१५.बालसभा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी | Balsabha swadhyay prashn uttare 6vi marathi

इयत्ता सहावी विषय मराठी बालसभा स्वाध्याय बालसभा स्वाध्याय इयत्ता सहावी. Balsabha eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi
Admin

१५.बालसभा स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता सहावी मराठी पाठ १५ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - बालसभा प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी बालसभा प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी बालसभा स्वाध्याय - बालसभा स्वाध्याय इयत्ता सहावी.

स्वाध्याय

प्र. १. दोन-तीन ओळींत उत्तरे लिहा.


(अ)        इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते?

उत्तर: इयत्ता सहावीच्या बाल्साभेचे आयोजन २८ नोव्हेंबर महात्मा जोतीराव फुले यांची  पुण्यतिथी व ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली .


(आ)     बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला?

उत्तर: बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर, कुणाल , चंदर या मुलांनी सहभाग घेतला होता.


(इ)            बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली?

उत्तर: सहावीच्या वर्गशिक्षिका बाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मीनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या सर्वांनी बालसभेचे नियोजन करताना मुलांना मदत केली.

 

इयत्ता सहावी मराठी पाठ १५ स्वाध्याय प्रश्न उत्तरे बालसभा प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी बालसभा प्रश्नउत्तरे इयत्ता सहावी विषय मराठी बालसभा स्वाध्याय बालसभा स्वाध्याय इयत्ता सहावी. Balsabha eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Balsabha swadhyay Balsabha Balsabha swadhyay path prshn uttare

प्र. २. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ-दहा ओळींत लिहा.

उत्तर:

        महात्मा फुले :     महात्मा जोतीराव फुले हे नाव उच्चरताच एका आदर्श समाजसेवकाची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अश्या या महात्म्याचा जन्म १८२७ मध्ये एका माली कुटुंबात झाला. पेशवाईचा अखेरच्या काळामध्ये जातिनिर्बंध जास्त कडक झाले होते. धनसत्ता , ज्ञानसत्ता आणि राजसत्ता या एका उच्चवर्णीयांच्या हाती एकवटल्यानंर तो वर्ग इतरांना तुच्छतेने वागणूक देत होता. त्याचे चटके इतरांना बसतच होते या सर्व गोष्टींचा जोतिबा फुले विचार करीत होते. अमेरिकन विचारवंत असलेल्या थॉमसन पेन यांची पुस्तके वाचून ते धर्मचिकित्सा करायला लागले. शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या अधोगतीचे कारण कोणते. याचा ते सातत्याने शोध घेत. अशिक्षितपणा आणि अविद्या हेच या सगळ्या अनर्थाचे मूळ कारण आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला त्यांनी म्हटलेय-

विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली|

नीतीविना गती गेली| गतीविना वित्त गेले|

वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले|

जोतीराव फुलेंना जनतेने महात्मा म्हणून गौरव केला. अशा या महात्म्याने २७ नोव्हेंबर १८८९साली सर्वांचा निरोप घेतला. जोतीराव आज या जगात नाहीत पण ते त्यांच्या कार्यांच्या रूपामध्ये अजरामर आहेत.

 

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी इंदोर जवळ असणार्या महू या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीतील आंबवडे. त्यांचा वडिलांचे नाव रामजी सपकाळ तर आईचे नाव भीमाबाई. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ होते. आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. डॉ. बाबासाहेब यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. दलितांच्या  सामाजिक व राजकीय अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२४ मध्ये मुंबईत स्थापन केली. सार्वजनिक पाणवठ्यांवर दलित आणि अस्पृश्यांना पाणी भरण्याची परवानगी नव्हती. सार्वजनिक पाणी साठे सर्वांसाठी खुले व्हावेत म्हणून बाबासाहेबांनी १९२७ साली चवदार तळ्याकाठी सत्याग्रह केला.अशा या महात्म्याचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथील निवासस्थानी डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण झाले.

 


प्र. ३. तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल? ते क्रमाने लिहा.

