पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प pdf | Environmental project information in marathi
Project पर्यावरण प्रकल्प pdf project पर्यावरण प्रकल्प १२वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११th पर्यावरण प्रकल्प ११वी विषय प्रकल्प कार्य व जनरल कार्य
माझा अभ्यास (www.mazaabhyas.com) या
शैक्षणिक वेबसाईटवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज या लेखाच्या माध्यमातून आपण Evs
project in marathi language ( पर्यावरण प्रकल्प pdf ). सर्व विद्यार्थ्यांना
उपयुक्त ठरणारे पर्यावरण व जलसुरक्षा प्रकल्प तसेच इतर evs project pdf सहित
उपलब्ध करून देल्यंत आले आहेत. या प्रकल्पांच्या नमुन्यांतून तुम्हाला प्रकल्प प्रसातावना,
प्रकल्प विश्लेषण, प्रकल्प उद्दिष्ट्ये, प्रकल्प निरीक्षणे यांसारख्या प्रकल्प
लिहिताना प्रकल्पामध्ये आवश्यक असणार्या
सर्व मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.
(खाली पर्यावरण प्रकल्प विषय दिले आहेत. तुम्हांला हवा असलेला प्रकल्प पाहण्यासाठी खालील अनुक्रमणिकेत असलेल्या प्रकल्पाच्या नावावर क्लिक करा. )
प्रकल्पाचे मूल्यमापन करीत
असताना खालील मुद्दे विचारात घेतले जातील.
१ ) प्रकल्प प्रस्तावना (प्रकल्प विषयाची निवड ) :
प्रस्तावना लिहित असताना आपण
जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या विषयाबाबत थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित असते.
उदा: निवडलेल्या पर्यावरण
प्रकल्प विषयातून तुम्ही कोणती पर्यावरणीय समस्या मांडली आहे, प्रकल्पाचा हा विषय
निवड करण्यामागे तुमचा हेतू काय होता, संकल्पना, निवडलेल्या प्रकल्प विषयाचा
थोडक्यात इतिहास , त्या विषयाबद्दल नवीन माहिती तसेच निवडलेल्या विषयाची सध्याची
स्थिती काय आहे यांसाख्या घटकांचा समावेश
प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी करावा.
२ ) विषयाचे महत्त्व :
आपण जो प्रकल्प विषय निवडला
आहे. त्या प्रकल्प विषयाचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व काय आहे. याबाबत
थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित. यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे
पर्यावरणविषयी ,शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने
लिहावे .
३ ) प्रकल्प कार्याची उद्दिष्ट्ये :
ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय
निवडला , त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट्ये
लिहिणे आवश्यक आहे .
४ )प्रकल्प कार्यपद्धती :
प्रकल्प
कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यासपद्धतीचा वापर करता
येतो . जसे - सर्वेक्षण , प्रश्नावली , मुलाखत , प्रयोग , क्षेत्र निरीक्षणे , क्षेत्रभेट इत्यादी पद्धतीचा अवलंब
करावा . पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला
अनुसरून असला पाहिजे. जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची
त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
५ ) निरीक्षणे :
निवडलेल्या
कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे , आलेख तक्त्याच्या स्वरूपात प्रदर्शित
करावी , तसेच संक्षिप्त व मुद्देसूद असावीत . निरीक्षणावरच
पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण
संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्वाचा टप्पा आहे . मध्य , मध्यमान , सहसंबंध , सरासरी , टक्केवारी इत्यादीच्या आधारे
विश्लेषण अधिक अचूक के प्रभावी होते . सदर पद्धतीने आपण आलेख , स्तंभालेख , पायआलेख , अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे
दर्शवू शकतो.
६) निष्कर्ष :
विश्लेषणावरून प्राप्त झालेल्या
माहितीच्या आधारावर प्रकल्पाचा निष्कर्ष
लिहावा.
प्रकल्प करताना खालील मुद्द्यांचा
प्रकल्पामध्ये अवश्य समावेश करा.
१) प्रकल्प विषय प्रस्तावना२) विषयाचे
महत्व३) प्रकल्प
कार्य उद्दिष्ट्ये४) प्रकल्प
कार्यपद्धती५) प्रकल्प निरीक्षणे६) विश्लेषण७) निष्कर्ष८) संदर्भ
( खलील link वर क्लिक केल्यावर पुढील पर्याय दिसत असेल तर The page you were on is trying to send you to .....या पर्यावर क्लिक करा. )
पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प ११th पर्यावरण प्रकल्प ११वी विषय प्रकल्प कार्य व जनरल कार्य जलसुरक्षा प्रकल्प मराठी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा प्रकल्प १२वी pdf
Environmental project in Marathi Evs project in Marathi pdf Evs project in Marathi 11th Evs project in Marathi pdf download
Evs project in Marathi 11th Evss project in Marathi pdf download Evs project in Marathi language १२th environmental project in Marathi language pdf
१२th environmental project in Marathi language pdf Paryavarn shikshan va jal suraksha prakalpa Paryavarn prakalp in Marathi pdf download Paryavarn prakalp
✏✏✏✏✏✏ALL THE BEST ✏✏✏✏✏✏
- खाली दिलेल्या शेअर बटण वर क्लिक करून हे प्रकल्प तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.
- प्रकल्प माहिती कशी वाटली आम्हांला कमेंट करून सांगा.
- मूळ स्त्रोत: www.educationalmarathi.com ( Educational मराठी)