18. परिसंस्था स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Parisanstha swadhyay prashn uttare 8vi samanya vidnyan

आठवी सामान्य विज्ञान पाठ 18 परिसंस्था स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 8vi samanya vidnyan  parisanstha prashn uttare

Iyatta 8vi chapter 1Parisanstha | आठवी सायन्स स्वाध्याय परिसंस्था स्वाध्याय | वर्ग आठवा विज्ञान परिसंस्था इयत्ता आठवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf | परिसंस्था इयत्ता आठवी स्वाध्याय


1. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.


अ. हवा, पाणी, खनिजे, मृदा ही  रिसंस्थेतील............... घटक होय.

(भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय)

उत्तर :  हवा, पाणी, खनिजे, मृदा ही  रिसंस्थेतील भौतिक घटक होय.

 


इयत्ता आठवी विज्ञान गाईड pdf  परिसंस्था इयत्ता आठवी स्वाध्याय इयत्ता आठवी विषय विज्ञान धडा 18 परिसंस्था स्वाध्याय  Parisanstha swadhyay Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay Parisanstha


आ. परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे ...............परिसंस्थेची उदाहरणे आहे.

(भूतल, जलीय, कृत्रिम)

उत्तर : परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे जलीय  परिसंस्थेची उदाहरणे आहे.

 

इ. परिसंस्थेमध्ये ‘मानव’ प्राणी...... गटात मोडतो.

(उत्पादक, भक्षक, विघटक)

उत्तर : परिसंस्थेमध्ये ‘मानव’ प्राणी भक्षक गटात मोडतो.

 

2. योग्य जोड्या जुळवा.


उत्पादक

परिसंस्था (उत्तरे)

अ. निवडुंग

4. वाळवंटीय

आ. पाणवनस्पती

3. जलीय

इ. खारफुटी

2. खाडी

ई. पाईन

1. जंगल

 

Samanya vidnyan iyatta aathavi swadhyay Parisanstha | 8vi samanya vidnyan swadhyay | Swadhyay iyatta 8 vi vidnyan dhada 18 va | Dhada 18 swadhyay iyatta 8vi vidnyan 


3. माझ्याविषयी माहिती सांगा.


अ. परिसंस्था

उत्तर :

1)    सजीव आणि निर्जिव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते. सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो. या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात.

2)    जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी आंतरक्रियेतून परिसंस्था बनते.

3)    प्रत्येक परीसंस्थेतील उत्पादक म्हणजे वनस्पती, प्राणी हे भक्षक आणि सूक्ष्मजीव हे विघटक असतात.

4)    विघटक जिवाणू आणि इतर सूक्ष्मजीव मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना असेन्द्रीय स्वरुपात पुन्हा निसर्गात पाठवतात.

5)    चांगल्या अवस्थेतील परिसंस्था अशा प्रकारे एकमेकांशी समतोल प्रमाणात राहतात.

 

आ. बायोम्स

उत्तर :

1)    समान गुणधर्म असलेल्या छोट्या-छोट्या परिसंस्था एकत्र आल्या की त्यांचा एक बयोम्स तयार होतो.

2)    पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या ‘बायोम्स’ आढळतात. 1. भू-परिसंस्था व 2. जलीय परिसंस्था

3)    ज्या परिसंस्था फक्त भू-भागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भू- परिसंस्था असे म्हणतात.

4)    उदा. गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था.

5)    जलीय बायोम्समध्ये गोड्या पाण्याची परिसंस्था , सागरी परिसंस्था आणि खडीची परिसंस्था या परिसंस्थांचा समावेश होतो.

 

 

इ. अन्नजाळे

उत्तर :

1)    बहुतेक परीसंस्थेतील अन्नसाखळ्या या गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे जटील स्वरूपातील अन्नजाळी निर्माण होतात.

2)    कोणत्याही परिसंस्थेत अन्नसाखळी सरळ आणि एकरेषीय नसते. परन्तु त्यात खूप परस्परावलंबी नाती असतात. हे संबंध खूप जटील असतात.

3)    भक्ष खाणारा भक्षक एखादेवेळी दुसऱ्याच भक्षकांचे भक्ष्य ठरू शकतो.

4)    उदा: बेडूक हा भक्षक अनेक प्रकारचे कीटक खातो. पण त्याला साप खातो. साप हे पक्षाचे भक्ष ठरू शकते हाच पक्षी कीटक किंवा बेडूक देखील खाऊ शकतो. असा रीतीने परीसंस्थेतील जैविक घटकातील परस्पर संबंध अतिशय क्लिष्ट अन्नजाळी निमण करू शकतात.

 


4. शास्त्रीय कारणे द्या.


अ. परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

उत्तर :

1)    वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रीयेद्वारे स्वतः अन्ननिर्मिती करतात.

2)    सौर उर्जेचा वापर करून अन्न तयार करताना वनस्पती मातीतून असेन्द्रीय क्षार आणि पाणी यांचे शोषण करतात व सेंद्रिय अन्नपदार्थ तयार करतात.

3)    म्हणून परीसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

 

आ. मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात.

उत्तर :

1)    जेव्हा मोठी धरणे बांधली जातात, तेव्हा मुळातील भू-स्वरूप बदलले.

2)    धरणे बांधत असताना तेथील झाडे तोडली जातात. या जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात. बऱ्याचश्या प्रजाती या कारणांमुळे नष्ट झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर वनस्पती आणि प्राणी यांची हानी होते.

3)    साठवलेल्या पाण्याच्या दाबामुळे भूकंपाची शक्यता वाढते.

4)    धरणे बांधल्यामुळे तेथील माणसांच्या वसाहती आणि शेतीवाडी नष्ट होते.

5)    धरण बांधल्यामुळे नदीच्या खालच्या बाजूच्या पाण्याच्या प्रवाहात घट होते. त्यामुळे अगोदर असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात.

 

इ. दुधवा जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले.

उत्तर :

1)    खूप वर्षांपूर्वी दुधवा जंगलामध्ये एकशिंगी गेंड्याचे वास्तव्य होते. परंतु खूप वर्षे त्यांची शिकार झाल्यामुळे तेथील गेंडे नष्ट झाले.

2)    या गेंड्यांचे वास्तव्य पुन्हा होण्यासाठी त्यांचे पिंजऱ्यात प्रजनन करून त्या पिल्लांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

3)    वन्य जीवन मौल्यवान असते, म्हणून त्यांचे पूनर्वसन व्हावे यासाठी असे प्रयत्न करण्यात आले.

 


5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले?

उत्तर :

1)    परिसंस्थेमध्ये मानवप्राणी ‘भक्षक’ या गटात मोडतो.

2)    मानवाला लागणाऱ्या सगळ्या मुलभूत गरजा देखील परिसंस्थाच पुरवत असते. 

3)    परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानवाला अधिकाधिक साधनसंपदांची आवश्यकता निर्माण होते. लोकसंख्यावाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेतो.

4)    जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली त्यामुळे परिसंस्थावर ताण वाढला आहे.

5)    तसेच टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

6)    या साऱ्या गोष्टींमुळे परिसंस्थेवर ताण निर्माण होतो.

 

आ. परिसंस्थेच्या ऱ्हासास शहरीकरण कसे जबाबदार आहे?

उत्तर :

1)    ज्या वेळी लोकांना त्यांच्या गावात पुरेसे अन्न, पैसे किंवा इतर सोयी- सवलती मिळत नाहीत, अशा वेळी ते सुख-सोयींकरिता शहराकडे स्थलांतर करतात.

2)    शहरांमध्ये कारखाने, उद्योग इत्यादी असल्याने त्यांना उपजीविकेची चांगली साधने मिळतात. या शोधात दररोज अनेक लोक शहराकडे येतात त्यामुळे शहरीकरण होते.

3)    वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो आहे.

4)    यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात..

 


इ. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे का होतात?

उत्तर :

1)    काही राष्ट्रांमध्ये जमीन, पाणी खनिज संपत्ती अशा साधनसंपदांवरून वाद निर्माण होतात.

2)    काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा निर्माण होते.

3)    मतभेत विकोपाला गेल्यामुळे युद्धाला तोंड फुटते. धार्मिक आणि वांशिक कारणांनी देखील युद्धे केली जातात.

4)    युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणवर बॉम्ब वर्षाव व सुरुंगस्फोट केले जातात, त्यामुळे जागतिक पातळीवर शांतात नष्ट होते.

5)    जीवितहानी होते आणि नैसर्गिक परिसंस्थामध्ये मोठे बदल होतात. कधी कधी त्या नष्ट सुद्धा होतात.


इयत्ता आठवी विषय विज्ञान धडा 18 परिसंस्था स्वाध्याय | Parisanstha swadhyay | Samanya vidnyan iyatta aathvi prashn uttar



ई. परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा.

उत्तर :

१)    हवा, पाणी, मृदा, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता  इत्यादी अजैविक घटकांचा परीसंस्थेतील वनस्पती प्राणी आणि जीवाणू अशा जैविक घटकांवर परिणाम होतो.

२)   या जैविक घटकांची संख्या देखील अजैविक घटकांच्या गुणवत्तेवर आधारित असते.

३)   हे जैविक घटक अजैविक घटकांचे शोषण करतात किंवा परीसंस्थेमध्ये पुन्हा सोडतात. त्यामुळे अजैविक घटकांचे प्रमाण, जैविक घटकांमुळे घटत किंवा वाढत जाते.

४)  प्रत्येक जैविक घटक एखाद्या विशिष्ट व जैविक घटकांशी सतत आंतरक्रिया करीत असतो. तसेच तो इतर जैविक घटकांशी देखील आंतरक्रिया करीत असतो.

 

उ. सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा.

उत्तर :


गवताळ प्रदेश

सदाहरित जंगल

१.     पृथ्वीचा सुमारे  30% इतका भूभाग हा गवताळ प्रदेशांनी व्यापला आहे.

१.पृथ्वीचा सुमारे  7% इतका भूभाग हा सदाहरित  प्रदेशांनी व्यापला आहे.

२.    बहुसंख्य चारणारे प्राणी हे गवताळ प्रदेशमध्ये राहतात.

२.पृथ्वीवरचे जवळपास निम्मे भूचर प्राणी आणि जमिनीवरच्या वनस्पती सदाहरित जंगलांमध्ये असतात.

३.प्रतिवर्षी सुमारे २०-३५ इंच इतके सरासरी पर्जन्यमान गवताळ प्रदेशात असते.

३.प्रतिवर्षी सुमारे ७८-८०  इंचांपेक्षा जास्त  पर्जन्यमान सदाहरित जंगलांमध्ये असते.

४.गवताळ प्रदेशात अतिशय उंच गवत वाढते, ही मुख्यत्वे रान गवते असून एखादे झाड देखील या प्रदेशात दिसते.

४. विषुववृत्तीय सदाहरित जंगले ही घनदाट आणि अनेक थरांची असतात.

५. पृथ्वीवर अनेक ठिकाणी गवताळ प्रदेश आढळतात.

५.विषुववृत्तीय प्रदेशात अशा प्रकारची जंगले आढळतात.

                                     

 

6. खालील चित्रांचे वर्णन लिहा

उत्तर:

पहिले चित्र हे वाळवंटी परीसंस्थेचे आहे. या परीसंस्थेमध्ये निवडुंग ही वनस्पती उत्पादक आहे. तसेच पाम वृक्ष या ठिकाणी आढळतात. वाळवंटी प्रदेशात पाउस खूप कमी प्रमाणात पडतो त्यामुळे त्या ठिकाणी वनसृष्टी खूपच कमी प्रमाणात आढळते.  येथील मृदा ही वालुकामय असते. या प्रदेशात भक्षक देखील कमी प्रमाणात आढळतात.

उंट हा वाळवंटी प्रदेशातील प्राथमिक, शाकाहारी भक्षक आहे.

 

दुसऱ्या चित्र हे जंगल परीसंस्थेचे आहे. या चित्रामध्ये हत्ती , वाघ यांसारखे प्राणी आणि  महाकाय धनेश हा पक्षी देखील दिसत आहे. हे चित्र विषुववृत्तीय सदाहरित जंगलाचे उदाहरण असले पाहिजे. या प्रदेशातील पर्जन्यमान खूप जास्त असते. त्यामुळे या प्रदेशात विविध प्रकारच्या पाणथळ जागा निर्माण होतात.

दुसऱ्या चित्रामध्ये गवत व इतर झाडे ही उत्पादक आहेत. तळ्यातील छोटे मासे हे प्राथमिक भक्षक आहेत. या छोट्या माशांना मोठे मासे खातात म्हणून मोठे मासे द्वितीय भक्षक ठरतात.

 

 *****************

 १) आठवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

२) आठवी सर्व विषयांची पुस्तके  pdf

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.