इयत्ता आठवी मराठी अन्नजाल स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Iyatta 8vi mrathi Annajal swadhya prashn uttare
इयत्ता आठवी अन्नजाल स्वाध्याय | इयत्ता ८वी मराठी अन्नजाल स्वाध्याय | इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf | इयत्ता आठवी विषय मराठी अन्नजाल स्वाध्याय | Annajal swadhyay prashn uttare 8vi
प्र. १. अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे-
उत्तर:
१. माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो
२. अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो.
प्र. २. चुकीचे विधान शोधा.
(अ) (१) मधली कडी तुटली तरी
संपूर्णसाखळी कायम राहते.
(२) निसर्गनारायणाने महाजाल
निर्माण केले.
(३) कोळी आपले जाळे स्वकष्टाने
विणतो.
(४) कोणत्याच प्राण्याची
माणसाने हत्या करू नये.
उत्तर: (१) मधली कडी तुटली तरी
संपूर्णसाखळी कायम राहते.
(आ) (१) अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.
(२) कोळ्याच्या जाळ्यातील काही
धागे तुटले तर काही बिघडत नाही.
(३) एक प्राणिजात नष्ट झाली तर
अन्नसाखळी तुटते.
(४) अनेक प्राणिजाती मारल्या
तरी अन्नजाल टिकून राहते.
उत्तर: (४) अनेक प्राणिजाती
मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
प्र. ३. कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा.
कोळ्याचे जाळे |
अन्नजाल |
१.
अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो. |
१.प्राणिजातीसाठी
निसर्ग अन्नजाल विणतो. |
२.अनेक
धागे तुटले तरी जाळे कायम राहते. |
२.
कित्येक प्राणिजाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते. |
Annajal iyatta 8vi mrathi prashn uttare \ Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf | Iyatta 8vi mrathi swadhyay pdf | Iyatta 8vi vishy Marathi Annajal swadhyay
प्र. ४. खालील कृतीचा/घटनेचा परिणाम लिहा.
मानवाने प्राण्यांना मारले तर………
उत्तर: मानवाने प्रण्यांना
मारले तर अन्नजाल क्षीण होईल आणि काही काळानंतर हळूहळू संपूर्ण अन्नजाल तुटून जाईल.
प्र. ५. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(अ) तुम्हांला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
अन्नसाखळीमध्ये
प्रत्येक जीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. निसर्गाने अन्नसाखळीचे महाजाल
तयार केले आहे. उदा. गवताला उंदीर खातो, उंदराला साप खातो, सापाला गरूड पक्षी खातो.
ज्याप्रमाणे माणूस एकास एक कडी जोडून साखळी तयार करतो त्याप्रमाणे निसर्गात अन्नसाखळी
तयार झालेली आहे.
(आ) कवितेच्या आधारे ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ हे सुवचन स्पष्ट करा.
उत्तर:
एक
प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला भक्ष बनवतो, दुसरा प्राणी हा तिसऱ्या प्राण्याला भक्ष
बनवतो. म्हणजेच एक जीव हाच दुसऱ्या जीवाचे जीवन आहे. उदा. गवताला उंदीर खातो, उंदराला साप खातो, सापाला गरूड पक्षी खातो. याप्रमाणे एकमेकांचे भक्ष्य होणे म्हणजेच ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’
**********