आठवी सामान्य विज्ञान पाठ 6 द्रव्याचे संघटन स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 8vi samanya vidnyan Dravyache sanghatan prashn uttare
Dravyache sanghatan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare| Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Dravyache sanghatan Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay | 8vi samanya vidnyan dhada 6 swadhyay
1. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा.
अ. स्थायूच्या कणांमध्ये
आंतररेण्वीय बल ........ असते.
(i) कमीत कमी
(ii) मध्यम
(iii) जास्तीत जास्त
(iv) अनिश्चित
उत्तर: स्थायूच्या कणांमध्ये आंतररेण्वीय बल जास्तीत जास्त असते.
आ. स्थायूंवर बाह्य दाब
दिल्यावरसुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला ........ म्हणतात.
(i) आकार्यता
(ii) असंपीड्यता
(iii) प्रवाहिता
(iv) स्थितिस्थापकता
उत्तर: स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावरसुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला असंपीड्यता म्हणतात.
इ. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना ..... हा निकष लावला जातो.
(i) द्रव्याच्या अवस्था
(ii) द्रव्याच्या प्रावस्था
(iii) द्रव्याचे
रासायनिक संघटन
(iv) यांपैकी सर्व
उत्तर: द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष लावला जातो.
ई. दोन किंवा अधिक घटक पदार्थ
असणाऱ्या द्रव्याला ........ म्हणतात.
(i) मिश्रण
(ii) संयुग
(iii) मूलद्रव्य
(iv) धातुसदृश
उत्तर: दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला मिश्रण म्हणतात.
उ. दूध हे द्रव्याच्या ........
ह्या प्रकाराचे उदाहरण आहे.
(i) द्रावण
(ii) समांगी मिश्रण
(iii) विषमांगी मिश्रण
(iv) निलंबन
उत्तर: दूध हे द्रव्याच्या समांगी मिश्रण ह्या प्रकाराचे उदाहरण आहे.
ए. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण
तीनही .... आहेत.
(i) द्रवपदार्थ
(ii) संयुगे
(iii) अधातू
(iv) मूलद्रव्ये
उत्तर: पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण
तीनही द्रवपदार्थ आहेत.
ऐ. कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डायऑक्साइड ह्या
संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात ........ रासायनिक बंध असतात.
(i) 1
(ii) 2
(iii) 3
(iv) 4
उत्तर: कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डायऑक्साइड ह्या
संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात 2 रासायनिक बंध असतात.
2. गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण द्या.
अ. सोने, चांदी, तांबे, पितळ
उत्तर: पितळ
पितळ हे धातूचे मिश्रण आहे व इतर सर्व धातू आहेत.
आ. हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ
उत्तर: हायड्रोजन
हायड्रोजन हे मूलद्रव्य आहे.
आहे इतर सर्व संयुगे आहेत.
इ. दूध, लिंबूरस, कार्बन, पोलाद
उत्तर: कार्बन
कारण कार्बन हे मूलद्रव्य आहे
इतर सर्व मिश्रणे आहेत.
ई. पाणी, पारा, ब्रोमीन, पेट्रोल
उत्तर: पेट्रोल
कारण पेट्रोल हे सेंद्रिय संयुग
आहे. इतर सर्व असेन्द्रीय संयुगे आहेत.
उ. साखर, मीठ, खाण्याचा सोडा, मोरचूद
उत्तर: मोरचूद
कारण मोरचूद हे सेंद्रिय संयुग
आहे. इतर सर्व असेन्द्रीय संयुगे आहेत.
ऊ. हायड्रोजन, सोडिअम, पोटॅशिअम, कार्बन
उत्तर: कार्बन
कारण कार्बनची संयुजा 4 आहे.
इतर सर्वांची संयुजा एक आहे.
आठवी सायन्स स्वाध्याय द्रव्याचे संघटन | स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान द्रव्याचे संघटन | द्रव्याचे संघटन स्वाध्याय | द्रव्याचे संघटन पाठ सहावा इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड व पाणी यांच्यापासून ग्लूकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. या प्रक्रियेतील चार संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा.
उत्तर:
या प्रक्रियेतील चार संयुगे आणि
त्यांचे प्रकार:
१)कार्बन डायऑक्साईड - असेंद्रिय संयुग
२)पाणी - असेंद्रिय संयुग
३)ग्लुकोज - सेंद्रिय संयुग
४)क्लोरोफिल – जटील संयुग
आ. पितळ ह्या संमिश्राच्या एका
नमुन्यात पुढील घटक आढळले : तांबे (70%) व जस्त (30%). यामध्ये द्रावक, द्राव्य व
द्रावण कोण ते लिहा.
उत्तर:
द्रावक : तांबे
द्राव्य : जस्त
द्रावण : पितळ
इ. विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%, भूमध्य समुद्र : 3.8%, मृत समुद्र : 33.7%. या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्येस्पष्ट करा.
उत्तर:
१) मिश्रणाच्या घटकांमध्ये कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही.
२) मिश्रणातील घटक पदार्थ हे एकमेकांत कोणत्याही प्रमाणत मिसळलेले असतात.
३) भौतिक पद्धतीने मिश्रणातील घटक सहज वेगळे करता येतात.
4. प्रत्येकी दोन उदाहरणे द्या.
अ. द्रवरूप मूलद्रव्य
उत्तर:
१) ब्रोमिन
२) पारा
आ. वायुरूप मूलद्रव्य
उत्तर:
१) ऑक्सिजन
२) हायड्रोजन
इ. स्थायुरूप मूलद्रव्य
उत्तर:
१) चांदी
२) तांबे
ई. समांगी मिश्रण
उत्तर:
१) समुद्राचे पाणी
२) पाण्यात विरघळलेला मोरचूद
उ. कलिल
उत्तर:
१) रक्त
२)दुध
ऊ. सेंद्रिय संयुग
उत्तर:
१) युरिया
२) ग्लुकोज
ए. जटिल संयुग
उत्तर:
१) क्लोरोफिल
२) हिमोग्लोबिन
ऐ. असेंद्रिय संयुग
उत्तर:
१) सोडा
२) चुनखडी
ओ. धातुसदृश
उत्तर:
१) सिलिकॉन
२) अर्सेनिक
औ. संयुजा 1 असलेले मूलद्रव्य
उत्तर:
१) सोडीअम
२) क्लोरीन
हे सुध्दा पहा :
१) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
२) आठवी सर्व विषयांची पुस्तके pdf
उत्तर:
१) कॅल्सिअम
२)ऑक्सिजन
5. पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून त्या त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा.
अ.क्र. |
रेणूसूत्रे |
संयुगातील घटक
मूलद्रव्य व संज्ञा |
संयुजा |
1. |
KCl |
पोटॅशिअम(K) क्लोरीन (Cl) |
1 1 |
2. |
HBr |
हायड्रोजन (H) ब्रोमीन (Br) |
1 1 |
3. |
MgBr2 |
मॅग्नेशिअम (Mg) ब्रोमीन (Br) |
2 1 |
4. |
K2O |
पोटॅशिअम (K) ऑक्सिजन (O) |
1 2 |
5. |
NaH |
सोडीअम (Na) हायड्रोजन (H) |
1 1 |
6. |
CaCl2 |
कॅल्सिअम (Ca) क्लोरीन (Cl) |
2 1 |
7. |
CCl4 |
कार्बन (C) क्लोरीन (Cl) |
4 1 |
8. |
HI |
हायड्रोजन (H) आयोडीन (I) |
1 1 |
9. |
H2S |
हायड्रोजन (H) सल्फर (S) |
1 2 |
10. |
Na2S |
सोडीअम (Na) सल्फर (S) |
1 2 |
11. |
FeS |
आयर्न (Fe) सल्फर (S) |
2 2 |
12. |
BaCl2 |
बेरीअम (Ba) क्लोरीन (Cl) |
2 1 |
इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | द्रव्याचे संघटन इयत्ता आठवी स्वाध्यायआठवी विषय विज्ञान धडा सहावा स्वाध्याय | Dravyache sanghatan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar
6.काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा.
उत्तर:
द्रव्याचे
नाव |
रासायनिक
संघटन |
द्रव्याचा
मुख्य प्रकार |
समुद्राचे पाणी |
H 2 O + NaCl + MgCl2 +... |
मिश्रण |
उर्ध्वपातित पाणी |
H2O |
संयुग |
फुग्यात भरलेला हायड्रोजन वाय |
H2 |
मूलद्रव्य |
LPG सिलिंडरमधील वायू C4 |
C4H10 + C3H8 |
मिश्रण |
खाण्याचा सोडा |
NaHCO3 |
संयुग |
शुद्ध सोन |
Au |
मूलद्रव्य |
ऑक्सिजनच्या नळकांड्यातील
वायू |
O 2 |
मूलद्रव्य |
कास्य |
Cu + Sn |
मिश्रण |
हिरा |
C |
मूलद्रव्य |
मोरचूद |
CuSO4 |
संयुग |
चूनखडी |
CaCO 3 |
संयुग |
विरल हायड्रोक्लोरिक आम्ल |
HCl + H2O |
मिश्रण |
7. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास
मदत करते.
उत्तर:
१) हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या
रासायनिक अभिक्रीयेने पाणी हे संयुग बनलेले आहे.
२)संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्यांपेक्षा
वेगळे असतात.
३)म्हणून पाणी जळतही नाही किंवा
ज्वलनाला मदत करीत नाही, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते.
आ. कलिलाचे घटक पदार्थगाळणक्रियेने वेगळे करता येत नाहीत.
उत्तर:
१) कालिल हे विषमांगी मिश्रण आहे.
२) कलिलाचे काळ गाळण कागदामधून सहज आरपार होतात.
३) कारण कालिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गाळण कागदाची छिद्रे मोठी असतात.
म्हणून कलीलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाही.
इ. लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते.
उत्तर:
१) लिंबू सरबत हे लिंबू रस,
साखर मीठ आणि पाणी या घटकांचे मिश्रण आहे.
२) लिंबू सरबत बनवत असताना
कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही.
३) मिश्रणातील घटकांचे गुणधर्म
बदलत नाहीत म्हणून लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते
पेल्यामध्ये ओतता येते.
ई. स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात.
उत्तर:
१) स्थायुमध्ये आंतररेण्वीय बाल अधिक प्रमाणात असते.
२) त्यामुळे स्थायुचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात.
३) यामुळे स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार आव आकारमान हे गुणधर्म असतात.
8. पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा.
अ. C (संयुजा 4) व Cl (संयुजा 1)
उत्तर :
पायरी 1.: मूलद्रव्याची संज्ञा लिहा.
C Cl
पायरी 2: प्रत्येक
मूलद्रव्याच्या खाली त्याची संयुजा लिहा.
C Cl
4 1
पायरी 3: मूलद्रव्यांच्या
संयुजांचा तिरकस गुणाकार
C×1 Cl×4
मिळालेले रेणूसूत्र : CCl4
आ. N (संयुजा 3) व H (संयुजा 1)
उत्तर:
पायरी 1.: मूलद्रव्याची संज्ञा लिहा.
N H
पायरी 2: प्रत्येक
मूलद्रव्याच्या खाली त्याची संयुजा लिहा.
N H
3 1
पायरी 3: मूलद्रव्यांच्या
संयुजांचा तिरकस गुणाकार
N×1 H×3
मिळालेले रेणूसूत्र : NH3
इ. C (संयुजा 4) व O (संयुजा 2)
उत्तर:
पायरी 1.: मूलद्रव्याची संज्ञा लिहा.
C O
पायरी 2: प्रत्येक
मूलद्रव्याच्या खाली त्याची संयुजा लिहा.
C O
4 2
पायरी 3: मूलद्रव्यांच्या
संयुजांचा तिरकस गुणाकार
C×2 O×4
मिळालेले रेणूसूत्र : C2O4
2 ने भागून मिळालेले
रेणूसूत्र .
मिळालेले रेणूसूत्र : CO2
ई. Ca (संयुजा 2) व O (संयुजा 2)
उत्तर:
पायरी 1.: मूलद्रव्याची संज्ञा लिहा.
Ca O
पायरी 2: प्रत्येक
मूलद्रव्याच्या खाली त्याची संयुजा लिहा.
Ca O
2 2
पायरी 3: मूलद्रव्यांच्या
संयुजांचा तिरकस गुणाकार
Ca
×2 O
×2
मिळालेले रेणूसूत्र : Ca2O2
2 ने भागून मिळालेले
रेणूसूत्र .
मिळालेले रेणूसूत्र : CaO.
हे सुध्दा पहा :
१) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे