२१.कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १ | Kamant vyast aapli aantarendriye swadhyay .

पाचवी परिसर अभ्यास भाग 1 कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये.स्वाध्याय कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये.प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1
Admin

२१.कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये.स्वाध्याय - कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये.प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय


१.    काय करावे बरे ?
चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली आहे .

उत्तर: चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीभोवती कधीही गर्दी करू नये. चक्कर आलेल्या व्यक्तीच्या भोवती मोकळी हवा असणे गरजेचे असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आली असेल आणि लोकांनी तिच्याभोवती गर्दी केली असेल तर सर्वात आधी माणसांची ती गर्दी कमी करावी. चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी शिंपडावे. तरीही त्याला शुद्ध न आल्यास्स्स लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये.स्वाध्याय कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये.प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Kamant vyast aapali aantarendriye  questions and answers Kamant vyast aapali aantarendriye  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay


२.   जरा डोके चालवा .

(अ)      भरभर जेवताना जोराचा उसका का लागतो ?

उत्तर: अन्ननलिका व श्वसन नलिका या दोन्ही नालीकांची सुरुवातीची टोके घशात एकमेकांच्या अगदी जवळ असतात. आपण जेव्हा अन्न गिळतो तेव्हा आपली श्वसननलिका बंद राहते आणि आपण गिळलेले अन्न अन्ननलिकेत जाते. जेव्हा आपण घाईघाईने जेवत असतो तेव्हा आपण गिळलेले अन्न चुकून श्वसन नलिकेत जाते. हे श्वसन नलिकेत गेलेलं अन्न त्वरित श्वसन नलिकेतून बाहेर फेकले जाते. तेव्हा आपल्याला भरभर जेवताना  ठसका लागतो.

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

(आ) श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते ?

उत्तर: श्वसन इंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसनेंद्रीयांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फ्फुफुसापर्यंत पोहचू शकत नाही. अशा प्रकारे श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते.


३. खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा .


(अ) ...................वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवला जातो.           

उत्तर: ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवला जातो.


(आ)     जठर हे ...............सारखे इंद्रिय असते.

उत्तर: जठर हे पिशवी सारखे इंद्रिय असते.

 ३.   जोड्या लावा .

 

'' गट

'' गट(उत्तरे)

(१) फुप्फुसे

(आ) श्वसनसंस्था

(२) जठर

(ई) पचनसंस्था

(३) हृदय

(अ) रक्ताभिसरण

(४) मेंदू

(इ) चेतासंस्था

 

arisar abhyas bhag 1 swadhya - Kamant vyast aapali aantarendriye  questions and answers - Kamant vyast aapali aantarendriye  prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay

५.थोडक्यात उत्तरे लिहा .


(अ) शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा .

उत्तर: शरीरात कार्य करणाऱ्या संस्था पुढील प्रमाणे आहेत.

पचन संस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था,  तसेच पचन संस्था, श्वसनसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांमध्ये समन्वय ठेवणारी चेतासंस्था. शरीराला आकार आणि आधार देणारी आणि महत्वाच्या इंद्रियांचे रक्षण करणारी अस्थिसंस्था तसेच शरीरात तयार होणारे अनेक टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणारी उत्सर्जन संस्था. इत्यादी.


(इ)    फुप्फुसामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण कशी होते ?

उत्तर: फुप्फुसामध्ये बाहेरील हवा पोचली, की हवेतील ऑक्सिजन वायूकोशाच्या भोवती असलेल्या बारीकबारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि रक्तातून तो  शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो. त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायूकोशांमधील हवेत मिसळतो.

         उच्छवासावेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे फुप्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते.

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 

(ई)     लाळ हा द्राव पाचकरस का आहे ?

उत्तर: टायलीन नावाचा पाचकरस हा लाळेमध्ये असतो. या रसामुळे पिष्टमय पदार्थांचे रुपांतर हे ग्लुकोजमध्ये केले जातो. त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. म्हणून लाळ हा द्राव पाचकरस आहे.


१.    कशाला म्हणतात ते कंसातून शोधा व लिहा .

( रक्ताभिसरण , श्वासनलिका , श्वासपटल )

(अ) याच्या वरखाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो - श्वासपटल
(आ) शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया - रक्ताभिसरण
(इ) नाकातून आलेली हवा या नळीत येते - श्वासनलिका

 

स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.