सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १ - सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता सातवी - सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण प्रश्न उत्तरे - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पहिला धडा स्वाध्याय
1. शोधा पाहू माझा जोडीदार !
‘अ’ गट |
‘ब’ गट (उत्तरे) |
1.
कमळ |
ई. पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित. |
2.
कोरफड |
इ. वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित. |
3.
अमरवेल |
आ. अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात. |
4.
घटपर्णी |
अ. फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात. |
2. परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
मी पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो.
अ. माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे?
उत्तर: पेंग्विन हा प्राणी बर्फाळ प्रदेशात राहतो. तेथील हवामान कायम थंड असते. शरीराचे तापमान योग्य राहावे यासाठी त्वचा जाड असून त्या खाली चरबीचे आवरण असते. पांढऱ्या रंगाच्या त्वचेमुळे तो पांढऱ्या बर्फाळ प्रदेशमध्ये मिसळून जातो आणि चटकन दृष्टीस पडत नाही त्यामुळे त्याचे त्याच्या शत्रूपासून संरक्षण होते.
आ. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो?
उत्तर: नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून राहिल्याने पिल्लांची काळजी घेणे तसेच भक्षकापासून संरक्षण मिळविणे सोपे होते. एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून उब मिळते.
इ.ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का?
उत्तर: ध्रुवीय प्रदेशमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासठी , शीत वातावरणात वास्तव्य करणे जमणे गरजेचे आहे. त्यासाठी शरीरावर जाड त्वचा चरबीचा जाड ठार किंवा लव , केस यांचा जाड थर असला पाहिजे.
ई. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो? का?
उत्तर:
3. खोटे कोण बोलतो?
अ. झुरळ : मला पाच पाय आहेत.
उत्तर: झुरळ खोटे बोलते
झुरळाला सहा पाय आहेत.
आ. कोंबडी : माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत.
उत्तर: कोंबडी खोटे बोलते
कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात.
ई. निवडुंग : माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे.
उत्तर: निवडुंग खोटे बोलतो.
4. खालील विधाने वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा.
अ. वाळवंटात खूप उष्णता आहे.
उत्तर: वाळवंटी
प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे
राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात.
नाकावर त्वचेची घडी असते. पापण्या लांब व जाड असतात. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी
खोलवर बिळात राहतात.
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा पहिला स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता सातवी सामान्य विज्ञ गाईड pdf - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १ - सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता सातवी
आ. गवताळ प्रदेश हिरवागार असतो.
उत्तर: गवताळ प्रदेशामध्ये
पाण्याची उपलब्धता अधिक असते. त्यामुळे गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी
झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळून येतात. गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप
थांबवते. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते. त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू
शकतात; डोंगरउतारावर, पठारी व मैदानी प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात.
इ. कीटक जास्त प्रमाणात आढळतात.
उत्तर: कीटक वर्गातील प्राणी
हे पर्यावरणातील बदलांशी जास्त प्रमाणात अनुकूलीत झालेले असतात. कीटकांची शरीरेही निमुळती, हलकी असतात. पंखांच्या दोन जोड्या व काडीसारखे सहा पाय अशा रचनेमुळे कीटक
हवेत उडू शकतात, तसेच ते जमिनीवर चालू देखील शकतात. अधिवासानुसार,
भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे,
शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा बाबतींत कीटकांचे अनुकूलन झालेले
असते. त्यामुळे कीटक जास्त प्रमणात आढळतात.
ई. आम्ही लपून बसतो.
उत्तर: लपणाऱ्या
प्राण्यांच्या गटामध्ये आम्ही दुबळे प्राणी राहतो. आमच्या शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे हा
आमच्या लपण्यामागील मूळ हेतू असतो. त्यासाठी आमच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या
रंगाशी मिळताजुळता राहतो. तर दुसरे स्वतःच भक्षक असतात. सरड्यासारखे प्राणी स्वतः
परिसराशी साधर्म्य साधून दिसेनासे होतात. पण नेमके भक्ष पकडण्यासाठी अचानक झेप
घेतात.
उ. आमचे कान लांब असतात.
उत्तर: आम्ही शाकाहारी प्राणी.
आमचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही नेहमी
कनोसा घेत असतो. धोक्याची जाणीव होताच आम्ही कळपाने तेथून पळ काढतो.
5. खालील प्रश्नांची उत्तरे
तुमच्या शब्दांत लिहा.
अ. उंटाला ‘वाळवंटातील जहाज’ का म्हणतात?
उत्तर:
१)शरीरातील पाणी टिकवून
ठेवण्यासाठी उंटाची त्वचा जाड असते.
२) उंटाच्या नाकावर त्वचेची
घडी असते त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते.
३) लांब व जाड पापाण्यांपासून
उंटाच्या डोळ्यांचे वाळवंटातील धुळीपासून संरक्षण होते.
४)उंट पाण्याशिवाय बराच काळ
राहू शकतो.
५) या सर्व अनुकुलांमुळे उंटाचा वाळवंटातून प्रवास करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात.
आ. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज का जगू शकतात?
उत्तर:
१) निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात
किंवा त्यांचे काट्यांमध्येरूपांतर झालेले असते.
२) या रचनेमुळे त्यांच्या
शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते.
३) खोड हे पाणी व अन्न साठवून
ठेवते त्यामुळे ते मांसल बनते.
४) पानांच्या अभावामुळे
खोडांना प्रकाश संश्लेषण हे खोडावाटे चालते.
५) या व वनस्पतींची मुले
जमिनीत खूप खोलवर जातात तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात.
या सर्व अनुकुलनांमुळे निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज का जगू शकतात.
७std science question answer in Marathi medium pdf - ७class science question answer in Marathi १st lesson - ७th std science question answer Maharashtra board in Marathi
इ. सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे?
उत्तर:
१) प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला ‘अनुकूलन’ म्हणतात.
२) या अनुकूलनांमुळे सजीवांना अन्न मिळविणे, शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य होते.
३) ज्या प्रमाणे सभोवतालची परिस्थिती बदलते त्याचप्रमाणे अनुकूलने होतात.
ई. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते?
उत्तर:
१) सजीवांचे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केले जाते.
२) यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. याची सुरुवात वनस्पती सृष्टी अथवा प्राणी सृष्टी येथूनच होते.
३) सजीवांच्या गुणधर्मांतील साम्य व भेट यांच्या आधारे त्यांचे ठळक गात तयार केले जातात.
**********
हे देखील पहा:
इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......
स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा