२.वनस्पती : रचना व कार्य स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान | vanaspati rachana v kary swadhyay

वनस्पती रचना व कार्य स्वाध्याय इयत्ता सातवी वनस्पती रचना व कार्य प्रश्न उत्तरेइयत्ता सातवी सामान्य विज्ञान पहिला धडा स्वाध्याय७std science question
Admin

वनस्पती : रचना व कार्य इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २ - वनस्पती रचना व कार्य स्वाध्याय इयत्ता सातवी - वनस्पती रचना व कार्य प्रश्न उत्तरे - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पहिला धडा स्वाध्याय


1.     वनस्पतींची तीन उदाहरणे द्या.


अ.    काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या –

उत्तर: एरंड, धोतरा, फणस

 

आ. खोडावर काटे असणाऱ्या -

उत्तर: गुलाब, निवडुंग, करवंद

 

इ. लाल फुले असणाऱ्या -

उत्तर: गुलाब, जास्वंद, पांगारा


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा दुसरा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २ वनस्पती रचना व कार्य स्वाध्याय इयत्ता सातवी वनस्पती रचना व कार्य प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पहिला धडा स्वाध्याय ७std science question answer in Marathi medium pdf ७ class science question answer in Marathi २st lesson ७th std science question answer Maharashtra board in Marathi

 

ई. पिवळी फुले असणाऱ्या -

उत्तर: भेंड, गुलाब, सोनचाफा

 

उ. रात्री पाने मिटणाऱ्या -

उत्तर: आवळा, गुलमोहर, पर्जन्यवृक्ष

 

ऊ. एकच बी असणारी फळे असणाऱ्या -

उत्तर: आंबा, बोर, काजू

 

ए. फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या –

उत्तर: फणस, पेरू, कलिंगड

 

 

2. कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा. त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहून आकृती काढा.

उत्तर:


जास्वंदीचे फुल

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा दुसरा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २  वनस्पती रचना व कार्य स्वाध्याय इयत्ता सातवी  वनस्पती रचना व कार्य प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पहिला धडा स्वाध्याय  ७std science question answer in Marathi medium pdf  ७ class science question answer in Marathi २st lesson ७th std science question answer Maharashtra board in Marathi



इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा दुसरा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २  वनस्पती रचना व कार्य स्वाध्याय इयत्ता सातवी  वनस्पती रचना व कार्य प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पहिला धडा स्वाध्याय  ७std science question answer in Marathi medium pdf  ७ class science question answer in Marathi २st lesson ७th std science question answer Maharashtra board in Marathi



फुलाचे निरीक्षण:

फुलाला लांब किंवा आखूड देठ (Pedicel) असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.


निदलपुंज (Calyx) :कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.


दलपुंज (Corolla) :दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध व रंग हे विविध प्रकारचे असतात.


पुमंग (Androecium) : फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.


जायांग (Gynoecium) :फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते.

 

 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा दुसरा - स्वाध्याय प्रश्न उत्तरे - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा २




3. काय सारखे? काय वेगळे?

 

अ. ज्वारी आणि मूग

उत्तर:


साम्य:

  • ज्वारी व मुग या सपुष्प वनस्पती आहेत.
  • दोन्हीही खाण्यायोग्य असतात.

भेद:

  • ज्वारीच्या खोडाला फांद्या नसतात, मुगाच्या खोडाला फांद्या असतात.
  • ज्वारीला एकदल बी असते, मुगाला द्विदल बी असते.
  • ज्वारीची पाने समांतर शिराविन्यास दर्शवतात, मुगाची पाने जाळीदार शिराविन्यास दर्शवतात.

 

आ. कांदा आणि कोथिंबीर

उत्तर:

साम्य:

  • कांदा व कोथिंबीर या सपुष्प वनस्पती आहेत. (फुले येणाऱ्या)


भेद:

  • कांद्याच्या खोडाला फांद्या नसतात, कोथिंबीरीच्या खोडाला फांद्या असतात.
  • कांद्याचे बी हे एकदल असते तर कोथिंबीरीचे बी हे द्विदल असते.
  • कांद्याची पाने समांतर शिराविन्यास दर्शवितात तर कोथिंबीरिची पाने जाळीदार शिराविन्यास दर्शवितात.

 

इ. केळीचे पान व आंब्याचे पान

उत्तर:


साम्य:

  • केळ व आंबा या दोन्ही पानांना मध्यशीर असते. दोन्ही पानांना देठ असतो.

भेद:

  • केळीचे पान समांतर शिराविण्यास दर्शवते. आंब्याचे पान जाळीदार शिराविन्यास दर्शवते.

 

ई. नारळाचे झाड व ज्वारीचे ताट

उत्तर:


साम्य:

  • नारळ व ज्वारी दोन्हींची बी ही एकदल प्रक्रातील असते.
  • नारळ व ज्वारी यांची मुळे तंतुमय असतात.

भेद:

  • नारळ हे झाड आहे तर, ज्वारी हे झुडूप आहे.
  • नारळाचे खोड हे काष्ठमय असते, ज्यारीला मऊ देठ असतात.

 

4. खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:




१) ‘अ’ हे चित्र मक्याच्या बी चे आहे. ही एकदल या प्रकारातली बी आहे.

२) ‘आ’ हे चित्र घेवड्याच्या बी चे आहे. ही द्विदल प्रकारातील बी आहे.

३)दोन्ही चित्रांमध्ये अखंड बी आणि त्याचा उभा छेद दाखवला आहे.

४) ‘अ’ या चित्रातील बीमध्ये आदिमुळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असतात.

५) ‘आ’ चित्रातील बी मध्ये आदिमुळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या भागात दिसत आहेत.

 

5. वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा.

उत्तर: खोड, पाने, फुले, फळे, मूळ हे वनस्पतींचे विविध अवयव आहेत.

१)मूळ:

  • वनस्पतीला मातीत घट्ट रोवून आधार देणे.
  • जमिनीतून पाणी, खनिजे आणि क्षार शोषून घेणे आणि वनस्पतीला पुरवणे.
  • काही मुळे
  •  रुपांतरीत होतात व श्वसन, अन्न साठा यांसारखी विविध कार्ये करतात.


२)खोड:

  • मुळांनी जमिनीतून शोषून घेतलेली अन्नद्रव्ये झाडाच्या इतर भागापर्यंत पोहचवणे.
  • पानांनी तयार केलेले अन्न इतर अवयवांपर्यंत पोहचवणे.
  • रुपांतरीत खोडे प्रजनन, अन्नसंचयन आणि वनस्पतीला आधार देण्याचे कार्य करतात.

 

३)पाने:

  • पाने प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे अन्ननिर्मिती करतात.


४)फुले:

  • प्रजनन किंवा पुनरुत्पादन करण्याचे कार्य फुले करतात.

 

५)फळे:

  • फळे अन्नसंचय करतात. फळ परीपक्व झाल्यावर बिया फळातून बाहेर येतात आणि नवीन वनस्पती उगवण्यास मदत होते.

 

6. खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा.


गुळगुळीत पृष्ठभाग,

उत्तर:

केळ

               केळीच्या पानांचा पृष्ठभाग हा गुळगुळीत असतो. केळ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव मुसा पेंराडिसीएका असे आहे. ही वनस्पती मुसासीड (कर्दळी) या कुळातील आहे. केळ हे मऊ खोडाचे झाड, कंदापासून लागण, मांसल मुळे, उष्‍णदेशिय वनस्‍पती आहे. केळ ही जगातील सर्वात मोठी मांसल खोड असेलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीच्या झाडाला येणाऱ्या फुलाला केळफूल असे म्हटले जाते.

खडबडीत पृष्ठभाग,

उत्तर:

पारिजातक

            पारिजात हे एक भारतात उगवणारे औषधी झाड आहे. पारिजातकाची फुले ही सुगंधित आणि मनमोहक असतात. पारिजातकाच्या फुलांना खरपत्रक, हरसिंगार, शेफानलिका, नालकुंकुमा अशी अनेक नावे आहेत. या झाडाची फुले रात्री गळत असल्यामुळे या झाडाला ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. पारिजातकाचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. पारिजातकाचा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो  तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवतो.  पारिजातकाच्या झाडाला  "प्राजक्त" म्हणूनही ओळखला जातो. पारिजातकाच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्या एवढी मोठी, काळपट हिरवी, दंतूर कडांची पानेही खरखरीत असतात.

 

मांसल पर्णपत्र,

उत्तर:

जलपर्णी

            जलपर्णी ची पाने मांसल असतात. जलपर्णी चे खोड हे फुगीर आणि हिरवे असते. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. जलपर्णीची एक वनस्पती एका वर्षात तीन हजारांहून अधिक बियांची निर्मिती करते त्यामुळे तिचा प्रसार झपाट्याने होतो. जलपर्नीची वाढ मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाण्यावर तिचा थर जमा झाल्याने सूर्यकिरण जलचरांपर्यंत पोहचण्यास अडथला निर्माण होतो.

 

std science question answer in Marathi medium pdf -  class science question answer in Marathi st lesson - th std science question answer Maharashtra board in Marathi



पर्णपत्रावर काटे.

उत्तर:

केवडा

            केवड्याचे झुडूप हे  सुमारे ३ मी. इतके उंच वाढते. अनेक जाड आधार मुळांनी केवड्याचे  खोड उभे सावरून धरलेले असते. केवड्याच्या फांद्या जाडजूड असतात तर याची पाने टोकाकडे गर्दीने आलेली दिसतात. पाने समुद्रवर्णी , साधी, आणि हिरव्या रंगाची असतात. केवड्याच्या पानानाची लांबी ही ९०-१५० सेंमी इतकी असते. केवड्याची पाने ही लांब, खड्गाकृती, टोकदार,एकांतरित , असतात. केवड्याच्या पानांच्या कडा आणि मध्यशिरा काटेरी असतात. 

 

7. तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा.

उत्तर:

अं

सो

मू

फू

मू

बी

बा

कु

शी

कु

जां

क्षी

पे

खो

रो

अं

डा

ग्र

जा

दे

र्णा

पा

या

र्ण

कां

पुं

मं

पा

ळी

डे

 

उत्तर:

१) अंकुर

२)कुक्षी

३)मुकुल

४)देठ

५)अंडाशय

६)खोड

७)जायांग

८)पर्णतल

९)पर्णाग्र

१०)बीजांड

११)मूळ

१२)फुल

१३)सोटमूळ

१४)मूलरोम

१५)एकदल

१६)कांडे

 **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.