१८. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Lokkalyankari swarajyache vyavsthapn 4th std swadhyay prashna uttare

१८. लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

 इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय - लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय - लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी

प्र.१. सांगा पाहू्!


(अ)         स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.

उत्तर: शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणी जंजिरेकर सिद्दी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.


हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग २  स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


(आ)    स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही.

उत्तर: १)शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे- मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले.

२)या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले.

३)त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले.

त्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही.


इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन स्वाध्याय लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन प्रश्न उत्तर इयत्ता चौथी लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन प्रश्न उत्तरे Lokkalyankar swarajyache vyavsthapn iyatta chouthi swadhyay prashn uttare Lokkalyankar swarajyache vyavsthapn swadhyay prashan uttare 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 18 4th standard evs 2 chapter 18 question answers

(अ)         शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब.

उत्तर: १) कर्नाटकातील बेलवडी येथील गढी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते.

२)तेथील गढीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. ३) या  पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली.

४)तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली, तसेच

५)तिला ‘सावित्री’ हा किताब दिला.

हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

प्र.२. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

 

प्रधानाचेनाव

पद

काम

१.

मोरो त्रिंबक पिंगळे

प्रधान

राज्यकारभार चालवणे.

२.

रामचंद्र नीळकंठ मुजुमदार

अमात्य

राज्याचा जमाखर्च पाहणे.

३.

हंबीरराव मोहिते

सेनापती

सैन्याचे नेतृत्व करणे.

४.

मोरेश्वर पंडितराव

पंडितराव

धर्माची कामेपाहणे.

५.

निराजी रावजी

न्यायाधीश

न्यायदान करणे.

६.

अण्णाजी दत्तो

सचिव

सरकारी आज्ञापत्रे पाठवणे.

७.

दत्ताजी त्रिंबक वाकनीस

मंत्री

पत्रव्यवहार सांभाळणे.

८.

रामचंद्र त्रिंबक डबीर

सुमंत

परराज्यांशी संबंध ठेवणे.

 

Lokkalyankar swarajyache vyavsthapn swadhyay prashan uttare - 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 18 - 4th standard evs chapter 18 question answers

हे सुद्धा पहा: ४थी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

 प्र.३.  चर्चा करा.

पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशा प्रकारे घेतलेली दिसून येते. तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल ?

उत्तर: १)शिवरायांनी आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत, याकडे अधिक लक्ष दिले. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलखातून खरेदी करण्यास सांगितले. आंबे , फणस इत्यादी झाडे तोडण्यास नकार दिला. अशा प्रकारे पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी घेतली.

२)मी पर्यावरणासाठी पुढील गोष्टी करेन:

१)पाण्याचा वापर काळजीपूर्वक करेन.

२) सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणार नाही.

३) जास्तीत जास्त झाडे लावण्यावर भर देईन.

४) पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करेन.

लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन प्रश्न उत्तर - इयत्ता चौथी लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन प्रश्न उत्तरे - Lokkalyankar swarajyache vyavsthapn iyatta chouthi swadhyay prashn uttare - Lokkalyankar swarajyache vyavsthapn swadhyay prashan uttare

प्र.४. वाचा व तुमच्या शब्दांत माहिती सांगा.

‘जल व्यवस्थापन’ या विषयीची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दांत माहिती सांगा.

उत्तर: जल संवर्धन आणि जल व्यवस्थापन करून आपण पाण्याचे स्त्रोत सुरक्षित करू शकतो. पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो.

·        जुन्या काळापासून चालत आलेल्या पाणी संग्रहित करणाऱ्या रचनांचे पुनरुज्जीवन.

·        जुनी तळी  आणि तलाव यांचे नूतनीकरण

·        शहरी भागांत वाहून जाणारे पाणी अडवून त्याचे संवर्धन करणे.

·        पाण्याचा प्रभावी वापर वाढवून पाण्याची मागणी कमी करणे.

घटत जाणारी गोड्या पाण्याची पातळी आणि वाढती मागणी त्यामुळे पाण्याचे संवर्धन करून त्याचे साठे भविष्यासाठी सुरक्षित करून ठेवणे गरजेचे आहे. देशाला या जलसंवर्धन कार्यक्रमासाठी वेगाने कामाला लागणे गरजेचे आहे.  पाण्याचा वापर कमी करण्याचे तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर पाण्याचे प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने विशेष पावले उचलणे आवश्यक आहे.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

  हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.