8th class geography chapter 3 question answer in marathi | इयत्ता आठवी आर्द्रता व ढग स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा ३ | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | आर्द्रता व ढग स्वाध्याय ८वी | आर्द्रता व ढग स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न १. योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा.
अ |
ब (उत्तरे) |
क (उत्तरे) |
(अ)
सिरस |
(ii) जास्त उंचीवरील |
(d) हिमस्फटिक ढग |
(आ)
क्युम्युलो निम्बस |
(i) आकाशात उभा विस्तार |
(a) गरजणारे ढग |
(इ)
निम्बो स्ट्रेटस |
(iv) कमी उंचीवरील |
(c) रिमझिम पाऊस |
(ई)
अल्टो क्युम्युलस |
(iii) मध्यम उंचीवरील |
(b) तरंगणारे ढग |
प्रश्न २. कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा.
(क्युम्युलो
निम्बस,
सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता)
(अ) हवेची
..................... हवेच्या तापमानावर अवलंबून
असते.
उत्तर: हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
(आ) एका
घनमीटर हवेमध्येकिती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून
.............. काढली जाते.
उत्तर: एका घनमीटर हवेमध्येकिती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते.
(इ) वाळवंटी
प्रदेशात …………… कमी असल्याने हवा कोरडी असते.
उत्तर: वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते.
(ई) .............
प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.
उत्तर: क्युम्युलो निम्बस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत.
(उ) मोकळ्या
वातावरणातील हवेच्या बाष्पाचे ........ वातावरणातील धूलिकणांभोवती होते.
उत्तर: मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणांभोवती होते.
प्रश्न ३. फरक स्पष्ट करा.
(अ) आर्द्रता व ढग
आर्द्रता |
ढग |
१.हवेतील बाष्पामुळे हवेला प्राप्त झालेला ओलसरपणा
किंवा कोरडेपणा म्हणजेच आर्द्रता होय. |
१.वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धूलीकणाभोवती
एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय. |
२.हवेतील आर्द्रता अदृश्य स्वरुपात असते. |
२.ढग हे दृश्य स्वरुपात असतात. |
(आ) सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता
सापेक्ष आर्द्रता |
निरपेक्ष आर्द्रता |
१.एका विशिष्ट तापमानाला एक घमी. हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच
तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. |
१.एका विशिष्ट तापमानाला एक घमी. हवेमध्ये असणारे ग्रॅममधील
बाष्पाचे प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. |
२. सापेक्ष आर्द्रता (% )= निरपेक्ष आर्द्रता /बाष्पधारण क्षमता X
१०० |
२. नीरपेक्ष आर्द्रता (% )= बाष्पाचे प्रमाण /हेवेचे घनफळ |
इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | आर्द्रता व ढग स्वाध्याय ८वी | आर्द्रता व ढग स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf
(इ) क्युम्युलस ढग व क्युम्युलो निम्बस ढग
क्युम्युलस ढग |
क्युम्युलो निम्बस ढग |
१. भूपृष्ठापासून ५०० ते ६०००
मीटर उंचीच्या दरम्यान तुलनेने कमी उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. |
१. भूपृष्ठापासून ५०० ते ६००० मीटर उंचीच्या
दरम्यान तुलनेने अधिक उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. |
२. क्युम्युलस ढग हे आल्हाददायी हवेचे निदर्शक
असतात. |
२. क्युम्युलो निम्बस ढग हे बदलाचे निदर्शक
असतात. |
8th class bhugol chapter 3 question answer in marathi | Aardrata v dhag swadhyay | 8th bhugol swadhyay
प्रश्न ४. प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) एखाद्या
प्रदेशातील हवा कोरडी का असते?
उत्तर:
१) हेवेमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील हवा ही कोरडी असते.
(आ)
आर्द्रतेचे मापन कसे केले जाते?
उत्तर:
१) एका विशिष्ट तापमानाला एक घमी. हवेमध्ये असणारे ग्रॅममधील बाष्पाचे प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय.
२) निरपेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राने केले जाते:
नीरपेक्ष आर्द्रता (% )= बाष्पाचे प्रमाण /हेवेचे घनफळ
३) एका विशिष्ट तापमानाला एक घमी. हवेची निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय.
४) सापेक्ष आर्द्रतेचे मापन पुढील सूत्राने केले जाते:
सापेक्ष आर्द्रता (% )= निरपेक्ष आर्द्रता /बाष्पधारण क्षमता X १००
(इ)
सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
उत्तर: सापेक्ष
आर्द्रता वाढणे आणि त्याच वेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे या गोष्टी सांद्रीभवनासाठी
आवश्यक आहेत.
(ई) ढग म्हणजे
काय?
ढगांचे प्रकार लिहा.
उत्तर:
१) वातावरणातील बाष्पकण किंवा हिमकण हवेतील धूलीकणाभोवती एकत्र येऊन तयार झालेला मोठा समुच्चय म्हणजे ढग होय.
२) ढगांचे पुढील प्रकार पडतात:
१] जास्त उंचीवरील ढग : या ढगांची उंची ७००० ते १४०००मी इतकी असते. सिरस , सिरो स्ट्रँटस ,सिरो क्युम्युलस यांना जास्त उंचीवरील ढग म्हणतात.
२] मध्यम उंचीवरील ढग : या ढगांची उंची २००० ते ७००००मी इतकी असते. स्ट्रॅटो क्युमुलस , स्ट्रॅटस , निम्बो स्ट्रॅटस यांना मध्यम उंचीवरील ढग म्हणतात.
३] कमी उंचीवरील ढग : या ढगांचा विस्तार कमी जास्त असू शकतो. स्ट्रॅटो , क्म्युलोयु निम्बस यांना कमी उंचीवरील ढग म्हणतात.
(उ)
कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो?
उत्तर: निम्बो
स्ट्रॅटस आणि क्म्युलोयु
निम्बस या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो.
(ऊ) सापेक्ष
आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे?
उत्तर: एका विशिष्ट तापमानाला विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानाला त्या हवेची बाष्पधारण क्षमता या बाबींशी सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी संबंधित आहे.
प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) ढग हे आकाशात तरंगतात.
उत्तर:
१) वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते आणि ढग तयार होतात.
२) सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात
(आ) उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो.
उत्तर:
१) समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात तापमान जास्त असते त्यमुळे हेवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते. त्यामुळे समुद्र सपाटीजवळ हवेतील आर्द्रता तुलनेने जास्त असते.
२) पर्वतीय प्रदेशमध्ये जास्त उंचीवर तापमान कमी असते. तापमान कमी असते त्यमुळे हेवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे समुद्र सपाटीजवळ हवेतील आर्द्रता तुलनेने कमी असते.
अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होत जातो.
(इ) हवा बाष्पसंपृक्त बनते.
उत्तर:
१) हवेची बाष्पधारण क्षमता आणि हवेतील बाष्पाचे प्रमाण हे एका विशिष्ट तापमानाला सारखेच होऊन शकते.
२) अशा स्थितीमध्ये हवा अतिरिक्त बाष्प धारण करू शकत नाही. अशा प्रकारे हवा बाष्पसंपृक्त बनते.
(ई) क्युम्युलस ढगांचे क्युम्युलो निम्बस ढगात रूपांतर होते.
उत्तर:
१) भूपृष्ठापासून सुमारे ५०० ते ६०० मित्र उंचीच्या दरम्यान क्युम्युलस ढगांचा उभा विस्तार असतो.
२) या ढगांचा उभा विस्तार काही प्रसंगी वाढतो. उभ्या विस्तारामध्ये वाढ झाल्यामुळे क्युम्युलस ढगांचे क्युम्युलो निम्बस ढगात रूपांतर होते.
Aardrata v dhag prashn uttar - 8th class bhugol chapter 3 swadhyay marathiइयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा ३ - इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf
प्रश्न ६. उदाहरण सोडवा.
(अ) हवेचे
तापमान ३०° से असताना तिची बाष्पधारण क्षमता ३०.३७ ग्रॅम/मी३
असते. जर निरपेक्ष आर्द्रता १८ ग्रॅम
प्रतिघनमीटर असेल, तर सापेक्ष आर्द्रता किती
असेल?
उत्तर:
सापेक्ष आर्द्रता
(% )= निरपेक्ष आर्द्रता /बाष्पधारण क्षमता X १००
= १८.०० / ३०.३७
X १००
= १८०० / ३०.३७
= ५९.२६ %
(आ) एक घनमीटर
हवेत ०°
से तापमानावर ४.०८ ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती
असेल?
उत्तर:
नीरपेक्ष
आर्द्रता (% )= बाष्पाचे प्रमाण / हवेचे
घनफळ
= ४.०८ / १
= ४.०८ ग्रॅम/घमी.
समाप्त
हे सुद्धा पहा :