9. नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | Natyabaherach Nat swadhyay iyatta satavi marathi

नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठीसातवी मराठी गाईड pdfNatyabaherach nat iyatta satavi swadhyay Iyatta Satavi Marathi guide
Admin

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी नात्याबाहेरचं नातं  | Swadhyay iyatta satavi marathi Natyabaherach Nat swadhyay

प्र. १. खालील विधानांमागील कारणे लिहा.


(अ) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.

उत्तर: कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.

 

(आ) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव ‘डांग्या’ ठेवले.

उत्तर: कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले.

 

इयत्ता सातवी विषय मराठी माझी मराठी  स्वाध्याय  माझी मराठी  इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ नववा  माझी मराठी   नात्याबाहेरचं नातं  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी  Iyatta satavi gachkandhari  swadhyay  Natyabaherach nat  iyatta satavi swadhyay  7 th standard natyabaheracha nat swadhyay marathi Iyatta Satavi Marathi guide Natyabaheracha  nat swadhyay prashn uttare satavi marathi

(इ) लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.

उत्तर: डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती  की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीनं भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला ‘पक्क्या हिमतीचा राखण्या’ म्हणतात.

 

प्र. २. खालील आकृत्या पूर्ण करा.


(अ) थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये.

उत्तर:

१) हळवा

२) सर्वांगाला वेढून टाकणारा.

३) नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा.

४) रान, पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा.

 

(इ) खालील बाबतींत डांग्याचे वर्णन करा.

  •  दिसणे
  • शरीरयष्टी
  • चाल
  • नजर

उत्तर:

        जस जसे डांग्याचे वय वाढत चालले होते तसे त्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्यांखाली असणारे पिवळसर पत्ते व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पत्ते सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते.

        डांग्याची शरीरयष्टी दणकट होती. त्याचे शरीर सगळ्यांच्याच नजरेला भुरळ घालणारे होते.

        डांग्याची दुडूदुडू चाल सर्वांना भावणारी होती.

        डांग्याचे तेजस्वी डोळे बोलके होते.



(आ) कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली, हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये.

उत्तर:

१) अंगाच गाठोड करून पडलेलं.

२) सर्मोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली

३) हुडहुडी रोखण्याचा त्याचा चालेला प्रयत्न आम्हांला सुन्न करून गेला.

४) थंडीच्या ओलसरपणान  त्याच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडलय की काय असा भास झालेला.

५) इवल्याश्या जीवाला तशी थंडी असह्यच.

 

प्र. ३. खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा.

घटना

परिणाम

(१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला.

पिल्ला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला.

(२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या

 अंथरुणापाशी झोपलं.

पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले.

(३) लेखकांच्या हाताचा डांग्‍याला स्‍पर्श

डांग्याच्या डोळ्यांत लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं  वाटलं.

(४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून

 घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली.

डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकांच्या येण्याची चाहूल घ्यायचा.

 

 

प्र. ४. योग्य जोड्या लावा.


‘अ’ गट

‘ब’ गट ( उत्तरे)

(१) पिल्लाची धडपड पाहून

(ई) पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली

(२) रात्र आगेकूच करू लागली

(इ) थंडीची लाट वाढली.

(३) वाऱ्याने हलणारी डहाळी

(आ) मन आकर्षित करत होती.

(४) इवल्याशा जिवाला

(अ) थंडी असह्य होत होती.

 

 

 खेळूया शब्दांशी

 

 (अ) खालील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा.

(१) हुडहुडी

उत्तर: थंडीने अंग थरथर कापणे

 

(२) रुखरुख

उत्तर: मनात हळहळ वाटत राहणे.

 

 (३) फुलोर

उत्तर: फुलांच्या आधी येणारा परागांचा गुच्छ.

 

(४) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

उत्तर: अनेक गोष्टींत कुशल असणारी व्यक्ती

 

(५) विश्वस्त

उत्तर:

 

(६) सोहळा

उत्तर: समारंभ

 

 7 th standard natyabaheracha nat swadhyay marathi | Iyatta Satavi Marathi guide | Natyabaheracha  nat swadhyay prashn uttare satavi marathi

(आ) खालील शब्दांचा सहसंबंध लावा.

शुभ्र

किरणे

प्रसन्न

प्रकाश

लालसोनेरी

चांदणे

निळसर

सकाळ

हळदुली

पट्टे

 

उत्तर:

शुभ्र – चांदणे

प्रसन्न – सकाळ

लालसोनेरी – पट्टे   

निळसर – प्रकाश

हळदुली – किरणे

 

(इ) खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा.

 

(१) थंड × गरम उष्ण

(२) शांत × बडबड्या , बोलका.

(३) मान × अवमान, अपमान.

(४) स्वदेश × परदेश,  विदेश.

(५) आरंभ × शेवट, अखेर.

 

 

(ई) खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

(१) कणव निर्माण होणे.

(अ) दया निर्माण होणे.

(२) काळजात धस्स होणे.

(ई) भीतीने धक्का बसणे.

(३) उत्साह द्‌विगुणित होणे.

(आ) उत्साह वाढणे.

(४) भुरळ घालणे.

(इ) आकर्षित करणे.

 


आपण समजून घेऊया.

 

  • खालील शब्दांचा ‘क्रियाविशेषण’ व ‘शब्दयोगी अव्यये’ असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.

पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.

 

क्रियाविशेषण अव्यये

शब्दयोगी अव्यये

सुरज सार्थक च्या पुढे आहे.

घरापुढे मोठे अंगण आहे .

ती मागे थांबली.

घरामागे माडाची झाडे आहेत.

बाहेर खूप थंडी आहे.

घराबाहेर पडू नका.

समुद्र जवळ आहे.

घराजवळ खेळाचे मैदान आहे.

तू नंतर ये.

मी शाळा सुटल्यानंतर खेळायला जाईन.

 

 

  • खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.

(अ)        मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.

अव्यय: नंतर   

संबंध: परीक्षा

 

(आ) तुझ्यादेखील हे लक्षात कसे आले नाही?

अव्यय : देखील   

संबंध : तुझ्या

 

(इ) रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते.

अव्यय : वरील

संबंध : रस्ता

 

(ई) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?

अव्यय : देण्या

संबंध:  कडे

 

  ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  1. हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून शेअर करा. 
  2. स्वाध्याय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.


हे सुद्धा पहा: 

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.