1857 cha Swatantry ladha iyatta aathvi | १८५७ चा स्वातंत्र्यलढा स्वाध्याय इयत्ता ८वी इतिहास
इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | १८५७ चा स्वातंत्र्यलढा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी १८५७ चा स्वातंत्र्यलढा धडा पहिला स्वाध्याय | १८५७ चा स्वातंत्र्यलढा दाखवा
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(उमाजी नाईक, स्वातंत्र्यसमर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे)
(१)
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला.......... हे नाव दिले.
उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला स्वातंत्र्यसमर हे नाव दिले.
(२) रामोशी
बांधवांना संघटित करून .......... यांनी इंग्रजांविरुद्ध
बंड केले.
उत्तर: रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
(३) १८५७ च्या
लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी
.......... हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण
करण्यात आले.
उत्तर: १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारतमंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले
(४) भारतातील
संस्थाने ........... या गव्हर्नर जनरलने
खालसा केली.
उत्तर: भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
8th std history digest pdf Maharashtra board | 8vi 1857 cha Swatantry ladha prashn uttare | Itihas swadhyay 8th | 1857 cha Swatantry ladha swadhyay
प्रश्न २. पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
उत्तर:
१) इ.स. १८०३ मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले.
२) इंग्रजांनी पाइकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या. त्यामुळे पाइक संतापले.
३) तसेच इंग्रजांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले.
४) याचा परिणाम इ.स.१८१७ मध्ये इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला.
(२) हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
उत्तर:
१) ब्रिटिशांनी १८५६ साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या.
२) या बंदुकांमध्ये वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली.
३) यामुळे हिंदू व मुस्लीम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
(३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही
उत्तर:
१) भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु अद्ययावत शस्त्रास्त्रे नव्हती.
२) इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद होती आणि अनुभवी सेनानी होते.
३) भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत.
४) दळणवळणाचा ताबा इंग्रजांच्या हातात असल्यामुळे इंग्रज सैन्याच्या हालचाली जलद होत असत.
यामुळेच भारतीय सैनिकांचा त्यांच्यापुढे निभाव लागला नाही.
(४) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.
उत्तर:
१) १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिशांनी लष्कराची पुनर्रचना केली.
२) भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.
३) सर्व जातींचे सैन्य एकत्र आल्यास त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण होऊन पुन्हा उठाव होण्याची भीती इंग्रजांना वाटत होती.
४) त्यामुळे जातवार लष्करी तुकड्यांची विभागणी करून भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेतली.
(५) इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले.
उत्तर:
१) इंग्रजांनी आपल्या देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अमलात आणली.
२) शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची. पर्यायाने शेतीव्यवस्था कोलमडून पडली.
३) इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. म्हणून त्यांनी येथील उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले.
४) या धोरणामुळे भारतीय उद्योग बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस येऊ लागला.
प्रश्न ३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) १८५७ च्या
स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे
होती ?
उत्तर: १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे पुढील सामाजिक कारणे होती :
१) इंग्रज आपल्या चालीरिती, परंपरा, रूढी यांत हस्तक्षेप करत आहेत, असे भारतीयांना वाटू लागले.
२) सतीबंदी, विधवाविवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले, तरी ते आपल्या जीवनपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली.
१८५७ चा स्वातंत्र्यलढा दाखवा इयत्ता आठवी विषय इतिहास धडा चौथा प्रश्न उत्तरे
१८५७ चा स्वातंत्र्यलढा प्रश्न उत्तरे | स्वाध्याय १८५७ चा स्वातंत्र्यलढा ८वी इतिहास
(२) १८५७ च्या
स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले?
उत्तर: १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश आले कारण :
१) लढ्याचा प्रसार एकाचवेळी भारतभर झाला नाही.
२) राजपुतना, बंगाल, दक्षिण आणि ईशान्य भारत लढ्यापासून लांब राहिला.
३) लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही, त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात एकसंधपणा आला नाही.
४) भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यात अयशस्वी ठरले.
५) दळणवळणाचा ताबा इंग्रजांच्या हातात असल्यामुळे सैन्याच्या जलद हालचाली त्यांना करता आल्या नाहीत.
(३) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा.
उत्तर: १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे पुढील परिणाम झाले:
१) ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली व त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे १८५७ च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली.
२) भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही, असे वाटल्यामुळे १८५८ साली ब्रिटिश पार्लमेंट ने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली आणि भारताचा कारभार आपल्या हाती घेतला.
३) इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली.
(४) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले?
उत्तर: १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी पुढील धोरणात्मक बदल केले:
१) भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले.
२) त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला सुरुवात केली.
३) भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील, एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवले जाऊ लागले.
४) ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरणसुत्र ठरवले गेले.