१२. साधी यंत्रे स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय / ६th science exercise
question answers
साधी यंत्रे इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / साधी यंत्रे प्रश्न उत्तर / साधी यंत्रे स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान साधी यंत्रे स्वाध्याय उत्तरे
प्र.१.आमचे वर्गीकरण करा .
तरफ , कप्पी, उतरण , पाचर , सुई , जिना , घसरगुंडी ,
ध्वजस्तंभाची वरची चक्री , अडकित्ता , कात्री , ओपनर , कुन्हाड क्रेन
, सुरी .
उत्तर:
पाचर: कुऱ्हाड, सुई, सुरी.
गुंतागुंतीचे यंत्र: क्रेन.
साधी यंत्रे: तरफ, कप्पी,
उतरण, पाचर.
उतरण: घसरगुंडी
चाक व आस : ध्वजस्तंभाची वरची
चक्री
तरफ : अडकित्ता, कात्री, ओपनर.
प्र. २. रिकाम्या जागी योग्य
शब्द भरून विधाने पूर्ण करा .
अ . मध्यभागी ...............असून
एका बाजूला .......... व दुसन्या बाजूला ......... हा तरफेचा पहिला प्रकार आहे .
उत्तर: मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल व दुसन्या बाजूला भार हा तरफेचा पहिला प्रकार आहे .
आ . मध्यभागी ...........असून
एका हा बाजूला ............... व दुसऱ्या बाजूला .......... हा तरफेचा दुसरा
प्रकार आहे .
उत्तर: मध्यभागी भार असून एका हा बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तरफेचा दुसरा प्रकार आहे .
इ . मध्यभागी .... असून एका
बाजूला ....... व दुसऱ्या बाजूला हा तरफेचा तिसरा प्रकार आहे.
उत्तर: मध्यभागी बल असून एका
बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तरफेचा तिसरा
प्रकार आहे.
Sadhi yantre prashn uttre / ६th vidnyan swadhyay prashn uttare. / ६th science question answers
प्र.३.खालील कामे करण्यासाठी
कोणती यंत्रे वापराल ? त्यांचे प्रकार लिहा.
अ . टिनच्या डब्याचे झाकण काढणे .
उत्तर:
यंत्र: टीन ओपनर
यंत्राचा प्रकार: उतरण
आ . उंच इमारतीवर विटा पोहोचवणे.
उत्तर:
यंत्र: वजन उचलण्यासाठी चाक व
दोरी
यंत्राचा प्रकार: कप्पी
हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी भूगोल प्रश्न उत्तरे
इ . भाजी चिरणे .
उत्तर:
यंत्र: विळी किंवा सुरी.
यंत्राचा प्रकार: पाचर
ई . विहिरीतून पाणी काढणे .
उत्तर:
यंत्र: रहाट दोरखंड
यंत्राचा प्रकार: कप्पी
3. पापड भाजणे.
उत्तर:
यंत्र: चिमटा
यंत्राचा प्रकार: तरफ
अ. साधी यंत्रे म्हणजे काय?
उत्तर: दैनंदिन जीवनात कमी
वेळेमध्ये तसेच कमी श्रमाने जास्तीत जास्त कामे व्हावीत यासाठी ज्या साधनांचा वापर
केला जातो त्यांना ‘यंत्रे असे म्हटले जाते.
या यंत्रांमध्ये एक-दोन भाग
असतील आणि त्यांची रचना साधी आणि सोपी असेल तर अशा यंत्रांना साधी यंत्रे असे
म्हटले जाते.
आ. यंत्र वापरण्याचे फायदे सांगा.
उत्तर: यंत्रांचा वापर
केल्याने दैनंदिन जीवनात कमी वेळेमध्ये तसेच कमी श्रमाने जास्तीत जास्त कामे करता
येणे शक्य होते. यंत्राचा वापर केला नाही तर तेच काम पूर्ण करण्यासाठी जास्त
कालावधी तसेच जास्त बलाचा वापर करावा लागेल.
इ. गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय?
उत्तर: ज्या यंत्रांमध्ये अनेक
भाग एकमेकांशी जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात.
अशा यंत्रांमध्ये एक काम
पूर्ण करण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण होत असतात.
या यंत्रांमध्ये सध्या यंत्रांचेच काही भाग जोडलेले असतात, अनेक भाग एकत्र जोडलेले असल्याने अशा यंत्रांची रचना क्लिष्ट असते.
ई. तरफ म्हणजे काय ? तरफेचे प्रकार कशावरून केलेले आहेत?
उत्तर: तरफ हा एक सध्या
यंत्राचा प्रकार आहे. या तर्फेच दंड ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला तरफेचा
टेकू असे म्हटले जाते.
तरफेने जी वस्तू उचलली जाते
किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते
तिला भार असे म्हणतात. टेकूपासून भारपर्यंतच्या तरफेच्या भागाला भारभुजा असे
म्हटले जाते.
बल, टेकू आणि भार यांच्या स्थानांवर तरफेचे तीन प्रकार पडतात.
प्र.५. असे का ?
अ . प्रवासी बॅगांना चाके असतात
उत्तर: प्रवासी बॅगांना असलेली चाके हे एक साधे यंत्र आहे. प्रवासी बॅगेमध्ये खूप वजन असल्याने ती उचलून नेण्यापेक्षा ती ढकलत नेणे कमी कष्टाचे आणि सोयीचे होते. यामध्ये श्रम आणि वेळ या दोन्हीची ही बचत होते. म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात.
आ . यंत्राची निगा राखावी लागते .
उत्तर: यंत्रे वापरली जात असताना
यांचे भाग एकमेकांवर घासतात. धूळ बसून खराब झालेल्या भागांमध्ये अधिक घर्षण होते.
हवामानाच्या परिणामाने काही भाग गंजतात असे भाग घासले जाऊन त्यांची झीज होते.
त्यामुळे यंत्रे निकामी होतात. हे टाळण्यासाठी यंत्रांची निगा राखावी लागते.
इ . सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे .
उत्तर:सायकल बनवताना अनेक साधी यंत्रे एकमेकांना जोडून तयार केली जाते. सायकल ला लावलेली चाके, स्टीअरिंग , पेंडल अशा प्रकारच्या साध्या यंत्रांचे भाग एकत्र जोडले गेलेले असतात. म्हणून सायकल हे एक गुंतागुंतीचे यंत्र आहे.
साधी यंत्रे स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान साधी यंत्रे स्वाध्याय उत्तरे / Sadhi yantre swadhyay prashn uttare
६. खाली दिलेल्या उताऱ्यातील तरफेमध्ये
टेकू ,
भार बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा.
रवी व सविता
बागेमध्ये एका सी - सॉवर बसतात . दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो
. तो माणूस बागेतील कचरा , दगडगोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये
टाकतो . नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो सरबत विक्रेता लिंबू
चिरून लिंबू पिळणीच्या साहाय्याने सरबत करून देतो व त्या ग्लासामध्ये बर्फाचे छोटे
छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो.
उत्तर:
यंत्र |
टेकू |
भार |
बल |
प्रकार |
चिमटा |
दुसऱ्या बाजूला |
मध्यभागी |
एका बाजूला |
तिसरा |
लिंबू पिळणी |
एका बाजूला |
दुसऱ्या बाजूला |
एका बाजूला |
दुसरा |
कात्री |
मध्यभागी |
एका बाजूला |
दुसऱ्या बाजूला |
पहिला |
सी-सॉ |
मध्यभागी |
एका बाजूला |
दुसऱ्या बाजूला |
पहिला. |
कचरा गाडी |
एका बाजूला |
दुसऱ्या बाजूला |
मध्यभागी |
दुसरा |
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.
हे सुद्धा पहा: