8.प्रदूषण स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Pradushan swadhyay prashn uttare 8vi samanya vidnyan

आठवी सामान्य विज्ञान पाठ 8 प्रदूषण स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 8vi samanya vidnyan Pradushan prashn uttare

Pradushan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Pradushan Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay | 8vi samanya vidnyan dhada 8 swadhyay



1. खाली काही वाक्ये दिली आहेत, ती कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडतात ते सांगा.


अ.  दिल्लीत भरदिवसा धुके असल्याचे जाणवते.

उत्तर: हवा प्रदूषण


आ.पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा  त्रास होतो.

उत्तर: जलप्रदूषण


इ. बरेचदा बगीच्यात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रास  होतो.

उत्तर: हवा प्रदूषण

आठवी सायन्स स्वाध्याय प्रदूषण स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान प्रदूषण प्रदूषण स्वाध्याय प्रदूषण पाठ आठवा  इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf प्रदूषण इयत्ता आठवी स्वाध्याय आठवी विषय विज्ञान धडा आठवा  स्वाध्याय Pradushan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar Pradushan Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay 8vi samanya vidnyan dhada 8 swadhyay


ई. काही भागांतील मातीत पिकांची वाढ होत नाही.

उत्तर: मृदा प्रदूषण


उ. जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना श्वसनाचे रोग, धाप लागणे असे  त्रास होतात.

उत्तर: हवा प्रदूषण


  १) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  pdf

2. परिच्छेद वाचून त्‍यात कोणकोणते प्रदूषणाचे विविध प्रकार आलेत व कोणत्‍या वाक्‍यात आलेत ते नोंदवा.

                    निलेश शहरी भागात राहणारा व इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा आहे. दररोज तो शाळेत बसने जातो, शाळेत जाण्यासाठी त्याला एक तास लागतो. शाळेत जाताना त्याला वाटेत अनेक चार चाकी, दोन चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्याला शहरापासून लांब राहण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाच्या गावाला पाठविले. निलेश जेंव्हा गावात फिरला तेंव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले, अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती, काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला.

उत्तर:

वाक्य

प्रदूषणाचा प्रकार

काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला.

हवा प्रदूषण

निलेश जेंव्हा गावात फिरला तेंव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले,

मृदा प्रदूषण

अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती,

जैविक प्रदूषण , हवा प्रदूषण

काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले

जल प्रदूषण

काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला.

जल प्रदूषण


आठवी सायन्स स्वाध्याय प्रदूषण | स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान प्रदूषण | प्रदूषण स्वाध्याय | प्रदूषण पाठ आठवा  इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | प्रदूषण इयत्ता आठवी स्वाध्याय


3. ‘अ’ व ‘ब’ स्तंभाची योग्य सांगड घालून प्रदूषित घटकाचा  मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.

अ’स्तंभ

‘ब’ स्तंभ (उत्तर)

1. कोबाल्टमिश्रित पाणी

ब. अर्धांग वायू

2. मिथेन वायू

ड. त्वचेचा कॅन्सर

3. शिसेमिश्रित पाणी

अ. मतिमंदत्व

4. सल्फर डायऑकसाइड

इ. डोळे चुरचुरणे

5. नायट्रोजन डायऑक्साइड

क. फुफ्फुसांवर सूज येणे

 

4. चूक की बरोबर ठरवा.


अ. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी  प्रदूषित होत नाही.

उत्तर: चूक


आ. विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितके प्रदूषण जास्त होते.

उत्तर: बरोबर

 

5. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.


अ. प्रदूषण व प्रदूषके म्हणजे काय ?

उत्तर:

१)प्रदूषण:  नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.

२) प्रदूषके : परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या, अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर)घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात.

 

आ.आम्‍लपर्जन्य म्‍हणजे काय ?

उत्तर:

१)    कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते.

२)   ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्येमिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.

 

इ. हरितगृह परिणाम म्‍हणजे काय ?

उत्तर:

१)    CO 2 वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो.

२)   मागील शंभर वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणामधील CO 2 चे प्रमाण वाढले आहे.

३)   या CO 2 चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच ‘हरितगृह परिणाम’ होय.

 

ई. दृश्य प्रदूषके व अदृश्य प्रदूषके कोणती ?

उत्तर:

१)    जी प्रदूषके आपल्या डोळ्यांना सहज दिसून येतात , त्यांना दृश्य प्रदूषके म्हणतात.

उदा: घनकचरा, धातूच्या वस्तू, पाण्यावर तरंगणारे पदार्थ, प्लास्टिक पिशव्या व वस्तू इ.

२)   जी प्रदूषके पाण्यात अथवा हवेमध्ये संपूर्णपणे मिसळून गेलेली असतील अशा प्रदुशाकांना अदृश्य प्रदूषके असे म्हणता येईल .

उदा: हवेत फवारलेली कीटकनाशके, पाण्यात विद्राव्य असलेले विषारी पदार्थ इत्यादी .

 

6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. तुमच्या आसपासच्या भागात आढळलेली हवा प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण यांची प्रत्येकी  दोन उदाहरणे द्या.

उत्तर:

हवा प्रदूषण

१)    वाढत्या वाहनांच्या रहदारीमुळे , हवा प्रदूषणात वाढ होत आहे.

२)   कंपन्यांच्या चिमणीतून बाहेर सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषण होते.

जल प्रदूषण

१)    तलावातील पाण्यावर मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली दिसते.

२)   नदीतील पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा तरंगताना दिसतो.

मृदा प्रदूषण

१)    पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ सगळीकडे पसरून दुर्गंधी येते.

२)   जमिनीवर कचऱ्याचे ढीग दिसतात, त्यात सुया, काचेचे तुकडे, जुन्या औषधांच्या बाटल्या असे घटक दिसून येतात.

 

आ. वाहनांमुळे प्रदूषण कसे घडते ? कमीत कमी प्रदूषण ज्यामुळे घडते अशा काही वाहनांची नावे सांगा.

उत्तर:

१)    वाहनातील जीवाश्म इंधनाच्या अर्धवट ज्वलनामुळे कणरूप पदार्थ, ज्वलन न झालेली हायड्रोकार्बन , कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात.

२)   पेट्रोल डीझेल नैसर्गिक वायू  यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकला जातो.या कारणामुळे वाहने सर्वात जास्त प्रदूषण करतात.

३)   प्रदूषण न करणारे वाहन म्हणजे सायकल.

४)  सी.एन.जी वर चालणारी वाहने कमी प्रदूषण करतात.

५)   विजेवर चालणाऱ्या गाड्यांमुळे प्रदूषण होत नाही.

 

इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | प्रदूषण इयत्ता आठवी स्वाध्याय | आठवी विषय विज्ञान धडा आठवा  स्वाध्याय | Pradushan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar


इ. जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती ते लिहा.

उत्तर: 

1.     जलपर्णीची वाढ

2.     कुजणारे पदार्थ पाण्यात मिसळले की पाणी प्रदूषित होते आणि पाण्याला दुर्गंधी यायला सुरुवात होते.

3.     गाळ साचून राहिल्याने नदीपात्रात प्रदूषण होते.  

4.     जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यांसारखे सूक्ष्मजीव अनेक जैविक, अजैविक घटक पाण्यात मिसळतात.

5.     पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रीय पदार्थांवर कवक व जीवाणूंची वाढ होते.

6.     शैवाल  जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते.

 

ई. हवा प्रदूषणा वर कोणतेही चार प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.

उत्तर:

1. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात, हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदा. निरोधक यंत्रणा (Arresters), गाळणीयंत्र (Filters) यांचा वापर करावा.

2. शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.

3. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रेयांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे.

 4. CFC निर्मितीवर बंदी/बंधने आणावीत.

 

उ. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध  स्पष्ट करा./परिणाम सांगा.

उत्तर:

१)    वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चालले आहे.

२)   यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण ह्यात बिघाड

३)   वाढत्या तापमानामुळे हिमनग व हिमनद्या वितळून समुद्रपातळीमध्ये वाढ दिसून येत आहे.

४)  समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्यामुळे त्यातील प्रवाह बदलले जाऊन चक्री वादळे ढग फुटी, अश नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत.

५)   वन्य प्राण्याचे स्थलांतर होत आहे.

 

ऊ. हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण व पाणी प्रदूषण यावर प्रत्येकी दोन-दोन घोष वाक्ये तयार करा.

उत्तर:

हवा प्रदूषण

१)    झाडे लाऊन हवा शुद्ध करू, प्रदूषणावर मात करू

२)   पृथ्वीला कष्ट देऊ नका, वायुप्रदुषण करू नका.

मृदा प्रदूषण

१) घरगुती कचरयाचे योग्य समाधान, मृदा प्रदूषणाचे योग्य निदान .

२) कचरा अती, माती रीती.

पाणी प्रदूषण

१)     पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.

२)    थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा.


7. खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्‍ये वर्गीकरण करा.

सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा  धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्‍ठा.

उत्तर:

मानवनिर्मित प्रदूषके

निसर्गनिर्मित प्रदूषके

सांडपाणी, धूळ, रासायनिक खते, वाहनांचा  धूर, किटकनाशके.

धूळ, परागकण, शैवाल, पशुपक्ष्यांची विष्‍ठा.

 

***********

 १) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  pdf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.