इयत्ता सातवी सामान्य विज्ञान उष्णता स्वाध्याय प्रश्न उत्तरे
उष्णता स्वाध्याय इयत्ता सातवी - उष्णता प्रश्न उत्तरे - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान नववा धडा स्वाध्याय
1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
(प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता,सुवाहक,
काळा, परावर्तन)
अ. सर्वाधिक उष्णता
............. रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.
उत्तर: सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.
आ. उष्णतेच्या .............
साठी माध्यमाची आवश्यकता नसते.
उत्तर: उष्णतेच्या वाहना साठी माध्यमाची आवश्यकता नसते.
इ. उष्णतेचे वहन
............. पदार्थांमधून होते.
उत्तर: उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते.
ई. थर्मास फ्लास्कमधील
चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता ............. क्रियेने कमी करतो.
उत्तर: थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तन क्रियेने कमी करतो.
उ. अन्न शिजवण्याची भांडी
............. गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात.
उत्तर: अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात.
ऊ. सूर्यापासून पृथ्वीला
............. मुळे उष्णता मिळते.
उत्तर: सूर्यापासून पृथ्वीला प्रारण मुळे उष्णता मिळते.
2. कोण उष्णता शोषून घेईल?
स्टीलचा चमचा, लाकडी पोळपाट, काचेचे भांडे, तवा,
काच, लाकडी चमचा, प्लॅस्टिकची
प्लेट, माती, पाणी, मेण.
उत्तर:
वरील वस्तूंपैकी प्रत्येक वस्तू काही प्रमाणात उष्णता शोषुन घेतात. धातूच्या वस्तू स्टीलचा चमचा, तवा यांसारख्या वस्तू जास्त प्रमाणत उष्णता शोषून घेतात, तर इतर वस्तू कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतात.
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा नववा - स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा ९
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. ताप आल्यावर कपाळावर थंड
पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो?
उत्तर:
कपाळावर ठेवलेली थंड पाण्याची
पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे ताप आपल्यावर
कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो.
आ. राजस्थानमध्ये घरांना
पांढरा रंग का देतात?
उत्तर:
राज्यस्थान मध्ये तापमान खूप
जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे आपटी उष्णता प्ररणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन
होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राज्यस्थानमध्ये घरांना पंधरा रंग
देतात.
इ. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा.
उत्तर:
उष्णतेच्या संक्रमणाचे तीन प्रकार
पडतात.
१)वहन २)अभिसरण ३)प्रारण
ई. खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा.
उत्तर:
१.दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या
उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनी लगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती
वर जाते. या वेळी समुद्रावर त्यामानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा
जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने खारे वारे वाहतात.
२.रात्रीच्या वेळी जमीन लवकर
थंड होते. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते. त्यामानाने समुद्रावर
हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते. अशा वेळी जमिनीवरची हवा समुद्राचा दिशेने
वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात.
उ. अंटार्क्टिका खंडातील
पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो?
उत्तर:
१. अंटार्क्टिका खंडाचे तापमान खूप कमी
असते.
२.काळा रंग उष्णता प्रारणाचे
मोठ्या प्रमाणावर शोषण करतो.
३.पेंग्विन पक्षांचा रंग वरून
कला असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणवर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे
तापमान कायम राखण्यास मदत होते.
ऊ. खोलीमध्ये हीटर खाली व
वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात?
उत्तर:
उष्णतेचे अभिसरण होत असताना
जमिनीलगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची
व जास्त घनतेची हवा खाली येते. त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात.
म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व
वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात.
ushnata swadhyay prashn uttare - ७std science question answer in Marathi medium pdf - ७ class science question answer in Marathi ९th lesson - ७th std science question answer Maharashtra board in Marathi
4. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. साध्या काचेच्या बाटलीत
उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोसिलने बनलेल्या काचेच्या
बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही.
उत्तर:
सध्या काचेच्या बालीमध्ये
उकळते पाणी टाकले तर उष्णतेचे वहन वेगाने न झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी
पडते तेथील काचेचे लगेच प्रसारण होते. परंतु त्या शेजारील भागाचे त्यापेक्षा कमी
प्रसरण होते.
बोरोसिलने बनलेल्या काचेच्या
बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वाहन होते त्यामुळे काचेचे फारसे नैकसमान
प्रसारण होत नाही त्यामुळे ती बाटली तडकत नाही.
आ. उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात.
उत्तर:
१.उन्हाळ्याच्या दिवसांत
वातावरणातील तापमान जास्त असते त्यामुळे टेलीफोन च्या तारांचे प्रसरण झाल्यामुळे
टेलिफोनच्या तारा लोंबकळताना दिसतात.
२.हिवाळ्याच्या दिवसांत
वातावरणातील तापमान कमी असते. तेव्हा तारांचे आकुंचन झाल्याने त्या समांतर
झालेल्या दिसतात.
इ. हिवाळ्यात गवतावर दबबिंदू जमा होतात.
उत्तर:
बाष्प धारण करण्याची हवेची
क्षमता ही तापमानावर अवलंबून असते.
हिवाळ्यात रात्री तापमान कमी
झाल्यावर ही क्षमता क्म्ही होते व तापमान फार कमी झाल्यास जड पाण्याचे गवतावर
संघटन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात.
ई. हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो.
उत्तर:
१.लोखंड हे उष्णतेचे सुवाहक
आहे. तर लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. हिवाळ्यामध्ये रात्री वातावरणाचे तापमान
आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा खूप कमी असते.
२.अशा वेळी लोखंडाच्या
खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वाहन सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे
होते. त्यामुळे आपल्या हाताला खांब थंड लागतो.
हे देखील पहा:
इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......
स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा