६.मुघलांशी संघर्ष स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र |Mughalanshi sangharsh swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra .

मुघलांशी संघर्ष प्रश्न उत्तरे इयत्ता सातवीमुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्यायMughalanshi sangharsh swadhyay prashn uttarItihas nagarikshastra swadhya
Admin

मुघलांशी संघर्ष इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

 मुघलांशी संघर्ष प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय - पाठ  सहावा  मुघलांशी संघर्ष स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  - इयत्ता सातवी इतिहास गाईड

स्वाध्याय

प्रश्न १. खालील घटना कालानुक्रमे लिहा.

१)    शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम

२)    लाल महालावर छापा

३)    आग्र्याहून सुटका

४)    राज्याभिषेक

५)    पुरंदरचा तह

६)    शायिस्ताखानाची स्वारी


उत्तर:

६)      शायिस्ताखानाची स्वारी

२)      लाल महालावर छापा

५)      पुरंदरचा तह

३)      आग्र्याहून सुटका

४)      राज्याभिषेक

१)      शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम

मुघलांशी संघर्ष प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय  पाठ  सहावा  मुघलांशी संघर्ष स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  इयत्ता सातवी इतिहास गाईड  मुघलांशी संघर्ष भारत धडा सहावा स्वाध्याय  इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी  Mughalanshi sangharsh swadhyay 7vi  Mughalanshi sangharsh  swadhyay prashn uttar  Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf  Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


प्रश्न २. शोधा म्हणजे सापडेल.


(१)  संस्कृत शब्द असणारा कोश –

उत्तर: राज्यव्यवहारकोश


(२)त्र्यंबकगड जिंकून घेणारा –

उत्तर: मोरोपंत पिंगळे


मुघलांशी संघर्ष भारत धडा सहावा स्वाध्याय - इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी
Mughalanshi sangharsh swadhyay 7vi - Mughalanshi sangharsh  swadhyay prashn uttar


(३)वणी-दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार –

उत्तर: दाउदखान


(४)  इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण-

उत्तर: सुरत

 

प्रश्न ३. तुमच्या शब्दांत लिहा.

 

(१)  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

उत्तर:

  • ६ जून १६७४ या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात पार पडला.
  • या राज्याभिषेकाद्वारे शिवाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. आणि त्या दिवसापसुन ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरु करून छत्रपती शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले.
  • राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराजांनी सोन्याचा ‘होन’ व त्यांब्याची ‘शिवराई’ ही खास नाणी पाडली. आणि या नाण्यावर ‘श्री राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे कोरण्यात आली.
  • तेथूनच पुढे राजपात्रांवर ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असा उल्लेख होऊ लागला.

Mughalanshi sangharsh  swadhyay prashn uttar - Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf -Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers 



(2)आग्र्याहून सुटका

उत्तर:

1)    शिवाजी महाराज जयसिंगराजावर विश्वास ठेऊन औरंगजेब बादशहाच्या भेटीला आगऱ्याला गेले.

2)   बादशाहाने तेथे त्यांना नजरकैदेत ठेवले. नजर कैदेतून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी योजना आखली आणि ते आग्र्याहून शिताफीने निसटले.

3)   आग्र्याहून येताना संभाजी राजांना त्यांनी मथुरा येथे ठेवले. पुढे त्यांनाही सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्यात आले.


(३) शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम

उत्तर:

१)ऑक्टोबर १६७७ मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली.

२) गोवळकोंड्याला त्यांनी कुतुबशहाशी मैत्रीचा तह केला.

३) पुढे महाराजानंनी कर्नाटकातील बंगळूरू, होसकोटे, तसेच सध्याचा तमिळनाडू मधील जिंजी वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर भाग जिंकून घेतला.

४) या मोहिमेदरम्यान फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही.

 

(४)   शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी

उत्तर:

१)शिवरायांच्या राज्याभिषेकाची तयारी जवळपास दोन ते तीन वर्षांपासूनच सुरु होती.

२) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मोल्यवान व भव्य सिंहासन बनवण्यात आले .

३) राज्याभिषेकावेळी निरनिराळ्या प्रांतातून जे श्रेष्ठ विद्वान होते ते आले होते.

४) सोन्याची व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली ज्यावर राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली होती.

५)पौरोहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागाभट्ट यांना बोलवण्यात आले होते.


प्रश्न ४. कारणे लिहा.


(१)  शिवरायांनी पुरंदरचा तह केला.

उत्तर:

१)    शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी विविध भागांत मुघल बादशाहाने सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या.

२)     त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली.

३)    मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली, परंतु त्याला वीरमरण आले.

४)    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवरायांनी जयसिंगासोबत पुरंदरचा तह केला.


(२) शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

उत्तर:

१)मुघल सैन्याने आक्रमण करून स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती.

२)पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्‌दिष्ट होते.

३)हे किल्ले व भूप्रदेश मुघलांकडून परत मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.

 

  **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.