17.मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Manavnirmit padarth swadhyay prashn uttare 8vi samanya vidnyan

आठवी सामान्य विज्ञान पाठ 17 मानवनिर्मित पदार्थ  स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 8vi samanya vidnyan  Manavnirmit padarth prashn uttare

Manavnirmit padarth swadhyay | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | amanya vidnyan iyatta aathavi swadhyay Manavnirmit padarth | 8vi samanya vidnyan swadhyay  | Swadhyay iyatta 8 vi vidnyan dhada 17 va  | Dhada 17 swadhyay iyatta 8vi vidnyan 



1. शोधा म्‍हणजे सापडेल.


अ. प्‍लॅस्टिकमध्‍ये ...... हा गुणधर्म आहे, म्‍हणून त्‍याला हवा तो आकार देता येतो. 
उत्तर : प्‍लॅस्टिकमध्‍ये अकार्यता  हा गुणधर्म आहे, म्‍हणून त्‍याला हवा तो आकार देता येतो.


आ. मोटारगाड्यांना ...... चे कोटिंग करतात. 
उत्तर : मोटारगाड्यांना टेफ्लॉन चे कोटिंग करतात.


इ. थर्माकोल ....... तापमानाला द्रव अवस्‍थेत जातो. 
उत्तर : थर्माकोल 100 डीग्री C पेक्षा अधिक  तापमानाला द्रव अवस्‍थेत जातो.


ई. ....... काच पाण्‍यात विरघळते.
उत्तर : अल्कली सिलिकेट/जल  काच पाण्‍यात विरघळते.
17.मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे |  Manavnirmit padarth swadhyay prashn uttare 8vi samanya vidnyan



2. माझा जोडीदार कोण ?

उत्तर :

अ स्‍तंभ

ब स्‍तंभ ( उत्तरे)

1. शिसेयुक्‍त काच

क.विद्युत बल्‍ब

2. बॅकेलाईट

ड. इलेक्ट्रिक स्विच

3. थर्माकोल

अ. प्‍लेट्स

4. प्रकाशीय काच

इ. दुर्बीण

5. पॉलिप्रोपिलीन

ब. चटया



Iyatta 8vi path 17  Dhwani | आठवी सायन्स स्वाध्याय मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय  | वर्ग आठवा विज्ञान मानवनिर्मित पदार्थ | मानवनिर्मित पदार्थ इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  | इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf  | मानवनिर्मित पदार्थ इयत्ता आठवी स्वाध्याय


3. खालील प्रश्‍नांची उत्‍तरे लिहा. 


अ. थर्माकोल कोणत्‍या पदार्थापासून तयार करतात?

उत्तर :थर्माकोल पॉलीस्‍टायरीन या संश्लिष्ट  पदार्थापासून तयार करतात. 


आ. PVC चे उपयोग लिहा.

उत्तर :
PVC चा उपयोग बाटल्‍या, रेनकोट, पाईप, हॅंडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादी. वस्तू बनवण्यासाठी केला जातो.


इ. पुढे काही वस्‍तूंची नावे दिली आहेत त्‍या कोणत्‍या निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित दार्थांपासून तयार होतात ते लिहा.
(चटई, पेला, बांगडी, खुर्ची, गोणपाट, खराटा, सुरी, लेखणी)

उत्तर :

वस्तू

निसर्गनिर्मित पदार्थ

मानवनिर्मित पदार्थ

चटई

सुतळी, तागाचे धागे

पॉलीप्रोपिलीन

पेला

धातू किंवा धातूसंमिश्रे

काच

बांगडी

सोने, चांदी, लाख, तांबे.

प्लास्टिक , काच

खुर्ची

लाकूड

प्लास्टिक (PVC)

गोणपाट

ताग, काथ्या, कापूस

प्लास्टिक (PVC)

खराटा

वनस्पती तंतू

प्लास्टिक (PVC)

सुरी

धातू संमिश्रे किंवा लोहासारखे धातू

प्लास्टिक

लेखणी

धातू , लाकूड

प्लास्टिक



ई. काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत?

उत्तर : वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्‍प प्रमाणात मॅग्‍नेशिअम ऑक्‍साईड यांचे मिश्रण हे काचेमधील प्रमुख घटक आहेत.


उ. प्‍लॅस्टिक कसे तयार करतात?

उत्तर :
1) नैसर्गिक वायू, क्रूड तेल, दगडी कोळसा, खनिजे आणि वनस्पती अशा विविध नैसर्गिक पदार्थांचा वापर करून प्लास्टिक चे उत्पादन केले जाते. 
2) सुरुवातीला पहिले संश्लेषित प्लास्टिक हे सेल्युलोज या वनस्पती आणि झाडांपासून मिळणाऱ्या पदार्थांपासून बनवले गेले. 
3) साध्या व समान रेणूंच्या साखळीने प्लास्टिक ची रचना झालेली असते या सगळ्यांना पॉलिमर असे म्हणतात. 
4) पॉलिमर हे कार्बन आणि हायड्रोजनपासून बनलेले असतात. 
5) कारखान्यात योग्य त्या रासायनिक प्रक्रिया करून प्लास्टिक निर्मिती केली जाते. 


4. फरक स्‍पष्‍ट करा. 

अ. मानवनिर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ

उत्तर :

मानवनिर्मित पदार्थ

निसर्गनिर्मित पदार्थ

१.     प्रयोगशाळेत प्रक्रिया करून मानवनिर्मित पदार्थ बनवले जातात.

१.     निसर्गातील साधनसंपत्तीचा वापर करून निसर्गनिर्मित पदार्थ बनवले जातात.

२.    मानवनिर्मित पदार्थ बनवताना खूप जास्त आणि कठोर प्रकारात प्रक्रिया कराव्या लागतात .

२.निसर्गातून मिळणाऱ्या पदार्थांना उपयोगात आणण्यासाठी त्यांच्यावर जास्त प्रक्रिया कराव्या लागत नाहीत.

३.    हे पदार्थ टिकावू असतात.

३.हे पदार्थ जास्त काल टिकत नाहीत.

४.   मानवनिर्मित पदार्थांची देखभाल करणे सोपे असते.

४.निसर्गनिर्मित पदार्थ टिकवणे व त्यांची देखभाल करणे कठीण असते.

५.    मानवनिर्मित पदार्थ अशाश्वत असतात त्यामुळे त्यांचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होत असतो.

५.निसर्गनिर्मित पदार्थ शाश्वत असतात त्यांचा पर्यावरणावर विघातक परिणाम होत नाही.

६.    उदा. काच, प्लास्टिक, रबर, कृत्रिम धागे.

६.सुती कापड, रेशीम, लाकूड. इ.




आ. उष्‍मा मृदू प्‍लॅस्टिक व उष्‍मादृढ प्‍लॅस्टिक

उत्तर :

उष्‍मा मृदू प्‍लॅस्टिक

उष्‍मादृढ प्‍लॅस्टिक

१.     ज्या प्लास्टिक ला हवा तसा आकार देता येतो त्या प्लास्टिक ला उष्‍म मृदू प्‍लॅस्टिक असे म्हणतात.

१.ज्या प्लास्टिकला एक साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही त्या प्लास्टिक ला उष्‍मादृढ प्‍लॅस्टिक असे म्हणतात.

२.    या प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनचक्रिकरण करता येते.

२.या प्लास्टिकचा एकदा वापर केल्यानंतर पुन्हा उपयोग करता येत नाही.

 

उदा: PVC , PP, PE

उदा: मेलेमाईन , पॉलिइस्टर , बॅकेलाईट


मानवनिर्मित पदार्थ इयत्ता आठवी स्वाध्याय | इयत्ता आठवी विषय विज्ञान धडा सतरा मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय  | Manavnirmit padarth swadhyay | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay Manavnirmit padarth


5. खालील प्रश्‍नांची तूमच्‍या शब्‍दांत उत्‍तरे लिहा.


अ. पर्यावरण व मानवी आरोग्‍यावर खालील पदार्थांचा होणारा परिणाम व उपाययोजना स्‍पष्‍ट करा.


1. प्‍लॅस्टिक

उत्तर :

१) प्‍लॅस्टिक अविघटनशील आहे आणि त्यामुळे ते पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक आहे.
२) प्लास्टिक पाण्यात फेकले तर जलचर प्राण्यांची हानी होते.
३) प्लास्टिक जाळले तर मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. 
४) पर्यावरणात प्लास्टिक हजारो वर्षे जसेच्या तसे पडून राहते. 
उपाययोजना : 
१) प्‍लॅस्टिकच्‍या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरावयास हव्यात. 
२) उदाहरणार्थ, सूतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्‍या इ.


2. काच 

उत्तर :
१) काच निर्मितीमध्ये सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड असे वायू वातावरणात सोडले जातात. या वायुमुळे हरित गृह परिणाम होतो. 
२) काच हा अविघनशील पदार्थ आहे. त्यामुळे त्याप्सून प्रदूषण होते.
३) काच अविघटनशील असल्‍यामुळे काचेच्‍या टाकाऊ वस्‍तूंचे तुकडे पाण्‍याबरोबर जलाशयात वाहून गेल्‍यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. 
४) तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्‍याची गटारे तुंबून समस्‍या निर्माण होऊ शकतात.
उपाययोजना 
१) काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्‍या प्रकारे होऊ शकते. ते केल्‍यास हा धोका टाळला जाऊ शकतो.



3. थर्माकोल

उत्तर :
१) स्‍टाइरिनमध्‍ये कर्करोगजन्‍य घटक असल्‍यामुळे थर्माकोलच्‍या सतत सान्निध्‍यात असणाऱ्या व्‍यक्‍तींना रक्‍ताचा ल्युकेमिआ (Leukemia) व लिम्‍फोमा (Lymphoma) याप्रकारचा कर्करोग होण्‍याची शक्‍यता असते.
२) थर्माकोलच्‍या ज्‍वलनामुळे विषारी वायू हवेत सोडले जातात.
३) जर थर्माकोलच्‍या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्‍हा गरम केले तर स्‍टायरीनचा काही अंश त्‍या अन्‍नपदार्थांमध्‍येविरघरळण्‍याची शक्‍यता असते. त्यामुळे अपाय होण्‍याची शक्‍यता असते.
उपाययोजना
१)  थर्माकोल चा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे.


आ. प्‍लॅस्टिक अविघटनशील असल्‍याने पर्यावरणाला समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत, या समस्‍या कमी करण्‍यासाठी तुम्‍ही कोणते उपाय कराल? 

उत्तर :
१) प्‍लॅस्टिकच्‍या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरावयास हव्यात. उदाहरणार्थ, सूतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्‍या इ.
२) प्रत्येक सुजाण नागरिकाने 4R सिध्‍दांताचा उपयोग करणे गरजेचे आहे ते म्‍हणजे, Reduce - कमीत कमी वापर Reuse - पुन्‍हा उपयोग करणे. Recycle - पुनर्चक्रीकरण Recover - पुन्‍हा प्राप्‍त करणे. तरच पर्यावरण प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो.
३) काही ठिकाणी प्लास्टिक चा वापर रस्ते तयार करण्यासाठी केला जातो. अशा ठिकाणी जुन्या आणि वापरलेल्या प्लास्टिक ची विक्री केल्यास चांगले मूल्य देखील मिळते. 
४) प्लास्टिक चा वापर करणे जेवढे टाळता येईल तेवढे टाळण्याच्या प्रयत्न करावा. 
५) प्लास्टिक च्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत समाजात जनजागृती करावी.



6. टीपा लिहा.


अ. काचनिर्मिती

उत्तर : 
१) काच बनविण्‍यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्‍प प्रमाणात मॅग्‍नेशिअम ऑक्‍साईड यांचे मिश्रण भट्टीमध्‍ये तापवतात. 
२) वाळू म्‍हणजेच सिलिकॉन डायॉक्‍साईड वितळण्‍यास सुमारे 1700 0 C तापमानाची गरज असते. कमी तापमानावर मिश्रण वितळण्‍यासाठी मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे घालतात. त्‍यामुळे सुमारे 850 0 C तापमानावर वितळते. 
३) मिश्रणातील सर्व पदार्थ द्रवरूपात गेल्‍यानंतर ते 1500 0 C पर्यंत तापवून एकदम थंड केले जातात. 
४) एकदम थंड केल्‍याने मिश्रण स्‍फटिक रूप घेत नाहीत, तर एकजिनसी अस्‍फटिक पारदर्शक रूप प्राप्‍त होते. यालाच काच म्‍हणतात.


आ. प्रकाशिय काच 

उत्तर : 
१) वाळू, सोडा, चुनखडी, बेरिअम ऑक्‍साइड आणि बोरॉन यांच्‍या मिश्रणातून प्रकाशीय काच तयार केली जाते.
२) चष्‍मे, दुर्बिणी, सूक्ष्‍मदर्शी यांची भिंगे बनविण्‍यासाठी शुद्‍ध काचेची गरज असते.


इ. प्लॅस्टिकचे उपयोग

उत्तर :
1. प्‍लॅस्टिकचा उपयोग आरोग्यसेवा क्षेत्रात केला जातो, जसे की सिरिंज, इत्यादी. 
2. मायक्रोवेव्‍ह ओव्‍हनमध्ये अन्न शिजविण्यासाठी वापरली जाणारी भांडी ही प्लॅस्टिकपासून बनवलेली असतात.
3. वाहनांचे ओरखड्यांपासून संरक्षण होण्यासाठी गाडीवर टेफ्लॉन कोटींग (Teflon coating) करण्यात येते. टेफ्लॉन हा एक प्‍लॅस्टीकचाच प्रकार आहे. 
4. विमानाचे काही भाग जोडण्‍यासाठी काही प्रकारच्‍या प्‍लॅस्टिकचा उपयोग होतो. 
6. भिंगे, कृत्रिम दात बनविण्‍यासाठी पॉलीअॅक्रेलिक प्‍लॅस्टिकचा वापर होतो.

------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.