२२.वाढ आणि व्यक्तिमत्व विकास स्वाध्याय प्रश्न उत्तरे
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वाढ आणि व्यक्तिमत्व विकास स्वाध्याय - वाढ आणि व्यक्तिमत्व विकास प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
स्वाध्याय.
१. काय
करावे बरे ?कबीरला
प्राणिशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे . त्यासाठी त्याने आत्तापासून काय
तयारी करावी ?
उत्तर: कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे असल्यास त्यांने आत्तापासून विविध पुस्तकांतून आणि मासिकांतून प्राणी शास्त्रा बाबत लेख वाचावेत. प्राणी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी कबीरने वेळ दिला पाहिजे. आत्तापासूनच कबीरने प्राणीशास्त्र विषयाच्या अभ्यासाची आवड जपली पाहिजे.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
२. जरा डोके चालवा .
(अ) सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात ?
उत्तर: सायकल चालवायला शिकण्यापूर्वी स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे. सायकल चालवयाला शिकण्यापूर्वी डोळे कायम सावधान असणे गरजेचे आहे. रस्त्यावर सायकल चालवताना रस्त्यावरील इतर वाहनांची माहिती घेण्यासाठी मान जलद इकडे तिडके फिरवणे आवश्यक आहे. सतत सावधान राहणे आवश्यक.
(आ) सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे . तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत?
उत्तर: सुमनला जर पुढे हॉटेल चालवायचे असल्यास तिला पुढील कौशल्ये उपयोगी पडतील .
१) सगळ्यांबरोबर काम करणे.
२) स्वयंपाक करणे.
३) भाषण आणि संवाद साधण्याचे कौशल्य.
४) जिद्द आणि चिकाटी इत्यादी.
Parisar abhyas bhag 1 swadhya - Vadh anai vyaktimatwa vikas questions and answers - Vadh aani vyaktimatwa vikas prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
३. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .
(अ) आनुवंशिकता म्हणजे काय ?
उत्तर: आपले दिसणे, आपली अंगकाठी
अशी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आईवडिलांसारखी असतात. एका कुटुंबातील
लोकांमध्ये अनेक बाबतींत साम्य दिसून येते. आपली काही लक्षणे आपले आजी-आजोबा किंवा
मामा-मावशी , काका-काकांसारखी असतात. म्हणून केत्येक वेळा त्यांना ओळखणारे , पण
पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यांवरून आपल्याला ओळखतात.
आपल्या कुटुंबाती ल सदस्यांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे, याला आनुवंशिकता असे म्हणतात.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
(आ) बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा
उत्तर: बाल वर्गातील मुले :
१) तीन ते चार वर्षे या वयोगटातील असतात.
२) उंची व शारीरिक ताकद कमी.
३) कौशल्यांची कमतरता.
४) शाळेत जाताना दुसऱ्यांची मदत .
पाचवीतील विद्यार्थी:
१) ९ ते ११ या वयोगटातील असतात.
२) उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त
३) कौशल्ये काही प्रमाणात जास्त.
४) शाळेत एकटी जाऊ शकतात.
(इ) जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात ?
उत्तर: १) जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत
आपली उंची व वजन वाढते.
२)आपण लहान असतो तेव्हा आपण
कोणतीच कामे स्वतः करू शकत नाही पण जेव्हा मोठे होतो तेव्हा स्वतःची कामे स्वतः
करतो.
३)जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत
विविध कौशल्ये आत्मसात केली जातात.
४) आपली शारीरिक ताकद वाढते.
(ई) तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्ये लिहा .
उत्तर: मी आत्मसात केलेली कौशल्ये.
१) सायकल चालवणे २) दोरी उड्या मारणे ३) पोहणे.
(उ) शारीरिक वाढ कशाला म्हणतात ?
उत्तर: आपली उंची आणि वजन वाढते. त्याचप्रमाणे आपले जस जसे वय वाढत जाते तशी आपली शारीरिक ताकदही वाढत जाते. यालाच शारीरिक वाढ असे म्हणतात.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
४ . चूक की बरोबर ते सांगा .
(अ) नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते .
उत्तर: बरोबर
(आ) जन्मतःच आपण कौशल्ये
आत्मसात केलेली असतात .
उत्तर: चूक
( इ ) स्वतःची सर्वच कामे आपण
स्वतः करत नाही .
उत्तर: बरोबर
( ई ) जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची
वाढत राहते .
उत्तर: चूक
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *