आठवी सामान्य विज्ञान पाठ पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 8vi samanya vidnyan Sajiv srushti v sukshmjivanche vargikaran prashn uttare
Sajiv srushti v sukshmjivanche vargikaran sanstha swadhyay | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay | 8vi samanya vidnyan swadhyay
1. जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव
यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा.
उत्तर:
१)
जीवाणू : सृष्टी: मोनेरा
२)
आदिजीव : सृष्टी: प्रोटिस्टा
३)
शैवाल : एकपेशीय असल्यास सृष्टी : प्रोटिस्टा
एकपेशीय असल्यास सृष्टी :
वनस्पती
४)
आदिकेंद्रकी : सृष्टी : मोनेरा
५)
दृश्यकेंद्रकी : सृष्टी : मोनेरा सोडून
इतर कोणतीही सृष्टी असू शकते.
६)
सूक्ष्मजीव : सृष्टी : मोनेरा किंवा
2. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा.
उत्तर:
3. माझा जोडीदार शोधा.
अ |
ब ( उत्तरे) |
कवक |
कॅन्डिडा |
प्रोटोझुआ |
अमिबा |
विषाणू |
बॅक्टेरियोफेज |
शैवाल |
क्लोरेल्ला |
जीवाणू |
आदिकेंद्रकी |
आठवी सायन्स स्वाध्याय मानवी शरीर व इंद्रिय संस्था | स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान मानवी शरीर व इंद्रिय संस्था | मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय | सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाठ १ इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
4. दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा.
अ. लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी
जीवाणू आहेत.
उत्तर: चूक
स्पष्टीकरण :
१)
लॅक्टोबॅसिलाय हे उपयोगी जीवाणू आहेत.
२)
दुधापासून दही बनण्याच्या
प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश होतो.
३)
किण्वन प्रक्रियेमध्ये उपयोगी ठरतात.
आ. कवकांची पेशीभित्तिका
कायटीनपासून बनलेली असते.
उत्तर: बरोबर
स्पष्टीकरण :
१)
कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो.
२)
बहुसंख्य
कवके मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात.
३)
3कवकांची पेशीभित्तिका ‘कायटीन’ या जटील
शर्करेपासून बनलेली असते.
इ. अमिबा छद्मपादाच्या
साहाय्याने हालचाल करतो.
उत्तर: बरोबर
स्पष्टीकरण :
१)
अमिबाच्या शरीराच्या काही भागातून
अस्थिर भाग निघू लागतात त्यांनाच छद्मपाद असे म्हणतात.
२)
हे छद्मपाद ज्या दिशेने निघाला त्या
दिशेने संपूर्ण पेशीद्रव्य हळू हळू त्या दिशेला जमा व्हायला सुरुवात होते. अश
प्रकारे अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतो.
ई. प्लास्मोडिअममुळे आमांश
होतो.
उत्तर: चूक
स्पष्टीकरण :
१)
प्लास्मोडिअममुळे मलेरिया होतो. तर
एन्टामिबा हिस्टोलिटीकामुळे अमांश होतो.
उ. टोमॅटोविल्ट हा जीवाणूजन्य
रोग आहे
उत्तर: चूक.
स्पष्टीकरण :
१)
टोमॅटोविल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. या
रोगांचे विषाणू वनस्पतीच्या पेशिंनाच संसर्ग करतात.
5. उत्तरे लिहा.
अ. व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा.
उत्तर:
१)
व्हिटाकर यांनी केलेलं वर्गीकरण
शास्त्रीय पायावर आधारित अधे.
२)
व्हिटाकर वर्गीकरण प्रक्रियेमध्ये
आदिकेंद्रकी सजीव इतर सजीवांपेक्षा वेगळे असतात , म्हणून आदिकेंद्रकी सजीवांना
निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
३)
सर्व एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांचा
समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे
युग्लीना सारख्या वादग्रस्त एकपेशीय सजीवांचे नेमके वर्गीकरण करणे शक्य झाले.
४)
कवक या वर्गाचे पोषण मृतोपजीवी
असल्याने त्याचा समावेश स्वतंत्र सृष्टीमध्ये करण्यात आला आहे.
५)
पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती,
पेशी संघटन, जीवन पद्धती आणि वर्गानुवांशिक संबंध या बाबी लक्षात घेतल्या जातात.
६)
यामुळे व्हीटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी
वर्गीकरण पद्धती ही अचूक ठरते.
सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाठ १ इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण इयत्ता आठवी स्वाध्याय | इयत्ता आठवी विषय विज्ञान धडा पहिला स्वाध्याय
आ. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
१)
विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन
सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात.
२)
विषाणू हे स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात.
३)
वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच
ते राहू शकतात.
४)
विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना
विविध रोग होतात.
इ. कवकांचे पोषण कसे होते?
उत्तर:
१)
कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी
पदार्थयांमध्ये आढळतात.
२)
कवके मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्नशोषण
करतात.
ई. मोनेरा या सृष्टीमध्ये
कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो?
उत्तर:
१)
या सृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असतात.
२)
या सृष्टीतील सजीव हे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात.
३)
हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक
किंवा पेशीअंगके नसतात.
6. ओळखा पाहू मी कोण?
अ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशीअंगके नसतात.
उत्तर:मोनेरामधील सजीव
आ. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल युक्त पेशीअंगके असतात.
उत्तर: प्रोटिस्टामधील आदिजीव
इ. मी कुजलेल्या कार्बनी
पदार्थांवर जगते.
उत्तर: बुरशी, कवकाचा एक प्रकार
ई. माझे प्रजनन बहुधा
द्विखंडनाने होते.
उत्तर: जीवाणू, काही आदिजीव
उ. मी माझ्यासारखी प्रतिकृती
निर्माण करतो.
उत्तर: विषाणू
ऊ. माझे शरीर निरावयवी आहे व मी
हिरव्या रंगाचा आहे.
उत्तर: शैवाल
7. अचूक आकृत्या काढून नावे द्या.
अ. जिवाणूंचे विविध प्रकार
उत्तर:
आ. पॅरामेशिअम
उत्तर:
इ. बॅक्टेरिओफेज
उत्तर:
8. आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा.
जिवाणू, कवक, विषाणू, शैवाल
उत्तर:
विषाणू----जीवाणू-----कवक ----शैवाल
********************