१५. एक अपूर्व सोहळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ एक अपूर्व सोहळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे स्वाध्याय - एक अपूर्व सोहळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे स्वाध्याय - एक अपूर्व सोहळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
प्र.१. रिकाम्या जागी कंसातील
योग्य पर्याय लिहा .
(अ)शिवरायांनी राजधानीसाठी............................
निवड केली .
(सिंहगडाची , रायगडाची , पन्हाळगडाची)
उत्तर: शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली .
(आ) शिवरायांचा राज्याभिषेक सन ................ मध्ये झाला.
( १६७४ , १६७५ , १६४७ )
उत्तर: शिवरायांचा राज्याभिषेक सन १६७४ मध्ये झाला.
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(अ) सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते ?
उत्तर: सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते.
(आ) शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला ?
उत्तर: शिवरायांनी राज्याभषेकापासून ‘राज्याभिषेक’ हा शक सुरु केला.
Ek apurva sohala iyatta chouthi swadhyay prashn uttare - Ek apurva sohala swadhyay prashan uttare - 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 15 - 4th standard - evs 2 chapter 15 question answers
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .
(अ) शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे
का ठरवले ?
उत्तर: मराठ्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले.
(आ) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली ?
उत्तर: रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. म्हणून शिवरायांनी रायगडाची निवड केली.
हे सुद्धा पहा: ४थी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(इ) मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का वाहू लागले ?
उत्तर: जलाभिषेका नंतर शिवराय उठले आणि आणि जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टांचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माउलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रुंवाटे बाहेर पडला. म्हणून मासाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके | |
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.