२४.रोजनिशी इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 6vi marathi rojnishi swadhyay prashna uttare

इयत्ता सहावी विषय मराठी रोजनिशी स्वाध्याय रोजनिशी स्वाध्याय इयत्ता सहावी. Rojnishi eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi
Admin

२४.रोजनिशी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता सहावी मराठी पाठ २४ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - रोजनिशी   प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी रोजनिशी प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी रोजनिशी स्वाध्याय

स्वाध्याय

 

प्र. १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)        वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हांला सर्वांत जास्त आवडले ते लिहा.

उत्तर: वैभव च्या रोजनिशीतले मला १५ नोव्हेंबर चे पान आवडले. कारण त्या दिवशी शाळेतून बसने घरी येताना एक आजोबा आणि त्यांची नात ज्या सीट वर बसले होते त्या ठिकाणी जागा मिळाली. कंडक्टर जेव्हा तिकिटाचे पैसे आजोबांकडे मागू लागला तेव्हा आजोबांनी पैसे काढण्यासाठी खिश्यात हात घातला तर पाकीट कोणीतरी चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. कंडक्टर ने त्यांना पुढील थांब्यावर उतरायला सांगितले. तेव्हा वैभवने स्वतःच्या दप्तरात असलेले खाऊचे पैसे काढून त्या आजोबांचे आणि त्यांच्या नातीचे तिकीट काढले. ही वैभव ची कृती मला खूप आवडली.


(आ)     रोजनिशी का लिहावी? तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. दिवसभरातील घडलेल्या घटनांची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो त्यामुळे आपले विचार लेखनातून स्पष्ट होतात. मनातले भाव लेखनातून व्यक्त करता येतात. दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घटना नोंदवल्या जातात. रोजनिशी आपल्यामध्ये चांगले बदल घडवण्यास मदत करते.

 
इयत्ता सहावी मराठी पाठ २४ स्वाध्याय प्रश्न उत्तरे रोजनिशी   प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी रोजनिशी प्रश्नउत्तरे इयत्ता सहावी विषय मराठी रोजनिशी स्वाध्याय रोजनिशी स्वाध्याय इयत्ता सहावी. Rojnishi  eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Rojnishi swadhyay Rojnishi Rojnishi  swadhyay path prshn uttare

प्र. २. का ते लिहा.


(१)   आजोबांची नात जोराने रडू लागली.

उत्तर:  आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्याने नात जोराने रडू लागली.


(२)      वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले.

उत्तर: आजोबांचे पाकीट कोणी तरी चोरी केले होते. त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते म्हणून वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले.


(३)     आजोबांची नात खुदकन हसली.

उत्तर: वैभवने स्वतः जवळ असलेला बिस्कीट चा पुडा आजोबांच्या नातीला दिला तसेच तिचे डोळे पुसले त्यामुळे आजोबांची नात खुदकन हसली.


(४)       मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.

उत्तर: शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी शेतातील डहाळे उपटले हे पाहून गुरुजी मुलांवर  खूप रागावले. मुलांना स्वतःची चूक लक्षात आल्याने गुरुजी मुलांवर चिडले


(५)    शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले.

उत्तर: मुलांनी स्वःताच्या हातून घडलेल्या चुकीची शेतकऱ्याकडे माफी मागीतारली त्यामुळे शेतकरी खुश झाला आणि त्यामुळे त्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले.


(६)   वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली

उत्तर: राजू आणि वैभव मध्ये रांगेत पुढे उभे राहण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने त्यांचे सर त्यांच्यावर रागावले. शाळेत झालेल्या गैरवर्तनामुळे वैभव ची विशेष काम करण्याची संधी हुकली.

 

खेळूया शब्दांशी


(अ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.


(१) कावरेबावरे होणे.

उत्तर: मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच राज कावराबावरा झाला.


(१)       तोंडाला पाणी सुटणे.  

वाक्य: पाणीपुरी बघून निखील च्या तोंडाला पाणी सुटले.


(२)      वादावादी होणे.

