इयत्ता आठवी मराठी शब्दकोश (स्थूलवाचन)स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Iyatta 8vi mrathi Shbdkosh (sthulvachan) swadhya prashn uttare
इयत्ता ८वी मराठी शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय Shbdkosh (sthulvachan) swadhyay prashn uttare 8vi
१. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावा.
उत्तर: अंबर, आलोक,नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समीर
प्र. २.
तुम्हांला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा
शोधाल?
सोदाहरण सांगा.
उत्तर:
मला पाठातील एखाद्या
शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे मी तो शब्द आकारविल्हे प्रमाणे शब्दकोशामध्ये
शोधेन.
उदाहरणार्थ मला
संतवाणी या शब्दरवर अर्थ शोधायचा आहे. त्यासाठी शब्दकोशातील मी सं या अक्षरापासून सुरू
होणाऱ्या शब्दांच्या पानावर जाईन. नंतर शब्दकोशामध्ये ढ, आणि ण नंतर मला संतवाणी हा
शब्द दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ समजून घेईन.
प्र. ३. शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर:
शब्दकोशामध्ये
असणाऱ्या शब्दांची रचना हि अकारविल्हे प्रमाणे केलेली असते. म्हणजेच क का कि की ….
यामुळे आपल्याला जो शब्द शब्दकोशामध्ये शोधायचा आहे तो शोधणे सोपे होऊन जाते. शब्दकोशामुळे त्या शब्दाचा योग्य अर्थ, उच्चार त्या शब्दाचे स्पष्टीकरण
याबाबत सविस्तर माहिती मिळते.
Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf Iyatta 8vi mrathi swadhyay pdf Iyatta 8vi vishy Marathi Shbdkosh (sthulvachan) swadhyay
प्र. ४. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.
शब्दकोशाचा
उपयोग
शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे
उत्तर:
शब्दकोशाचा उपयोग शब्दांचा अचूक अर्थ शोधण्यासाठी होतो. एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द त्या शब्दाचे स्पष्टीकरण आपल्याला शब्दकोशामुळे समजण्यास मदत होते.
शब्दाचा योग्याअर्थ माहित करून घेणे. समान अर्थाचा शब्द माहित करून घेणे.
शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लावून घेणे.
शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय इयत्ता आठवी शब्दकोश (स्थूलवाचन) या धड्याचे प्रश्न उत्तर शब्दकोश (स्थूलवाचन) इयत्ता आठवी प्रश्न उत्तर इयत्ता आठवी शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय इयत्ता ८वी मराठी शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय
भाषासौंदर्य
- खाली काही कवी
व कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत. या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या व दिलेल्या
चौकटींत त्यांची नावे लिहा.
रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला –
उत्तर: इंदिरा संत
आनंदी आनंद
गडे,
इकडे तिकडे चोहीकडे -
उत्तर: बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
या बालांनो, या रे या! लवकर भरभर सारे या! -
उत्तर: भा.रा.तांबे
एका तळ्यात
होती बदके पिले सुरेख -
उत्तर: ग.दि.माडगूळकर
ने मजसी ने
परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला -
उत्तर:स्वा. सावरकर
अरे संसार
संसार,
जसा तवा चुल्ह्यावर -
उत्तर: बहिणाबाई चौधरी
छळून घ्या
संकटांनो,
संधी पुन्हा मिळणार नाही -
उत्तर: अशोक थोरात
बाळ, चाललासे रणा, घरा बांधिते तोरण -
उत्तर: पद्मा गोळे
देणाऱ्याने
देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे -
उत्तर: विंदा करंदीकर
या नभाने या
भूमीला दान द्यावे -
उत्तर: ना.धों. महानोर
खरा तो एकचि
धर्म जगाला प्रेम अर्पावे -
उत्तर: साने गुरूजी
आई एक नाव
असतं,
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं-
उत्तर:फ.मु.शिंदे