१६.पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 पाणी स्वाध्याय - पाणी प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय
१. काय करावे बरे ?
जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे .
उत्तर: जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात असल्यास जमिनीच्या उतारावर लहान लहान झाडांची लागवड करावी जेणेकरून झाडांची मूळ उतारावरील माती घट्ट धरून ठेवतात त्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जाणार नाही. तसेच बागेतील उतारभागावर आडवे दगड लावून वाहून जाणारी माती थांबवता येउ शकते.
२. जरा डोके चालवा .
पावसाचे पाणी
जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे ?
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
२. प्रश्नांची उत्तरे लिहा .
(अ) दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते?
उत्तर:
1)दुष्काळात नद्या, तळी विहिरी, बंधारे धरणे यांतील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होते आणि ते कोरडे पडतात.
3) दुष्काळात जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची तांची जाणवते.
4) शेतीसाठी पाणी मिळत नाही.
5) दुष्काळीभागातील लोकांना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागते.
(आ) पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात ?
उत्तर: पावसाळ्यानंतरही पाणी
उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक पुढील कामे करतात.
१)काही ठिकाणी नदीच्या पात्रात
विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते.
२) काही ठिकाणी घरांच्या
छपरांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवले
जाते.
३)नद्यांवर मोठी धरणे बांधली जातात,, लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चार खणणे, गावातील ओढे, नाले यांवर बांध बांधून पाणी अडवणेइत्त्यादी.
Parisar abhyas bhag 1 swadhya - Pani questions and answers - pani prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
(इ) पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते ?
उत्तर: पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते . सर्वसाधारण पणे आपल्याला वर्षातून चार महिने पावसाचे पाणी मिळते. पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते.
(ई) जलव्यवस्थापन कशाला म्हणतात ?
उत्तर: पावसाळ्याच्या दिवसांत उपलब्ध झालेल्या पाण्याचा पावसाळ्याच्या दिवसानंतर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे, अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जलव्यवस्थापन म्हणतात.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
३. चूक की बरोबर ते सांगा . चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा .
(अ) पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते.
उत्तर: चूक.पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून फक्त चार महिनेच मिळते.
(आ) शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हालवले जाते .
उत्तर: बरोबर.
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *