२४.पदार्थ, वस्तू आणि उर्जा स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पदार्थ वस्तू आणि उर्जा. - पदार्थ वस्तू आणि उर्जा प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय.
१.करावे बरे ?(अ) पाहुण्यांसाठी पटकन
सरबत करायचे आहे. घरात केवळ खडीसाखर आहे.
उत्तर: सरबत बनवताना खडीसाखर
लवकर विरघळणार नाही म्हणून खडीसाखर कुटली असता तिची पूड होईल, म्हणजेच बारीक कण
होतील आणि हे कण पाण्यात लगेच विरघळतील व पाहुण्यांसाठी पटकन सरबत करता येईल.
(आ) मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडेमीठ उपलब्ध आहे .
उत्तर: उपलब्ध असलेल्या खडेमिठाला
कुटल्यावर त्याचे पुडीमध्ये रुपांतर होईल त्याचे बारीक बारीक कण होतील. ही खडेमिठाची
पावडर मक्याच्या कणसावर लावता येईल.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
२. जरा डोके चालवा .
(अ) कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो .
उत्तर: कापराच्या वड्यांचे सतत
वायुरुपातील लहान कणांत रुपांतर होत असते. त्यांचे हे लहान लहान कण हवेत मिसळल्याने
ज्या ठिकाणी कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या भागात कापराचा वास येतो. म्हणून
कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो.
Parisar abhyas bhag 1 swadhya - padarth vastu aani urja questions and answers - padarth vastu aani urja prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
(आ) सार्वजनिक वाहनांचा उपयोग
केल्याने इंधनाची बचत कशी होते ?
उत्तर: मोटारगाडीत पेट्रोल
किंवा डीझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता , म्हणजेच वाहन चालण्यासाठी उर्जा
निर्माण होते. प्रत्येक मोटारगाडी चालण्यासाठी इंधनाची गरज असते. जर एकाच वेळी
प्रत्येकाने जर वेग वेगळ्या मोटार गाड्या वापरल्या तर तितक्या जास्त प्रमाणात इंधन
संपते. आणि जर सर्व प्रवास करणाऱ्या लोकांनी जर एका सार्वजनिक वाहनाचा वापर केला
तर त्या एकाच वाहनासाठी इंधन संपेल . इतर मोटार गाड्यांचे खर्च होणारे इंधन बचत
होईल.
३.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
.
(अ) डांबरगोळ्या ठेवलेल्या
कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो ?
उत्तर: डांबरगोळीचे सतत वायुरुपातील लहान लहान कणांत रुपांतर होत असते. कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबरगोळीचा वास येतो.
(अ) निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते?
उत्तर: निसर्गात पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांमध्ये आढळते.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
(आ) पदार्थांची स्थायू, द्रव, वायू ही अवस्था कशावरून ठरते?
उत्तर: पदार्थांची स्थायू ,द्रव आणि वायू ही अवस्था त्यांच्यातील कणांच्या मांडणीवरून ठरते.
(इ) ऊर्जा कशाला म्हणतात?
उत्तर: कार्य करण्याच्या क्षमतेला उर्जा असे म्हणतात.
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *