23. नैसर्गिक आपत्ती चौथी परिसर अभ्यास भाग १ ध्याय प्रश्न उत्तरे | Naisargik aapatti 4th swadhyay prashn uttare

23. नैसर्गिक आपत्ती स्वाध्याय प्रश्न उत्तरे

नैसर्गिक आपत्ती इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - नैसर्गिक आपत्ती इयत्ता चौथी - इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय


(अ)        काय करावे बरे?

तुमचे गाव डोंगरावर आहे, डोंगर उतारावर वसलेल्या शेजारच्या गावी पावसाळ्यात खूप मोठा पूर आला आहे.

उत्तर: १) पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हे समजताच त्याच्या मदत करायला जाऊन पुरात अडलेल्या माणसांची आणि प्राणिमात्रांची सुटका करणे.

१)    पुरातून बाहेर आलेल्या माणसांना डोंगरावर घेऊन जाणे आणि त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे.

२)   त्या माणसांना मानसिक आधार देणे.

३)   त्यांना अन्न पाणी, वस्त्र , निवारा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.

परिसर अभ्यास  भाग १ नैसर्गिक आपत्ती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी नैसर्गिक आपत्ती इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे नैसर्गिक आपत्ती इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Naisargik aapatti  eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag Naisargik aapatti  swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


(आ) जरा डोके चालवा.

(१) पुढे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तींचे कोष्टक दिले आहे. ते पूर्ण करा . त्यासाठी कोष्टकाच्या खाली दिलेल्या यादीची मदत घ्या .

 

अ.क्र

नैसर्गिक आपत्ती

१.

चक्रीवादळ

२.

वीज कोसळून त्यात मरणे.

३.

जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे.

४.

पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे.

अ.क्र

मानवनिर्मित आपत्ती

१.

मोडकळीस आलेले घर कोसळणे.

२.

दोन आगगाड्यांची टक्कर होणे.

३.

स्वयंपाक घराचा सिलिंडर फुटून आग लागणे.

४.

विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे.


( १ ) चक्रीवादळ ( २ ) मोडकळीला आलेले घर कोसळणे ( ३ ) वीज कोसळून त्यात मरणे . ( ४ ) दोन आगगाड्यांची टक्कर होणे . ( ५ ) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडून त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे ( ६ ) जोरदार बर्फ पडून दैनंदिन जीवन विस्कळीत होणे . ( ७ ) स्वयंपाकाचा सिलिंडर फटून आग लागणे , ( ८ ) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडून येणे .

परिसर अभ्यास  भाग १ नैसर्गिक आपत्ती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - नैसर्गिक आपत्ती इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - नैसर्गिक आपत्ती इयत्ता चौथी

४) बर्फ पडणे आणि गारपीट यांत काय फरक आहे ?

उत्तर: १) गारपीट झाल्याने गारांचा मार लागून माणसे, जनावरे जखमी होतात.

२)बर्फ पडल्याने जनावरे आणि माणसे जखमी होत नाहीत.

३) गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते.

४)बर्फ पडल्याने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान कमी प्रमाणत होते.


३)बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहात असतील , तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ त्याचे कारण काय असेल ?

उत्तर: बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहात असतील , तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील कारण बर्फाळ प्रदेशात त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांच्या अंगावर दाट केस असतील.


(आ)     माहिती मिळवा .

  • मोठ्या शहरांमध्ये अग्निसुरक्षा दले असतात . त्यांच्याविषयी माहिती मिळवा . त्या दलातले सेवक कोणकोणत्या दुर्घटनांमध्ये नागरिकांना मदत करतात त्यांची यादी करा . मिळालेली माहिती वर्गातील . इतरांना सांगा .

उत्तर: मोठ्या शहरांमध्ये असलेली अग्नीसुरक्षा दले ही आग विझवण्याचे काम करतात. त्याचबरोबर इमारत दुर्घटनेतील लोकांना वाचवणे, तेल गळती आणि वायू गळती यांसारख्या घटनांतून लोकांना वाचवणे. इत्यादी घटनांमध्ये नागरिकांना मदत करतात.


( ई ) बातम्यांचा संग्रह करा .

नैसर्गिक आपत्तींची माहिती वर्तमानपत्रात आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर बातमीपत्रांमधून दिली जाते. त्यावर लक्ष ठेवा. नैसर्गिक आपत्तीच्या बातम्यांचा संग्रह करा.

उत्तर: (विद्यार्थ्यांनी वर्तमान पत्र आणि दूरदर्शनवरील नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या येथे लिह्व्यात )

Naisargik aapatti  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag Naisargik aapatti  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(3) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .


(१) आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस का म्हणतात?

उत्तर: ठरविक कालावधीतच आपल्या देशात पाउस पडत असल्यामुळे आपल्या देशातल्या पावसाला मोसमी पाऊस असे म्हणतात.


(१)   कोणत्या प्रकारचा पाऊस पिकासाठी चांगला असतो?

उत्तर: हिवाळ्यातला शिडकाव्याचा पाऊस पिकासाठी चांगला असतो.


(३) गारपिटीचे दुष्परिणाम कोणकोणते आहेत ?

उत्तर: गारपिटीचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:

१)    गारपिटीमुळे गारांचा मार लागून माणसे, जनावरे जखमी होतात.

२)   घरांची कौले फुटतात.

३)   गारांच्या माराने उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान होते.

४)  या सुमाराला जर आंब्याचा मोहर आला असेल तर त्याचेही खूप नुकसान होते. त्यामुळे आंब्याचे उत्पादन कमी होते.


(४) पुराच्या पाण्यात पोहवे का?

उत्तर: पुराच्या पाण्यात पोहू नये.


(१)       त्सुनामीचा किनाऱ्यावरील वाहनांवर काय परिणाम होतो?

उत्तर: त्सुनामीच्या वेळी किनाऱ्यावर असलेली वाहने, आत बसलेल्या प्रवाश्यांसह दूर फेकली जातात. वाहनांची मोड तोड होते. वाहने पाण्याबरोबर वाहून जातात.


(अ)        गाळलेले शब्द भरा.

(१)            पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच ................जमिनीच्या पोटात निर्माण होतात.

उत्तर : पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच तरंग जमिनीच्या पोटात निर्माण होतात


(२)       पाऊस थांबला नाही तर पाणी.............. घुसते.

उत्तर: पाऊस थांबला नाही तर पाणी वस्तीतही घुसते.


(३)    त्सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे ..............असतात.

उत्तर: त्सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे हतबल असतात.


(४)          त्या ............... अडकून माणसे दगावतात .

उत्तर: त्या ढिगाऱ्याखाली अडकून माणसे दगावतात .

 

हे सुद्धा पहा:

चौथी परिसर अभ्यास भाग- 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी सर्व विषयांची पुस्तके pdf मध्ये

येथे क्लिक करा.



विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.