२५.नवा पैलू स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
इयत्ता सहावी मराठी पाठ २५स्वाध्याय प्रश्न उत्तरे - नवा पैलू स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी नवा पैलू प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी नवा पैलू स्वाध्याय
स्वाध्याय
प्र. १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करत होती ?
उत्तर: दवाखाना जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली होती. आजीचा नातू दिगू हा हळूहळू चलत होता. दवाखान्यात जात असताना आभाळ अगदी गच्च भरून आलेले दिसत होते. क्षणभरात पाऊस कोसळणार असे दिसत होते. पाउस सुरु होण्याच्या आत दवाखान्यात पोहचले पाहिजे म्हणून आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई करत होती
(आ) रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यांत पाणी का आले ?
उत्तर: दवाखान्यात चालत जात असताना दिगू रिक्षाच्या समोर आला. त्यामुळे रिक्षावाला दिगुला काहीतरी बोलत होता. दिगुला ऐकू येत नसल्याने तो काही तेथून हालत नव्हता. तेव्हा रिक्षावाला दिगुला ‘बहिरा आहेस की आहेस की काय? असे बोलला. हे रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.
(इ) वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला ?
उत्तर: आजीच्या बोलण्यावरून आजीची अवस्था आणि दिगुचे बहिरेपण वत्सला बाईंच्या लक्षात आले होते. वत्सला बाई या मूक-बधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होत्या. दिगुवर इलाज करता यावा. या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला.
(ई) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला ?
उत्तर: शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या साहाय्याने गोष्ट शिकवत होत्या, हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले हे सर्व पाहून आजीला आनंद झाला.
(उ) मूक-बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले ?
उत्तर: आजीला नातवाच्या
दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. मूक-बधिरांची शाळा पाहून
आजीच्या मनात विचार आला, ‘आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिर शाळा काढली
तर! कष्टाने जमवलेली शेती विकून त्या पैशात मूक-बधीअर मुलांसाठी शाळा काढायचे
आजीने ठरवले. आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील मुले शाळेत जातील शिकतील
आणि स्वःताच्या पायावर उभी राहतील.
Nava pailu eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Nava pailu - swadhyay nava pailu - Nava pailu swadhyay path prshn uttare
प्र. २. का ते लिहा,.
(१) आजी शहरात गेली.
उत्तर: दिगुच्या बहिरेपणावर चांगला ईलाज करता यावा म्हणून आजी शहरात गेली
(२) आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली.
उत्तर: शहरातील दवाखाना बंद होता. पूस कोसळत होता अशा परिस्थिती मध्ये वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. उद्या मी तुम्हाला जे दाखविण, ते पाहून तुही हसत घरी जाल या वत्सलाबाईंच्या कथनावर त्या मोहात पडल्या आणि आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली.
(३) आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.
उत्तर: आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. त्यामुळे जर आपल्या गावातही शाळा काढली तर तिथल्या मुलांना शिक्षण घेता येईल म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.
(४) वत्सलेने आजीला शाळेत नेले.
उत्तर: मूक-बधीर मुलांच्या
शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि दिगुला या शाळेत आजीने
ठेवावे या हेतून वत्सलेने आजीला शाळेत नेले.
प्र. ३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा.
उत्तर: वत्सला ही मूक-बधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. ती अत्यंत आनंदी आणि हसऱ्या स्वभावाची होती. ज्या प्रमाणे बोलकी मुले आनंदाने जीवन जगतात. त्याच प्रकारचे आनंदी जीवन ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे आणि मुकेपणाचे दुख आले आहे त्यांच्यातील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचं निर्धार पक्का करून वत्सलाने मूक –बधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती.
(२) या पाठाला ‘नवा पैलू’ हे शीर्षक आहे
ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा.
उत्तर: आपल्या गावातील मुलांसाठी देखील अशा प्रकारची शाळा असावी असा विचार आजींच्या मनात आला. त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी कष्टाने कमावलेली शेती विकण्याचा निर्धार त्यांनी कला. आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू दर्शवते म्हणून नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे.
(३) आजीच्या थोर विचारांबाबत पाच ते सात ओळी लिहा.
उत्तर: आजीला
नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. मूक-बधिरांची
शाळा पाहून आजीच्या मनात विचार आला, ‘आपल्याही खेड्यात
अशी मूक-बधिर शाळा काढली तर! कष्टाने जमवलेली शेती विकून त्या पैशात मूक-बधीअर
मुलांसाठी शाळा काढायचे आजीने ठरवले. आजीने विचार केला की शाळा झाल्यावर गावातील
मुले शाळेत जातील शिकतील आणि स्वःताच्या पायावर उभी राहतील. असे विचार आजीच्या
मनात आले.
प्र. ४. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.
- खंत वाटणे
उत्तर: छोट्याश्या कारणावरून
आपण मित्रावर रागावलो याची राजूला खंत वाटली.
- दिङ्मूढ होणे
उत्तर: कोकणाचे निसर्गसौंदर्य
पाहून मी दिङ्मूढ झालो.
- स्वाभिमान
उत्तर: राज खूप स्वाभिमानी
मुलगा आहे .
- विश्वासाचे हास्य फुलणे
उत्तर: सरांनी केदार चे कौतुक
करताच त्याच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले.
- पक्का निर्धार करणे
उत्तर: परीक्षेत चांगले गुण
मिळविण्याचा सार्थक ने निर्धार केला.
- धक्का बसणे
उत्तर: दादाच्या गाडीला
झालेल्या अपघाताची बातमी ऐकताच मला धक्का बसला.
- जाणीव होणे.
उत्तर: जस जसे वय वाढत जाते तस
तसे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होत जाते.
- थक्क होणे.
उत्तर: सर्कशीतील चित्तथरारक
कसरती पाहून सर्व प्रेक्षक थक्क झाले.
हे सुद्धा पहा: