स्वराज्यस्थापना इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र |स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वराज्यस्थापना प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - स्वराज्यस्थापना या पाठाचा स्वाध्याय - पाठ पाचवा स्वराज्यस्थापना स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - इयत्ता सातवी इतिहास गाईड
स्वाध्याय
प्रश्न १.गटात न बसणारा शब्द शोधा.
१) पुणे, सुपे, चाकण, बंगळूरू
उत्तर: बंगळूरू
२) फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडी चे सावंत
उत्तर: फलटणचे जाधव
३) तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग
उत्तर: सिंधुदुर्ग
प्रश्न.२. चला, लिहिते होऊया !
१) शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा.
उत्तर: शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्यस्वप्न यांसारखे विविध संस्कार केले.
Swarajyasthapna swadhyay 7vi - Swarajyasthapna swadhyay prashn uttar - Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf - Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers
२) शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.
उत्तर:
१)मावळ म्हणजे सध्याच्या पुणे
जिल्ह्याचा पश्चिम व नैॠत्य दिशांचा भाग होय.
२)मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम.
३)मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.
प्रश्न३. शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा.
उत्तर:
१) येसाजी कंक
२) बाजी पासलकर,
३) बापूजी मुदगल,
४) नऱ्हेकर देशपांडे बंधू,
५) कावजी कोंढाळकर,
६) जिवा महाला,
७) तानाजी मालुसरे,
८) कान्होजी जेधे,
९) बाजीप्रभू देशपांडे,
१०) दादाजी नरसप्रभू देशपांडे
प्रश्न. ४. शोधा आणि लिहा.
१) शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात?
उत्तर:
१) शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते.
२) दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता.
३) परकीय लोकांच्या सत्ता उलथवून
स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा
होती.
४) त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी
योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.
म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते.
२)
शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले?
उत्तर:
१) शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व
भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली.
२) त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील
सिद्दी,
पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला.
३) या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे शिवरायांच्या
लक्षात आले.
त्यामुळे शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.
इयत्ता सातवी इतिहास गाईड / स्वराज्यस्थापना भारत धडा पाचवा स्वाध्याय / इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी / Swarajyasthapna swadhyay 7vi / Swarajyasthapna swadhyay prashn uttar
३) शिवरायांनी आदिल शाहाबरोबर तह का केला?
उत्तर:
१) शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाणे पाठवलेल्या सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेध घातला होता.
२) त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशाहाने मुघल सरदार शायिस्ताखान यास दक्षिणेत पाठवले.
३) शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती.
४) त्या वेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशीही संघर्ष चालू होता.
५) अशा परिस्थितीत, दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे, ही गोष्ट बरोबर होणार नाही, हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले.
आणि म्हणून शिवरायांनी आदिल शाहाबरोबर तह का केला
४) शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले?
उत्तर:
१) सिद्दी पन्हाळ्याचा वेढा उठवेल, अशी चिन्हे दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली.
२) त्यामुळे सिद्दीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला.
३) त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशिद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली.
४) त्याचवेळी शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले.
हे देखील पहा:
इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......
स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा