5. भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | Bhandyanchya Duniyet swadhyay iyatta satavi marathi

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी Bhandyanchya duniyet swadhyay
Admin

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी भांड्यांच्या दुनियेत  | Swadhyay iyatta satavi marathi Bhandyanchya Duniyet kavita 


स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत  | भांड्यांच्या दुनियेत  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी | इयत्ता सातवी मराठी भांड्यांच्या दुनियेत  स्वाध्याय

 

प्र. १. खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा.

 

(अ) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.

उत्तर: अन्न शिजवण्यासाठी आणि अन्न साठवण्यासाठी माणसाला भांडी आवश्यक वाटू लागली. म्हणून शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.

 


(आ) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.

उत्तर: पूर्वी लोखंड, तांबे, पितळ यांसारख्या धातूंचा मोठ्या प्रमाणवर शोध लागला नव्हता. आणि त्या काळी उपलब्ध असलेली धातूची भांडी विकत घेणे परवडणारे नव्हते. केळीची पाने हे निसर्गतः मिळत असल्याने तसेच ती मुबलक प्रमाणात असल्याने पूर्वी मोठ्या प्रमाणवर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.

 

 

(इ) आज घरोघरी मिक्सर वापरतात.

उत्तर: आज घरोघरी मिक्सर वापरतात कारण मिक्सरमुळे कमी वेळात व कमी मेहनातीमध्ये जास्त काम करता येते.

 

 

सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी भांड्यांच्या दुनियेत  स्वाध्याय  भांड्यांच्या दुनियेत  इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत   भांड्यांच्या दुनियेत  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी  इयत्ता सातवी मराठी भांड्यांच्या दुनियेत  स्वाध्याय  इयत्ता सातवी विषय मराठी भांड्यांच्या दुनियेत  स्वाध्याय            Iyatta satavi bhandyanchya duniyet  swadhyay  Iyatta satavi Bhandyanchya duniyet swadhyay  Bhandyanchya duniyet iyatta satavi Marathi swadhyay pdf  Iyatta Satavi Marathi guide

(ई) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

उत्तर: मातीपासून बनलेल्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ बराच काल टिकतात. तसेच मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणत मिळतात. आणी ती पर्यावरणासाठी हानिकारक ठरत नाहीत  म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

 

 

प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.

 

मानवाने ज्या घटकांपासून भांडी
बनवली ते घटक

उत्तर:

१)माती

२)लाकूड

३)पान

४)दगड

५)चामडे

 

 

प्र. ३. ‘भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर: अन्न ही मानवाची मुलभूत गरज आहे. हे अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला प्राचीन कालपासूनच भांड्यांची गरज निर्माण झाली. माणसाच्या अन्न साठवण्याच्या गरजांनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. ज्या ज्या ठिकाणी मानवी समाज आहे त्या त्या ठिकाणी भांडी ही असणारच म्हणून, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.

 

 हे सुद्धा पहा: 



प्र. ४. तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.

उत्तर: घरातील निरुपयोगी वस्तूचा शक्य असल्यास पुनर्वापर करू. निरुपयोगी वस्तूंपासून टाकून न देता त्यांच्यापासून दुसऱ्या टिकाऊ वस्तू तयार करू.  त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे शक्य नसल्यास त्या वस्तू फेकून न देता पुनर्चक्रीकरण करण्यासाठी नेण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये देऊ.

 

Iyatta satavi bhandyanchya duniyet  swadhyay | Iyatta satavi Bhandyanchya duniyet swadhyay | Bhandyanchya duniyet iyatta satavi Marathi swadhyay pdf | Iyatta Satavi Marathi guide


प्र. ५. दोन-दोन उदाहरणे लिहा.


(१) मातीची भांडी-

उत्तर:

१)मडके

२)रांजण

 

(२) चामड्यापासून बनवलेली भांडी-

उत्तर:

१)बुधले

२)पखाली

 

(३) लाकडी भांडी-

उत्तर:

१)उखळी

२)काठवठ


 

(४) तांब्याची भांडी-

उत्तर:

१)हंडा

२)बादली

 


(५) चिनी मातीची भांडी-

उत्तर:

१)कप

२)सुरई


 

(६) नॉनस्टिकची भांडी-

उत्तर:

१)तवा

२)कढई  

 


(७) काचेची भांडी-

उत्तर:

१)ग्लास

२)कप

 

 

प्र. ६. यांना काय म्हणतात?

 

(अ) जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट.

उत्तर: पत्रावळ

 

(आ) जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे.

उत्तर: तस्त

 

(इ) दुधासाठीचे भांडे.

उत्तर: चरवी

 

(ई) ताकासाठीचे भांडे.

उत्तर: कावळा

 

(उ) पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे

उत्तर: घंगाळ

 

 सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी भांड्यांच्या दुनियेत  स्वाध्याय   भांड्यांच्या दुनियेत  इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय

5. भांड्यांच्या दुनियेत स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | Bhandyanchya Duniyet swadhyay iyatta satavi marathi

 

कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा.
(अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगेसोयरे)

 

(अ) संत तुकारामांनी वृक्षांना .............. संबोधून त्यांचा गौरव केला.

उत्तर: संत तुकारामांनी वृक्षांना सगेसोयरे संबोधून त्यांचा गौरव केला.

 

(आ) .............. वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.

उत्तर: नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.

 

(इ) आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर .............. .

उत्तर: आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले .

 

(ई) कुटुंब हे मानवी जीवनाचे .............. आहे
उत्तर: कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे

 


माहिती मिळवूया.


  • पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात?

उत्तर: पत्रावळी तयार करण्यासाठी फणस, मोह, पळस इत्यादी झाडांची पाने वापरतात.

 


  • पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातात?

उत्तर: पत्रावळीची पाने एकमेकांना नारळाच्या झावळ्यांच्या कड्यांच्या सहाय्याने जोडली जातात.

 


  • पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत.

उत्तर: पूर्वी झाडांची पाने काट्यांच्या सहाय्याने एकत्र जोडून पत्रावळी तयार केल्या जात असत. आत्ता या पत्रावळी बनवण्यासाठी कागद, प्लास्टिक यांचा वापर केला जातो. पूर्वीच्या पत्रावळ्या पर्यावरणास अनुकूल होत्या. आत्ता वापरत असलेल्या पत्रावळी पर्यावरणासाठी हानिकारक ठरत आहेत.

 


खाली दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारांनुसार वर्गीकरण करा.

तिथे, दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर, थोडा, सतत, झटकन.

 

  • कालवाचक क्रियाविशेषण अव्यये

उत्तर: दररोज, परवा, क्षणोक्षणी, सतत.

 


  • रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये

उत्तर: सावकाश, मुळीच, कसे, पटकन.

 


  • परिमाणवाचक/संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये

उत्तर: अतिशय, पूर्ण, जरा, थोडा.

 


  • स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये

उत्तर: तिथे, तिकडे , वर

 

 

 

शब्दकोडे सोडवूया.

 

खालील चौकोनांतील अक्षरांमध्येक्रियाविशेषणे लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषणे तयार करा व दिलेल्या जागेत लिहा.


ळू

थो

डे

रो

डा

मो

के

रा

सा

का

सा

जि

ही

ने

दा

चि

ति

डे

खा

ली

 

उत्तर:

1.     हळू                2.    आज

3.    जरा                4.   अनेक

5.    थोडासा            6.    तसा

7.   जिकडे              8.    तिकडे

9.     वर                    10.खाली

11. तर                    12.  कदाचित

13.    काही                14.    जसा

15.    मोजके


✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  1. हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून शेअर करा. 
  2. स्वाध्याय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.


हे सुद्धा पहा: 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.