उत्तर:     सर्वप्रथम विद्यान प्रदर्शन भरवणार असल्याची सूचना सगळ्या वर्गात देऊ.  आणि विज्ञान प्रदर्शनात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे एकत्र करू. विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी शाळेचा मोठ्या हॉल मध्ये सर्व साफ सफाई करून घेतली जाईल. सभागृहाच्या भिंतींवर थोर वैद्यानिकांच्या प्रतिमा आणि विद्यानाची माहिती असणारे फलक लावू. ज्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग तयार करून आणले असतील त्यांना त्यांच्या जागा नेमून देऊन त्यांचे प्रयोग मांडण्यासाठी टेबल उपलब्ध करून देऊ. यानंतर कार्यक्रमासाठी व्यासपीठ तयार करू, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बैठकव्यवस्था करू. सूत्रसंचालन, अध्यक्षपद आधीच ठरवून ठेवू. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यावर विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत जाता यावे यासाठी व्यवस्था करू.  इत्यादी तयारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे  झाल्यास आम्ही करू.

 

Balsabha eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Balsabha - swadhyay Balsabha - Balsabha swadhyay path prshn uttare

प्र. ४. शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा.

उत्तर:

१)               स्वातंत्र्यदिन

२)               प्रजासत्ताक दिन

३)               सांस्कृतिक कार्यक्रम

४)               क्रीडास्पर्धा

५)               शिक्षक दिन.

६)               महाराष्ट्र दिन.

७)               संविधान दिन

८)               थोर नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी.

९)               बालदिन.

१०)          वृक्षारोपण कार्यक्रम

 

प्र. ५. बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात? त्या विषयांची यादी करा.

उत्तर: १) पर्यावरण दिन २)अंधश्रद्धा निर्मुलन ३) थोर नेत्यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त ४) स्वच्छता अभियान ५) राष्ट्रीय सण इत्यादी. विषयांवर बालसभा घेतल्या जातात.

 

प्र. ६. तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्देदिले आहेत. त्याबाबत तुम्ही काय विचार कराल? ते लिहा.

उत्तर:

  • कोणती घोषवाक्य बनवाल

उत्तर:

१)   झाडे लावा , झाडे जोपासा.

२)   झाडे लावा पर्यावरण वाचवा.

३)   पर्यावरण रक्षण करू चला,

आरोग्य निरोगी ठेऊ चला.


  • कोणत्या समस्यांवर विचार कराल.

उत्तर:

१)   जल प्रदूषण

२)   हवा प्रदूषण

३)   मृदा प्रदूषण

४)   जंगलतोड

५)   तापमानवाढ

६)   कचरा समस्या

 

  • प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल.

उत्तर: १) गावातील जेष्ठ नागरिक किंवा पर्यावरण संवर्धनात सहभागी असणारे व्यक्तिमत्व.

२)समाजसेवक

३) शाळेचे मुख्याध्यापक.



(अ)        तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता खाली दिलेला आहे.त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडास्पर्धेचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर: पाहुण्यांचे स्वागत – प्रास्ताविक – क्रीडास्पर्धांचे उद्घाटन – खेळांबाबत मार्गदर्श आणि सूचना – बक्षीस वितरण – पाहुण्यांचे मनोगत – आभार प्रदर्शन.

 


आपण समजून घेऊया.

·       पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा.

(खालील तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा करा.)

वाक्य

कर्ता

कर्म

क्रियापद

१. तारा क्रिकेट खेळते.

तारा

क्रिकेट

खेळते

२. यास्मीन पुस्तक वाचते.

यास्मीन

पुस्तक

वाचते.

३. पक्षी किलबिल करतात.

पक्षी

किलबिल

करतात.

४. राजू अभ्यास करतो.

राजू

अभ्यास

करतो.

५. शबाना स्वयंपाक करते.

 शबाना

स्वयंपाक

करते

६. जॉन व्यायाम करतो.

जॉन

व्यायाम

करतो

 

हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.



✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.