१५.चुंबकाची गंमत स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय / 6th science exercise question answers
चुंबकाची गंमत इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - चुंबकाची गंमत प्रश्न उत्तर - चुंबकाची गंमत स्वाध्याय
प्र.१. कसे कराल ?
अ . पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे .
उत्तर: पदार्थाजवळ चुंबक धरला असतात , जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला तर अशा पदार्थाला चुंबकीय पदार्थ आहे असे ठरवावे . जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला नाही तर तो अचुंबकिय आहे हे ठरेल.
आ . चुंबकाला ठराविक चुंबकीय
क्षेत्र असते , हे समजावून दयायचे आहे .
उत्तर: चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेऊन त्याच्या सभोवताली
लोह्कीस टाकावा. जितक्या भागात त्या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल, त्या भागात
लोह्कीस चुंबकाकडे आकर्षित झालेला दिसेल. लोह्कीस चुंबकाला चिकटत नाही, त्या भागात
चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणतात येईल.
इ.चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे .
उत्तर: एक पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून एका ठिकाणी
टांगून ठेवा. चुंबक कोणत्या दिशेस स्थिर झाला याचे निरीक्षण करा. पुन्हा चुंबक गोल
फिरवा आणि पुन्हा चुंबक कोणत्या दिशेस स्थिर झाला याचे निरीक्षण करा.
चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते . त्याला
उत्तर ध्रुव असे म्हणतात तर दक्षिण दिशेच्या टोकाला दक्षिण ध्रुव असे म्हटले जाते.
चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहील तो चुम्बकाचा उत्तर ध्रुव होय.
आपल्याला आपली उत्तर दिशा कोणती आहे हे माहित नसेल तर होकायंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल. होकायंत्राच्या उत्तर धृवाजवळ चुम्बकाचा उत्तर ध्रुव नेला असतात तो प्रतिकर्षण दाखवतो. जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो चुंबकाचा उत्तर ध्रुव होय.
Chumabakachi ganmat prashn uttre - ६th vidnyan swadhyay prashn uttare. - ६th science question answers
प्र.२.कोणता चुंबक वापराल?
अ. कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे .
उत्तर: विद्युत चुंबक
आ . तुम्ही जंगलात वाट चुकला आहात .
उत्तर: होकायंत्र
हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी भूगोल प्रश्न उत्तरे
इ.खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड - बंद
उत्तर: कायमचे चुंबक
प्र.३. रिकाम्या जागी योग्य
शब्द निवडून विधाने पूर्ण करा.
अ.पट्टी चुंबक मधोमध दोरा
बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या
................... ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो .
( दक्षिण , उत्तर , पूर्व , पश्चिम )
उत्तर: पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो .
आ. एका पट्टी चुंबकाचे त्याच्या
अशाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास .........................पट्टी
चंचुंबक तयार होतात , तर एकूण ..................ध्रुव तयार
होतात .
( 2. 3. 2)
उत्तर: एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अशाला लंब रेषेत दोन
ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास 3 पट्टी चंचुंबक तयार
होतात ,
तर एकूण ६ ध्रुव तयार होतात .
इ.चुंबकाच्या
..................... ध्रुवांमध्ये अतिकर्षण असते , तर त्याच्या ................
ध्रुवांमध्ये आकर्षण असते .
( विजातीय , सजातीय )
उत्तर: चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये अतिकर्षण असते , तर त्याच्या सजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते
Chumabakachi ganmat prashn uttre - ६th vidnyan swadhyay prashn uttare. - ६th science question answers
ई . चुंबकाच्या सान्निध्यात
चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला ................. प्राप्त होते.
( कायम चुंबकत्व , प्रवर्तित चुंबकत्व )
उत्तर: चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला प्रवर्तित चुंबकत्व प्राप्त होते.
उ.एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला
आकर्षून घेतो , तर तो तुकडा .................असला पाहिजे .
( लोखंडाव्यतिरिक्त इतर कोणताही
धातू ,
चुंबक किंवा लोखंडी तुकडा , अचुंबकीय पदार्थ )
उत्तर: एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो , तर तो तुकडा चुंबक किंवा लोखंडी तुकडा असला पाहिजे .
ऊ . चुंबक........................
दिशेत स्थिर राहतो .
( पूर्व - पश्चिम , दक्षिण - उत्तर )
उत्तर: चुंबक दक्षिण - उत्तर दिशेत स्थिर राहतो .
१. प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत
लिहा .
अ . विद्युतचुंबक कसा तयार
करतात ?
उत्तर: विद्युत चुंबक बनवण्यासाठी लोखंडी पदार्थ,
तांब्याची तार, एक विद्युत स्त्रोत इत्यादी गोष्टींची आवश्यकता लागते.
सर्वप्रथम तांब्याची तार लोखंडी पदार्थाला गोल गुंडाळली जाते. या तांब्याच्या तारेला विद्युत स्त्रोत जोडून विद्युत प्रवाह त्यातून सोडला जातो . ज्या वेळी विद्युत प्रवाह या तारेतून जातो तेव्हा लोखंडाच्या वस्तूभोवती तात्पुरते चुंबकत्व तयार होते. विद्युत प्रवाह बंद केल्यास चुंबकत्व नष्ट होते. अशा प्रकारे विद्युत चुंबक तयार करतात.
आ . चुंबकाचे गुणधर्म लिहा .
उत्तर:
चुंबकाचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत.
१) चुंबक हा नेहमी दक्षिण-उत्तर दिशेस स्थिर राहतो.
२) चुंबकाचे दोन्ही ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.
३) एकाच चुंबकाचे दोन भाग केले तरीही त्यापासून तयार होणाऱ्या चुंबकाच्या भागाला दोन स्वतंत्र ध्रुव असतात.
४) चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते.
५) चुंबकाच्या विजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते.
६) चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबक असे म्हणतात.
इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.
चुंबकाची गंमत इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - चुंबकाची गंमत प्रश्न उत्तर - चुंबकाची गंमत स्वाध्याय - सहावी सामान्य विज्ञान चुंबकाची गंमत स्वाध्याय उत्तरे
इ . चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते ? दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे विविध प्रकारचे चुंबक कसे तयार केले जातात , याविषयी माहिती मिळवा . पृथ्वीचे चुंबकत्व याविषयी माहिती मिळवा .
उत्तर:
१) पिन होल्डर तसेच कपाटाच्या दाराला चुंबकाचा वापर केलेला असतो.
२) दारावरची घंटा, क्रेन अशा उपकारणांमध्ये चुंबकाचा वापर केला जातो.
३) संगणकाच्या हार्ड डिस्क, ऑडीओ, व्हिडीओ आणि सीडी अशा साहित्यात देखील चुंबकाचा वापर केला जातो.
४) वैद्यकीय उपचारात एम.आर.आय. सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर केला जातो.
५) ए.टी.एम. कार्ड, क्रेडीट कार्ड्स यांवर असेलेल्या पट्टीमध्ये देखील चुंबकाचा वापर केला जातो.
हे सुद्धा पहा:
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.