२५. सामाजिक आरोग्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 सामाजिक आरोग्य स्वाध्याय - सामाजिक आरोग्य प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय
१ . रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .
( अ ) निरामयतेमुळे आपल्यातील .................भावना
वाढते .
उत्तर: निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते .
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
(आ) तंबाखू सतत पोटात जात
राहिल्याने ...................मध्येही , कर्करोग होऊ शकतो .
उत्तर: तंबाखू सतत पोटात जात
राहिल्याने अन्ननलिके मध्येही , कर्करोग होऊ शकतो .
( इ ) अति.................
मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
उत्तर: अति मद्यपाना
मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
( ई ) देशाची प्रगती आणि विकास
यांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे .......
उत्तर: देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे देशतील लोक.
( उ ) व्यक्तिगत आरोग्य व
सवयीतून आपल्याला समाजाचे ...................व सार्वजनिक .................प्राप्त
करता येते .
उत्तर: व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून
आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते .
२. खालील वाक्य चूक की बरोबर ते
सांगा . चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
(अ) प्रदूषण , अस्वच्छता , साथीचे आजार , व्यसनाधीनता,
कीटक दंशापासून होणारे आजार , सामाजिक आरोग्य चांगले बनवतात .
( चूक )
उत्तर: प्रदूषण , अस्वच्छता , साथीचे आजार , व्यसनाधीनता,
कीटक दंशापासून होणारे आजार , सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये
आणते.
(आ) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास
कायदयाने मनाई केली आहे . ( बरोबर )
उत्तर: बरोबर
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
(इ) पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता , व्यायाम आणि छंदाची जोपासना
यांतून उत्तम आरोग्य मिळते . ( बरोबर )
उत्तर: बरोबर
(ई) आपले आरोग्य उत्तम प्रकारे
सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही . (चूक)
Parisar abhyas bhag 1 swadhya - Samajik aarogya questions and answers - Samajik aarogya prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
१. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
(अ) उत्तम आरोग्य कसे मिळवता येते ?
उत्तर: पोषक आहार, वैयक्तिक
स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळवता येते.
(आ) सामाजिक आरोग्य धोक्यात
आणणारे घटक कोणते ?
उत्तर: दुषित पाणी, कुपोषण,
प्रदूषण, अज्ञान व अंधश्रद्धा, व्यसनाधीनता इत्यादी सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे
घटक आहेत.
(इ) तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते?
२)व्रणांच्या मोठमोठ्या जखमा
होतात. काही दिवसांनी गाठी होतात.
३)तंबाखू पोटात गेल्यावर
पोटाच्या नीरनिराळ्या तक्रारी सुरु होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननालीकेचा
कर्करोग होऊ शकतो.
कर्करोग झालेल्या व्यक्तीला
औषधोपचाराचाही त्रास होत राहतो. कधी कधी मृत्यू देखील ओढवतो.
४)तोंडाचा कर्करोग होतो.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(ई) मद्यपानाचे घातक परिणाम कोणते?
उत्तर: मद्यपानाचे घातक परिणाम पुढील प्रमाणे आहेत.
१) मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते.
२) अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मुत्राशयाचे रोग होतात.
३) कुटुंबे उध्वस्त होतात.
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *