाद्या हंगामात येणारी फळे वर्षभर उपलब्ध व्हावीत म्हणून
फळांचे मुरांबे केले जातात.
(ई)परिरक्षकांचा वापर कशासाठी
करतात ?
उत्तर: भाज्या, फळे यांसारखे अन्नपदार्थ जे वर्षभर टिकवता येत नाहीत असे पदार्थ जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी परीरक्षकांचा वापर केला जातो. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात.
(ए) मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ? ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत ?
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
* *
*