वाक्य: रांगेत पुढे उभे राहण्यावरून निखील आणि सार्थक यांच्यामध्ये वादावादी झाली


(३)      खाली मान घालणे.

वाक्य: आपली चूक लक्षात येताच निखील ने मान खाली घातली.

 

(आ) हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा.

(१) गहू : गव्हाची ओंबी 

(३) ज्वारी: ज्वारीचे कणीस  

(५) ऊस:  उसाचा फड

(२) लसूण : लसणीची पात 

(४) चिंच: चिंचेच बोटुक.

 

 

प्र. ४. हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले. शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते? त्या वस्तूंची यादी करा.

उत्तर: शिवार वा शेतातून जाताना खालील वस्तू पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटते.

१)    कैरी. २) चिंच ३) आवळा ४) बोरे ५) उस  इत्यादी

 

 

Rojnishi  eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Rojnishi - swadhyay Rojnishi - Rojnishi  swadhyay path prshn uttare

प्र. ५. वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा.

उदा., शाळा सुटल्यावर बसस्टॉपवर पोहोचणे.

  • उत्तर: बसमध्ये चढणे
  • आजोबा व नातीजवळ बसण्यासाठी जागा मिळणे.
  • कंडक्टरने तिकिटाचे पैसे मागणे.
  • आजोबांचे पाकीट चोरीला गेल्याचे आजोबांच्या लक्षात येणे.
  • आजोबा व कंडक्टर यांमध्ये चिडलेल्या स्वरात संवाद होणे.
  • आजोबांची नात जोराने रडू लागणे.
  • वैभव ने आजोबा व नातीचे तिकीट काढणे.
  • आजोबांच्या नातीला बिस्कीट चा पुडा देणे व डोळे पुसणे .
  • नातीच्या चेहऱ्यावर हसू उमटणे.

 

 

प्र. ६. तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हांला सांगतात? त्या कामांची यादी  करा.

उत्तर: मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक आम्हांला पुढील विशेष कामे सांगतात.

शाळेच्या परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे. ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावून ठेवणे. शाळेत कोणता कार्यक्रम असल्यास त्या कार्यक्रमाची तयारी करणे.

 

प्र. ७. वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हांला पटले असेल, त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात? तुमचा अनुभव सात-आठ ओळींत लिहा.

उत्तर: खेळाच्या तासाला खेळत असताना अचानक धावता धावता राज जोरात पडला. राज मैदानात पडलेला पाहून आम्ही सर्व जण जोरजोरात हसू लगलो. तेव्हा सर आमच्यावर रागावले. सरांचे आमच्यावर रागावणे हे योग्यच होते.  कारण मैदानात पडलेल्या राज ला लगेच उचलून त्याला लागले तर नाही ना हे बघणे महत्वाचे होते. त्याला मदत करणे त्या वेळी महत्वाचे होते. मदत करायची सोडून आम्ही जोरजोरात हसलो. माझी चूक माझ्या लक्षात आली. शाळा सुटल्यावर मी राज ची माफी मागेन आणि माझी चूक झाली हे सरांकडे जाऊन मान्य करेन.

 

प्र. ८. खालील क्रियांना काय म्हणतात ते लिहा.

उदा., डहाळे - उपटणे

(१) ज्वारीचे कणीस  : कापणे

(२) भेंडी, मिरच्या : खुडणे

(३) रताळी, बटाटे : खणून काढणे

(४) बाजरीचे कणीस : कापणे

(५) ऊस : तोडणे


प्र. ९. खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यांवरून समजते ?


(१)   वैभवची शाळा पाच वाजता सुटते.

उत्तर: शाळेजवळच्या बस स्टॉपवरून  संध्याकाळी साडे पाच वाजता बसमध्ये चढलो


(२)    आजोबांची नात खूप घाबरली.

उत्तर: चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली.


(३)   सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो.

उत्तर: तेथे हरभऱ्याचे डहाळे लावले होते. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले.


(४)          सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली.

उत्तर: आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली.

 

  हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.



✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.