4. धाराविद्युत आणि चुंबकत्व स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Dharavidyut aani chumbkatwa swadhyay prashn uttare 8vi samanya vidnya

आठवी सामान्य विज्ञान पाठ ४  धाराविद्युत आणि चुंबकत्व स्वाध्याय प्रश्न उत्तरे  | 8vi samanya vidnyan Dharavidyut aani chumbkatwa prashn uttare


1. रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा.

(चुंबकत्व, 4.5V, 3.0V, गुरूत्वाकर्षण, विभवांतर, विभव, अधिक, कमी, 0V)


अ. धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील  पातळीवर पडते, याचे कारण .....

उत्तर: धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील  पातळीवर पडते, याचे कारण गुरूत्वाकर्षण

 

आ.एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स .......... विभव असलेल्या बिंदूपासून ...... विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात.

उत्तर: एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात.

 

आठवी सायन्स स्वाध्याय धाराविद्युत आणि चुंबकत्व   स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान धाराविद्युत आणि चुंबकत्व    धाराविद्युत आणि चुंबकत्व  स्वाध्याय  धाराविद्युत आणि चुंबकत्व  पाठ चौथा  इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf  धाराविद्युत आणि चुंबकत्व  इयत्ता आठवी स्वाध्याय  आठवी विषय विज्ञान धडा चौथा  स्वाध्याय  Dharavidyut aani chumbkatwa 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare  Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar  Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay  8vi samanya vidnyan dhada 4 swadhyay

इ. विद्युतघटाच्या धन अग्र व ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे .......  होय.

उत्तर: विद्युतघटाच्या धन अग्र व ॠण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय.

 

ई. 1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी  स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर  ...... V इतके असेल.

उत्तर: 1.5 V विभवांतराच्या 3 विद्युतघटांची बॅटरी  स्वरूपात जोडणी केली आहे. या बॅटरीचे विभवांतर  4.5V  इतके असेल.


     हे सुध्दा पहा : 

१) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  


उ. एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा  तारेभोवती ..... निर्माण करते.

उत्तर: एखाद्या विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा  तारेभोवती चुंबकत्व निर्माण करते.

 

2) 3 कोरड्या विद्युतघटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे. तारा कशा जोडाल ते आकृतीसह स्पष्ट करा.

उत्तर:


            एकसर जोडणीमध्ये ३ कोरडे विद्युतघट जोडत असताना एका घटाचे धनटोक दुसऱ्याच्या ऋण टोकाला व दुसऱ्याचे धन टोक तिसऱ्याच्या ऋण टोकाला जोडले. पहिल्या घटाचे ऋण टोक व तिसऱ्या घाटाचे धन टोक यांमध्ये इलेक्ट्रिक बल्ब जोडावा.

 

3. एका विद्युतपरिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले  असून बॅटरीत दोन समान विभवांतराचे घट बसविले  आहेत. जर बल्ब प्रकाशित होत नसेल, तर ते कशामुळे  याचा शोध घेण्यासाठी कोणत्या तपासण्या कराल ?

उत्तर:

१)    तारांचा प्रत्येक जोड नीट जोडला आहे की नाही ते तपासून पाहावे.

२)   जोड तारांच्या टोकावरील रोधित आवरण पूर्णपणे काढले आहे की नाही ते पाहावे.

३)   एका विद्युत घटाच्या धन टोकाला दुसऱ्या विद्युत घटाचे ऋण टोक जोडले गेले आहे की नाही ते तपासून पाहावे.

 

आठवी सायन्स स्वाध्याय धाराविद्युत आणि चुंबकत्व  | स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान धाराविद्युत आणि चुंबकत्व   | धाराविद्युत आणि चुंबकत्व  स्वाध्याय | धाराविद्युत आणि चुंबकत्व  पाठ चौथा  इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

4. प्रत्येकी 2 V विभवांतराचे विद्युतघट खालीलप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत. दोन्ही जोडण्यांत बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल?

 

4. धाराविद्युत आणि चुंबकत्व स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे |  Dharavidyut aani chumbkatwa swadhyay prashn uttare 8vi samanya vidnya


उत्तर:

१)    तीन घट एकसर पद्धतीने जोडलेले आहे.

एकूण विभवांतर =  2V + 2V + 2V

                      =  6V


२)   चार घट एकसर पद्धतीने जोडलेले आहेत.

एकूण विभवांतर =  2V + 2V + 2V+ 2V

                      =  8V


 इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | धाराविद्युत आणि चुंबकत्व  इयत्ता आठवी स्वाध्याय | आठवी विषय विज्ञान धडा चौथा  स्वाध्याय | Dharavidyut aani chumbkatwa 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare

5. कोरड्या विद्युतघटाची रचना, कार्य व उपयुक्तता यांचे  थोडक्यात वर्णन आकृतीच्या साहाय्याने करा.

उत्तर:


Dharavidyut aani chumbkatwa 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare  Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar  Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay  8vi samanya vidnyan dhada 4 swadhyay


                    विद्युत घटाच्या बाहेरील आवरणाच्या आतमध्ये  एक पांढरट धातूचे आवरण असते हे आवरण जस्त (Zn) या धातूचे आवरण असते . हे आवरण विद्युत घटाचे ऋण टोक म्हणून कार्य करते. जस्ताच्या आवरणाच्या आतमध्ये आणखी एक आवरण असते. या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी (Electrolyte) भरलेली असते. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित व ॠणप्रभारित आयन असतात. त्यांच्यामार्फत विद्युतवहन होते. ही अपघटनी म्हणजे ZnCl 2 (झिंक क्लोराईड) आणि NH 4 Cl (अमोनिअम क्लोराईड) यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो. घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी असते. हे घटाचे धन टोक असते. कांडीच्या बाहेरील भागात MnO 2 (मँगनीज डायॉक्साइड) ची पेस्ट भरलेली असते. या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारा दोन्ही टोकांवर (graphite rod, zinc) विद्युतप्रभार तयार होतो व परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो.

          कोरडे विद्युतघट वापरायला सोयीचे असतात. कारण ते उभे, आडवे, तिरपे कसेही ठेवता येतात. रेडीओ संच, भिंतीवरील घड्याळ, विजेरी, खेळणी, रिमोट कंट्रोल यासारख्या चल साधनांमध्ये सहजपणे वापरता येतात.

 

6. विद्युतघंटेची रचना व कार्य आकृतीच्या साहाय्याने वर्णन करा.

उत्तर:

Dharavidyut aani chumbkatwa 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare  Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar  Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay  8vi samanya vidnyan dhada 4 swadhyay


तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युतचुंबक म्हणून कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युतचुंबकाजवळ बसवलेली असते. ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो.

ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. परीपाथातील काळ वापरून परिपथ पूर्ण केल्यावर,  स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युतचुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून नाद होतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि परिपथातील विद्युतप्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युतचुंबकाचे चुंबकत्व नाहिसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युतप्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा खणाणते.

कळ वापरून परिपथातील विद्युत प्रवाह बंद केल्यावर घंटेचा खणखणाट थांबतो.

 

 *****************


    हे सुध्दा पहा : 

१) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.