१२.सर्वांसाठी अन्न इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Sarvansathi anna swadhyay prashn uttare 5vi

सर्वांसाठी अन्न इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Sarvansathi anna swadhyay prashn uttare 5viSarvansathi anna questions and answe
Admin

१२.सर्वांसाठी अन्न इयत्ता ५वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

सर्वांसाठी अन्न इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Sarvansathi anna swadhyay prashn uttare 5vi

स्वाध्याय 

प्र.१.काय करावे बरे ?
कुंडीतील रोप वाढत नाही .

उत्तर: १) कुंडीतील रोप वाढत नसल्यास त्याला पोषक सेंद्रिय खते घालावीत.

२)कुंडीतील रोपाला रोज पुरेशा प्रमाणात पाणी घालावे.

३) त्या रोपाला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ती कुंडी ठेवावी.

४) कुंडीतील रोपावर कीड किंवा इतर परजीवी नाही यांची खात्री करून घ्यावी.

इत्यादी गोष्टींची काळजी घेतल्यावर कुंडीतील रोपाची वाढ चांगली होईल.

 
सर्वांसाठी अन्न इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Sarvansathi anna swadhyay prashn uttare 5vi Parisar abhyas bhag 1 swadhya Sarvansathi anna questions and answers Saravansathi anna swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay

प्र.२. जरा डोके चालवा .

घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो ?

उत्तर:     घरामध्ये अन्नधान्याचा साठा केलेला असतो कारण, एखादी वर्षी पूर, अवर्षण , वादळे गारपीट अशा आपतींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. आणि अन्नधान्याची कमतरता जाणवू लागते. काही अन्नधान्ये ही ठराविक कालावधीतच मिळतात एका हंगामाचे पिक पुढील हंगाम येईपर्यंत पुरवावे लागते तसेच आपल्या गरजेच्या वेळी अन्नधान्य उपलब्ध व्हावे म्हणून घरात अनधान्याचा साठा केला जातो.

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 


प्र.३.चूक की बरोबर ते सांगा . चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा .


(अ)        शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे.

उत्तर: चूक. शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत.

 
(आ)     आपला भारत देश शेतीप्रधान आहे .

उत्तर: बरोबर.

 

(इ)        सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही .

उत्तर: चूक. सुधारिक बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढते.

Parisar abhyas bhag 1 swadhya - Sarvansathi anna questions and answers - Saravansathi anna swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay

प्र.४.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


(अ)        सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात ?

उत्तर: सुधारित बियाण्यांचा वापरामुळे पुढील फायदे होतात .

१)    सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे अधिक पिक घेणे शक्य होते.

२)   सुधारित बियाण्यांची पिके किडी ला बळी पडत नाही.

३)    पिकांची वाढ जोमाने व झपाट्याने होते.

४)     काही सुधारित बियाणी कमी पाण्यातही भरगोस पिक देतात.

 

(आ)     सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या त्यांचे फायदे कोणते?

उत्तर: ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत. या पद्धतींचे पुढील फायदे होतात.

१)यामुळे पिकांच्या मुळांशी आवश्यक तितकेच पाणी जाते.

२)पाण्याचा अपव्यय टळतो.

३)उपलब्ध असलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर होतो.


 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.


(इ)    ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा.

उत्तर: ठिबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरल्या जातात. त्यामुळे पिकांच्या मुलाशी आवश्यक तेवढेच पाणी ठीबकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो. आणि पाण्याचा अपव्यय टळतो.

 

(ई)  कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते?

उत्तर: १) किडींच्या प्रादुर्भावामुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते.

२)वाढत्या पिकावर रोग पडल्याने सुद्धा पिकांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते.

३)वाढत्या पिकांना योग्य प्रमाणात पाणी आणि खत न मिळाल्याने सुद्धा वाढत्या पिकाचे नुकसान होते.

सर्वांसाठी अन्न इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Sarvansathi anna swadhyay prashn uttare 5vi

(उ)    पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात?

उत्तर: पिकांचे किड आणि रोगजंतू यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पिकांवर कीड आणि रोगजंतू मरणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यांवर औषधे चोळतात.

 

(ऊ)    जमिनीचा कस कशामुळे कमी होतो?

उत्तर: १)जमिनीमध्ये तीच तीच पिके वारंवार घेतली ग्यास जमिनीची सुपीकता कमी होते.

२)रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे, अतिरिक्त खते ही जमिनीमध्ये शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते.

३)शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमीन क्षारपड होऊन जमिनीचा कस कमी होतो.


(ए) आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत?

उत्तर: आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत पुढील  बदल झाले आहेत:

१)शेतीसाठी सुधारित बियाण्याचा वापर सुरु झाला. त्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होऊन भरगोस पिक घेता येणे शक्य झाले.

२)पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक, सिंचन, तुषार सिंचन, यांसारख्या सिंचनाच्या नवीन पद्धतींचा वापर सुरु झाला. त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य झाले.

३) वेळोवेळी कीटकनाशकांचा वापर करून पिकांचे रोगांपासून संरक्षण करता येणे शक्य झाले.

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे.


(ऐ) कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते?

उत्तर: पुढील पद्धतीने धान्य टिकवता येते.

१)उन्हामध्ये धान्य वळवून पोत्यात भरले जाते.

२) धान्य साठवणीच्या जागी योग्य ती औषधे फवारली जातात आणि धान्य साठ्याभोवती पसरतात.

३)धान्यसाठ्यात कडूनिंबाचा पाला घातला जातो.

४) धान्यासाठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधे बाजारात उपलब्ध आहेत त्यांचा वापर केला जातो.

५)धान्य साठवणीची जागा नेहमी कोरडी ठेवतात.

६) धन्य साठवणीची जागा हवेशीर राहील याची काळजी घेतात.

 
(ओ) शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते?

उत्तर: १)पावसाबरोबरच नदी, तलाव, विहिरी यांतील पाण्याचा साठा शेतीसाठी वापरला जातो.

२)नद्यांवर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी अडवून पाणीसाठा केला जातो.

अशा प्रकारे शेतीसाठी पाणी उपलब्ध केले जाते.


प्र.५.जोड्या जुळवा .  

' ' गट

' ' गट.(उत्तरे)

(१) दमट हवेतील

(इ) बुरशी लागणे .

(२) कोरड्या हवेतील धान्यसाठा

(अ) धान्याला बुरशी न लागणे

(३) धान्यसाठ्यात औषधे ठेवणे

 (आ) कीड - मुंगी न लागणे .

 

स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *

1 comment

  1. Unknown
    Unknown
    Thank you
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.