१३.ध्वनी स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
स्वाध्याय
ध्वनी प्रश्न उत्तर / ध्वनी स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान ध्वनी स्वाध्याय उत्तरे
१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .
अ . ध्वनीचे प्रसारण .................मधून
होत नाही.
उत्तर: ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळी मधून होत नाही.
आ . ध्वनी प्रदूषण ही एक
........ आहे .
उत्तर: ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे.
इ . कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला .........................म्हणतात
.
उत्तर: कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात .
ई . गोंगाटाचा........................
वर वाईट परिणाम होतो .
उत्तर: गोंगाटाचा स्वास्था वर
वाईट परिणाम होतो .
२. काय करावे बरे ?
अ. मोटारसायकलचा सायलेन्सर
बिघडला असेल , तर...........
उत्तर: मोटार सायकल चा
सायलेन्सर बिघडला असेल तर बिघडलेल्या सायलेन्सर मधून मोठ्या प्रमाणावर ध्वनी
निर्मिती होते. त्यामुळे बिघडलेला सायलेन्सर वेळीच दुरुस्त करून घ्यावा.
आ . परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल ,तर..........
उत्तर: परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर, त्या कारखान्यामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जात आहे की याची पाहणी करावी. संबंधित कारखान्याबाबत परिसरातील शासकीय संस्थेची संपर्क साधून सदर कारखान्याच्या मोठ्या आवाजाबाबत तक्रार करावी.
हे सुद्धा पहा: 10.बल व बलाचे प्रकार इयत्ता ६वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Dhwani swadhyay prashn uttare / Dhwani prashn uttre / ६th vidnyan swadhyay prashn uttare. / ६th science question answers
३. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा .
अ . कंपन म्हणजे काय ?
उत्तर: एखाद्या वस्तूची तिच्या स्थिर स्थितीभोवती होणारी लयबद्ध किंवा यादृच्छिक
हालचाल होणे म्हणजेच आंदोलन होते; यालाच
कंपन असे म्हंटले जाते.
आ . ध्वनीचे प्रसारण स्थायूंतून
कसे होते , व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा .
उत्तर: ध्वनीचे प्रसारण स्थायुंतून
अधिक वेगाने होते. स्थायू माध्यमातून ध्वनी अधिक स्पष्ट ऐकू येतो.
उदा.: दरवाजावर टकटक केल्यावर
दरवाज्या पलीकडे असणाऱ्या व्यक्तीला आवाज जलद ऐकू जातो.
रेल्वे रुळाला कान लावून
दूरवरून येणाऱ्या गाडीचा अंदाज घेतला जातो.
इ . ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ? ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल ?
उत्तर: ध्वनी प्रदूषण म्हणजे
ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय.
ध्वनी प्रदूषणावर उपाय
१) गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नयेत.
२) घरातील टीव्ही, रेडीओचे आवाज आपल्यापुर्तेचे मर्यादित ठेवावेत.
३) वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी.
४) कारखाने, विमानतळे, रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत.
ध्वनी स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान ध्वनी स्वाध्याय उत्तरे / Dhwani swadhyay prashn uttare
४. तक्ता पूर्ण करा .
ध्वनीचे स्वरूप |
त्रासदायक असणारे |
त्रासदायक नसणारे |
बोलणे |
नाही |
होय |
कुजबुजणे |
नाही |
होय |
विमानाचा आवाज |
होय |
नाही |
गाड्यांचे हॉर्न |
होय |
नाही |
रेल्वे इंजिन |
होय |
नाही |
पानांची सळसळ |
नाही |
होय |
घोड्याचे खिंकाळणे |
नाही |
होय |
घड्याळाची टिकटिक |
नाही |
होय |
हे सुद्धा पहा:
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.