9. आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Aapatti Vyavsthapan swadhyay prashn uttare 8vi samanya vidnyan

आठवी सामान्य विज्ञान पाठ 9 आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 8vi samanya vidnyan Aapatti Vyavsthapan prashn uttare


Aapatti Vyavsthapan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar | Aapatti Vyavsthapan Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay | 8vi samanya vidnyan dhada 9 swadhyay

1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ. बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यांतील संबंध व कारणे स्पष्ट करा.

उत्तर:

१)    कठीण पाषाणात नैसर्गिकरीत्या भेगा व फटी असतात. या भेगांमुळे मोठ्या खडकांचे तुकडे होऊन या फटी अजून रुंदावतात.

२)   अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये खडकातील भेगा-फटींमध्ये पाणी शिरून खडकांची झीज होते.

३)   या फटींमध्ये पाणी शिरल्याने वजन वाढते आणि अशा प्रकारचे खडक उतरी प्रदेशात घसरत जावून खलील बाजूस स्थिरावतात.

४)  पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे स्थित्यंतरे अधिक जलद आणि वेगवान होतात.

 
आठवी सायन्स स्वाध्याय आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय आपत्ती व्यवस्थापन पाठ नववा  इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf आपत्ती व्यवस्थापन इयत्ता आठवी स्वाध्याय आठवी विषय विज्ञान धडा नववा स्वाध्याय Aapatti Vyavsthapan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar Aapatti Vyavsthapan Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay 8vi samanya vidnyan dhada 9 swadhyay

आ. भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.

उत्तर:

भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे :

१)    भूकंपाच्यावेळी तुम्ही घरामध्ये असाल, तर भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता सैरावैरा न पळता, आहे त्याच जागी शांत उभे राहावे.

२)   टेबल, पलंग कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल, तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा.

३)   चालत्या वाहनात असाल, किंवा घराबाहेर असाल, तर सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनाच्या आत थांबा, बाहेर येण्याचे टाळा.

४)  इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका.

भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करू नये :

1. बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नका. जिना वापरा.

2. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करा.

3. भूकंपानंतर विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागू शकते. हे टाळण्यासाठी घरातील मेन स्वीच दक्षतापूर्वक बंद करा.

4.अशा प्रसंगी मेणबत्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करू नका. बॅटरी / टॉर्चचा वापर करा.

 

इ. भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती?

उत्तर:

१)    मिनीची ठराविक मर्यादेपर्यत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकामे म्हणतात.

२)   भूकंपरोधक बांधकामामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते.

३)   भूकंप रोधक इमारतींचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.


आठवी सायन्स स्वाध्याय आपत्ती व्यवस्थापन | स्वाध्याय वर्ग आठवा विज्ञान आपत्ती व्यवस्थापन | आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय | आपत्ती व्यवस्थापन पाठ नववा  इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे


ई. दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते  स्पष्ट करा.

उत्तर:

1. नद्यांना अचानक पूर येतात. नद्यांचे मार्ग बदलतात.

2. धबधब्याचे स्थानांतरण होते. कृत्रिम जलाशय निर्माण होतात.

3. दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात. उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात. हे सर्व

दगड-मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते.

4. वाहतुकीच्या रस्त्यांवर लोहमार्गावर दरड कोसळली की, वाहतूक विस्कळीत होते.

5. भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते.

 

उ. धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय? तो स्पष्ट करा.

उत्तर:

१)    धरणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा केलेला असतो. त्यामुळे तेथील जमिनीवर खूप मोठ्या प्रमाणवर ताण पडतो.

२)   भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूकंप होतात.

३)   त्यातच अशा प्रदेशमध्ये जर भूकंपप्रवण गुणधर्म असतील तर त्यामुळे धरणाच्या पाण्याने भूकंप होण्याचा संभव वाढतो.

 

2. शास्त्रीय कारणे द्या.


अ. भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली  आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.

उत्तर:

१)    भूकंपकाळात घर, छप्पर, किंवा इतर जड वस्तू कोसळू शकतात. अशा वेळी डोक्याला दुखापत होण्याचा संभव असतो,

२)   त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी आणि गंभीर स्वरुपाची दुखापत टाळण्यासाठी एखाद्या भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली  आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.

 

आ. पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ  नये.

उत्तर:

१)    अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊ शकते. त्यामुळे डोंगरावरील माती, मोठाले खडक इत्यादी अकस्मात कोसळू शकतात. डोंगराच्या उतारी प्रदेशात घसरत जाऊन हे खाली येतात.

२)   त्यामुळे आपण जर डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेतला, तर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये.

 

इ. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये.

उत्तर:

१)    लिफ्ट ही विजेवर कार्य करते. भूकंपाच्या वेळी वीजपुरवठा खंडित होऊ शकतो किंवा शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो.

२)   जर आपण अशा वेळी लिफ्ट चा वापर केला तर त्यात अडकून राहू शकतो. भूकंपाच्या धक्क्याने इमारत कोसळली तर आपण त्यात अडकून राहू शकतो.

३)   म्हणून भूकंपाच्या वेळी लिफ्ट चा वापर करू नये.  

 

ई. भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.

उत्तर:

१)    भूकंप होत असतांना भूकवच कंप पावते. भूपृष्ठाचा काही भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. यामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात. अशा हादरयामुले इमारतींना धोका पोहचू शकतो.

२)   भूगर्भात निअर्मान होणारे धक्के इमारतींचे नुकसान करू शकतात. हे होऊ नये म्हणून , भूकंपरोधक इमारतींचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.

 

इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | आपत्ती व्यवस्थापन इयत्ता आठवी स्वाध्याय | आठवी विषय विज्ञान धडा नववा स्वाध्याय | Aapatti Vyavsthapan 8vi samanya vidnyan swadhyay prashn uttare | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar

3. भूकंपानंतर मदतकार्य करताना आसपास लोकांची  मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील?

उत्तर:

१)    भूकंपानंतर आसपास लोकांची गर्दी असेल तर तेथे बचावकार्य करणे कठीण होईल.

२)   रुग्णवाहिका किंवा आपत्ती निवारण कक्षाचे जवान अपघातस्थळी योग्य वेळेत पोहचू शकणार नाहीत.

३)   ज्यांना  मदतीची आवश्यकता आहेत अशा लोकांना मदत मिळण्यास उशीर होईल.


१) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  pdf


4. आपत्तीकालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा  संघटना व संस्था यांची यादी करा. त्यांच्या मदतीचे  स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा.

उत्तर:

१)    आपत्ती व्यवस्थापन करण्यासठी  २४ तास सेवा देणारे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येतात.

२)   अतिवृष्टीमुळे पूर आल्यावर साठीच्या रोगांना नियंत्रित करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनी, होमगार्ड, पोलीस , सामाजिक कार्यकर्ते यांचीही मदत मिळते.

 

5. आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्‍देनिहाय माहिती लिहा.

उत्तर:

प्रमुख मुद्दे

नोंदी करायच्या आवश्यक बाबी

शाळेची प्राथमिक माहिती

अ. शाळेचे पूर्ण नाव, पत्ता

आ. मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक

इ. शाळा संस्थापक व व्यवस्थापकांचे नावे व संपर्क क्रमांक

ई. एकूण कर्मचारी

शाळा आपत्ती व्यवस्थापन

समिती

अ. अग्निशामक आ. जागरूकता इ. सूचना ई. वाहतूक व्यवस्थापन

उ. सुरक्षा

ऊ. प्रसारमाध्यम समिती. या सर्व उपसमितीमध्ये प्रत्येकी 2-3 सदस

इमारतीची विस्तृत माहिती

अ. एकूण खोल्यांची संख्या

आ. वर्गांची संख्या इ. इयत्ता

ई. छताच्या बांधकामाचे स्वरूप (लाकडी/पत्रा/सिमेंट)

उ. इमारतीचे वय, वर

शाळेच्या मैदानाविषयी

माहित

अ. शालेय परिसरात असणारे मोकळे मैदानाचा प्रकार, खो-खो, कबड्डी, प्रार्थना व इतर मैदान यांबाबत माहिती आ. मैदानाचे मुख्य रस्त्यापासूनचे अंतर

शाळेतील संभाव्य धोक

अ. संभाव्य धोक्याचे नाव व स्वरूप (साधे, मध्यम व तीव्र) आ. पूर्वी झालेले नुकसान

इ. सध्या केलेली उपाययोजना

शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा

शाळेच्या सर्व इमारती, त्यांची रचना, मैदाने प्रवेशद्वार, शाळेतील संभाव्य धोक्यांच्या जागा, अापत्ती प्रसंगी सुरक्षित जागा, जवळचा रस्ता या सर्व बाबी त्यात दाखवणे अावश्यक आहे. हा नकाशा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा.

 

6. तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्यता  असलेली ठिकाणे आहेत काय? याची जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवा.

उत्तर: आमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेले ठिकाण नाही.

 

7.खालील चित्राच्या साहाय्याने आपत्तीकाळातील तुमची भूमिका काय असेल ते लिहा.


9. आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Aapatti Vyavsthapan swadhyay prashn uttare 8vi samanya vidnyan


उत्तर:

                    चित्रात दाखवलेला मुलगा संकटात आहे. त्याने पाठवलेला संदेश आम्हाला मिळाल्यास आम्ही तातडीने त्यांच्या मदतीला धावून जाऊ. आम्ही त्याला ताबडतोब मदत करू. तसेच पोलीसंना कळवू व पोलिसांची मदत घेवू.

 

*************

  १) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  pdf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.