आठवी सामान्य
विज्ञान पाठ पहिला प्रश्न उत्तरे आम्ल, आम्लारी ओळख | 8vi samanya Aamla Amlari Olakh prashn uttare
Iyatta 8vi path 12 aamla aamlari olakh | आठवी सायन्स स्वाध्याय आम्ल, आम्लारी ओळख | स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान आम्ल, आम्लारी ओळख | आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय | आम्ल, आम्लारी ओळख इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
1. खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा.
( हा तक्ता मोबाईल मध्ये पाहण्यासाठी मोबाईल आडवा धरा.)
द्रावण |
दर्शकात झालेला बदल |
आम्ल/आम्लारी |
||
लिटमस |
फिनॉल्फ्थॅलिन |
मिथिल ऑरेंज |
||
1. |
नीळा लिटमस लाल झाला |
बदल नाही. |
नारंगी गुलाबी झाला. |
आम्ल |
2. |
निळा लिटमस लाल झाला |
बदल नाही |
नारंगी रंग बदलून लाल झाला. |
आम्ल |
3. |
लाल लिटमस निळा झाला. |
गुलाबी होतो. |
तांबडा बदलून पिवळा झाला. |
आम्लारी |
2. सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा.
H2SO4
उत्तर: सल्फुरिक
ॲसिड
Ca(OH)2
उत्तर: कॅल्शिअम
हायड्रॉक्साइड
HCl
उत्तर:
हायड्रोक्लोरिक ॲसिड
NaOH
उत्तर: सोडीअम
हायड्रॉक्साइड
KOH
उत्तर: पोटॅशिअम
हायड्रॉक्साइड
NH4OH
उत्तर:अमोनिअम
हायड्रॉक्साइड
aamla aamlari olakh swadhyay | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay aamla aamlari olakh | 8vi samanya vidnyan swadhyay
3. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वांत जास्त महत्त्व का आहे?
उत्तर:
1. लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा वापर होतो.
2. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विद्युत घट) मध्येही वापरतात.
3.तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग (dyes/paints), स्फोटक द्रव्येयांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो. म्हणून सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वांत जास्त महत्त्व आहे.
4. उत्तरे द्या.
अ. क्लोराइड
क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे?
उत्तर: क्लोराईड
क्षार मिळविण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले पाहिजे.
आ. एका
खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या
वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्याप्रकारचे संयुग आहे?
उत्तर: खडकात
कार्बोनेट ( CO2) हे संयुग आहे.
इ.
प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील
द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल?
उत्तर: बाटलीतील
द्रावणात निळा लिटमस कागद बुडवल्यावर तो तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे.
5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.
उत्तर:
आम्ल |
आम्लारी |
आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. |
आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. |
आम्ले चवीला आंबट असतात. |
आम्लारी चवीला तुरट, कडवट असतात. |
सामान्यतः अधातू ऑक्साईडपासून आम्ल तयार होते. |
सामान्यतः धातू ऑक्साईडपासून आम्लारी तयार होते. |
आ. दर्शकावर
मिठाचा परिणाम का होत नाही?
उत्तर:
दर्शकावर मिठाचा कोणताही परिणाम होत नाही कारण मीठ हे उदासीन क्षार आहे. दर्शकाचा
रंग आम्ल आणि आम्लारीमुळे बदलतो.
इ.
उदासिनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात?
उत्तर: क्षार
आणि पाणी हे पदार्थ उदासिनीकरणातून तयार होतात.
ई. आम्लाचे
औद्योगिक उपयोग कोणते ?
उत्तर:
1. रासायनिक
खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात.
2. तेलाच्या
शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग
(dyes/paints), स्फोटक द्रव्येयांच्या निर्मिती प्रक्रियेत
आम्लांचा वापर होतो.
3.
भिन्न-भिन्न क्लोराइड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.
4. विरल
सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विद्युत घट) मध्येही वापरतात.
5.पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो.
6. लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा वापर होत.
aamla aamlari olakh swadhyay | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay aamla aamlari olakh | 8vi samanya vidnyan swadhyay
6. रिकाम्या जागा भरा.
1. आम्लातील प्रमुख घटक....... आहे.
उत्तर: आम्लातील प्रमुख घटक H + आयन आहे.
2. आम्लारीतील प्रमुख घटक....... आहे.
उत्तर: आम्लारीतील प्रमुख घटक OH- आयन आहे.
3. टार्टारिक हे ....... आम्ल आहे.
उत्तर: टार्टारिक हे सौम्य आम्ल आहे.
7. जोड्या लावा.
‘अ’ गट |
‘ब’ गट ( उत्तरे) |
1. चिंच |
c. टार्टारिक आम्ल |
2. दही |
d. लॅक्टिक आम्ल |
3. लिंबू |
b. सायट्रिक आम्ल |
4. व्हिनेगर |
a. ॲसेटिक आम्ल |
8. चूक की बरोबर ते लिहा.
अ. धातूंची
ऑक्साइडस् आम्लारीधर्मी असतात.
उत्तर: बरोबर
आ. मीठ
आम्लधर्मी आहे.
उत्तर: चूक
इ.
क्षारांमुळे धातूचे क्षरण होते.
उत्तर: चूक
ई. क्षार
उदासीन असतात.
उत्तर: बरोबर
9. पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटांत वर्गीकरण करा.
HCl, NaCl,
MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3
उत्तर:
आम्लधर्मी : HCl, H2SO4,
HNO3.
आम्लारीधर्मी
: MgO,
MgO,
Na2CO3
उदासीन : NaCl, H2O, KCl,
**************