सातवी इतिहास व नागरिकशास्त्र मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7th Standard Margadarshk tatwe aani mulbhut kartavye itihas nagarikshastra swadhyay question answer
मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये या पाठाचा स्वाध्याय पाठ सहावा मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी
१. शासनावर कोणते निर्बंध असतात, याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा.उत्तर :
· शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यांवर आधारित भेद करू नये.
· कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये.
· कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये.
· धार्मिक कर लादू नयेत.
२.खालील विधाने वाचा व होय/नाही असे उत्तर लिहा.
(१) वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला, पुरुष या सर्वांसाठी
जागा असतात....
उत्तर :होय
(२) एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री- पुरुषाला
वेगवेगळे वेतन मिळते ..........
उत्तर : नाही
(३) शासनाद्वारे आरोग्य
सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात .........
उत्तर : होय
(४) राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या
वास्तू,
स्मारके यांचे संरक्षण करावे ........
उत्तर : होय
३. का ते सांगा.
(१) ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे.
उत्तर :
१.ऐतिहासिक वास्तू , इमारती ,
स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे.
२.संविधानाने अशा वास्तूंचे जतन
करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे. या तत्वाच्या आधारे वास्तूसंरक्षण
कायदाही संसदेने संमत केलेला आहे. म्हणून आपण ऐतिहासिक वास्तु, इमारती, स्मारके
यांचे संरक्षण करावे, तसेच ते आपले कर्तव्यही आहे.
(२) वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते.
उत्तर :
१.वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते; म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे. या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वत वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे, ही बाब नमूद केलेली आहे.
२.वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन
नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते.
(३) ६ ते १४ वयोगटांतील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
उत्तर :
१.६ ते १४ वयोगटातील
मुला-मुलींनी शाळेत जावून शिक्षण घेतले पाहिजे, परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले
शिक्षण घेऊ शकत नाहीत. पालक त्यांना कामावर पाठवतात. त्यामुळे निरक्षरता वाढते.
२.या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मुलभूत कर्तव्यही ठरवले आहे. म्हणून शासनाने ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
Maargdarshk tatwe v mulbhut kartvye swadhyay 7vi Margadarshk tatwe v mulbhut kartavye swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers
४. योग्य की अयोग्य का तेसांगा. अयोग्य विधान दुरुस्त करा.
(१) राष्ट्रध्वज जमिनीवर पडून देणे.
उत्तर :अयोग्य कारण राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे आपले मुलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास शिक्षा होते.
(२) राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे.
उत्तर :योग्य , कारण राष्ट्रगीताचा आदर राखणे हे आपले मुलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्यास शिक्षा होते.
(३) आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे/कोरणे.
उत्तर : आयोग्य , कारण
ऐतिहासिक वासू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे
हे आपले मुलभूत कर्तव्य आहे. वास्तूचे सौंदर्य जपण्यासाठी ऐतिहासिक वास्तूवर आपले
नाव लिहू किंवा कोरु नये.
(४) सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे.
उत्तर :
अयोग्य , कारण समान कामासाठी
समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आहे. स्त्री-पुरुष समानता हे तत्व आपण मान्य
केले आहे. म्हणून सारख्याच कामासाठी पुरुष व स्त्रियांना समान वेतन दिले पाहिजे.
(५) सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे.
उत्तर :
योग्य, कारण पर्यावरणाचे जतन
व रक्षण करणे हे आपले मुलभूत कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न
करणे या तत्वाचा मार्गदर्शक तत्वात समावेश आहे, म्हणून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ
ठेवली पाहिजेत.
इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र गाईड मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये धडा सहावा स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी
५. लिहिते होऊया.
(१) संविधानातील काही
मार्गदर्शक तत्त्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत. ती कोणती?
उत्तर :
१.शासनाने उपजीविकेचे साधन
सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये.
२.स्त्री व पुरुषांना समान
कामासाठी समान वेतन द्यावे.
३.लोकांचे आरोग्य
सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
४.पर्यावरणाचे रक्षण करावे.
५.राष्ट्राच्या दृष्टीने
महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे.
६.समाजातील दुर्बल घटकांना
विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
७.भारतातील सर्व नागरिकांसाठी
समान नागरी कायदा करावा.
८.वृद्धापकाळ, अपंगत्व,
बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे.
(२) भारतीय संविधानातील
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली
असेल?
उत्तर :
१.संविधानाने सर्व भारतीय
नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे. शासन नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा,
लिंग यांवर आधारित भेदभाव करू शकत नाही.
२.तरीही संविधानाने अल्पसंख्य
लोकसमूह, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत.
३.नागरिकांमध्ये अधिकारांबाबत
भेदभाव होऊ नये, अशी परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद
मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे.
(३) मार्गदर्शक तत्त्वे आणि
मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे का म्हटले जाते?
उत्तर :
१.मुलभूत हक्कांमुळे
नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते; तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाही
मुल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.
२.मुलभूत हक्कांना कायद्याचे
संरक्षण असते. मार्गदर्शक तत्वांना कायद्याचे संरक्षण नसते, परंतु जनता शासनावर
दबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते.
३.मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा
नागरिकांचे हक्कच आहेत; परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही;
म्हणून मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत हक्क्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे
म्हटले जाते.
६. पर्यावरणाचे जतन व संरक्षण
नागरिक कशा प्रकारे करू शकतात, हे उदाहरणांसह लिहा.
उत्तर :
पर्यावरण शुद्ध आणि पोषक
ठेवले तर नागरिकांचे आरोग्य पोषक राहते. पर्यावरण शुद्ध ठेवणे ही केवळ शासनाचीच
जबाबदारी नाही. नागरिकांच्या सहभागानेचे हे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
म्हणून पुढील गोष्टींची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे.
१)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
करणे. वृक्षतोड थांबवणे.
२)धूर सोडणाऱ्या गाड्यांचे
वेळेवर दुरुस्ती करणे.
३)कारखाने लोकवस्तीपासून दूर
असावेत व त्यांच्या चिमण्या उंचावर असाव्यात. त्यांचे दुषित पाणी नदीमध्ये सोडू
नये.
४)गटाराचे पाणी नदी-नाल्यांत
जाणार नाही याची काळजी घ्यावी.
५)प्लास्टिक वापर पूर्णतः बंद
करावा.
६)स्वच्छता अभियानासारखे
उपक्रम व विविध शिबिरे यांचे आयोजन करावे.
**********
हे देखील पहा:
इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......
स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळ