भूमी उपयोजन स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Bhumi Upyojan Swadhyay 8vi Bhugol Swadhyay

8th class geography chapter 6 question answer in marathi | इयत्ता आठवी भूमी उपयोजन स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 6 | इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | भूमी उपयोजन स्वाध्याय ८वी | भूमी उपयोजन स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf


प्रश्न १. खालील विधाने तपासा. अयोग्य विधान दुरुस्त करा.

 

(अ) खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही.

उत्तर: अयोग्य

खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे.

 

(आ) केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात.

उत्तर: अयोग्य

केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका, कार्यालये असतात.

 

(इ) नागरी वस्तीत सर्वांत जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते.

उत्तर: योग्य

 

(ई) ग्रामसेवक सातबाराचा (७/१२) उतारा देतो.

उत्तर: अयोग्य

तलाठी सातबराचा उतारा देतो.

 

(उ) ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते.

उत्तर: अयोग्य

ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला मर्यादित जमीन असते.

 

8th class bhugol chapter 6 question answer in marathi Bhumi Upyojan swadhyay 8th bhugol swadhyay Bhumi Upyojan prashn uttar 8th class bhugol chapter 6 swadhyay marathi

(ऊ) उतारा क्रमांक ७ हे अधिकार पत्रक आहे.

उत्तर: योग्य

 

(ए) उतारा क्रमांक १२ हे फेरफार पत्रक आहे.

उत्तर: अयोग्य

उतारा क्रमांक १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.

 

8th class bhugol chapter question answer in marathi | Bhumi Upyojan swadhyay | 8th bhugol swadhyay

प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.

 

(अ) नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

उत्तर:

1) लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यशासन किंवा केंद्रशासन करते.

2) या सेवा पूरवण्यासाठी वापरण्यात आलेली शहरांतील जमीन / क्षेत्र म्हणजे सार्वजनिक सेवांचे क्षेत्र होय.

3) रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राऊंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी. सुविधा पुरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो. सार्वजनिक सुविधा क्षेत्रामुळे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे समाज कल्याणात भर पडते. अशा प्रकारे, नागरी भागामध्ये सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते.

 

(आ) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंदही केली जाते.

उत्तर:

1) शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद मिळकत पत्रीकेच्या माध्यमातून केली जाते.

2) मिळकत पत्रिकेच्या माध्यामतून मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगरभूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते. सिटी सर्व्हे क्रमांक, अंतिम प्लॅाट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी. माहिती मिळते.

अशा प्रकारे शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणे बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते.


 

(इ) भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.

उत्तर:

1) शेतजमीन, माळरान या प्रकारातील भूमी उपयोजन एखाद्या देशात जास्त असेल तर अशा देशाचा समावेश विकसनशील देशामध्ये होतो.

2) औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र , मोनोरंजन क्षेत्र या प्रकारातील भूमी उपयोजन एखाद्या देशात जास्त असेल तर अशा देशाचा समावेश विकसित देशांमध्ये होतो.

अशा प्रकारे भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते.


Bhumi Upyojan prashn uttar | 8th class bhugol chapter 6 swadhyay marathi

 हे सुद्धा पहा :


प्रश्न ३. उत्तरे लिहा.

 

(अ) ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते?

उत्तर:

1) ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.

2) ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते. म्हणून, ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्वाची असते.

 


(आ) भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा.

उत्तर:

१] ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक

१) हवामान, मृदा, जमिनीच्या उताराचे स्वरूप, सरकारी धोरण, नैसर्गिक साधनसंपत्ती, जलसिंचनाच्या सुविधा इत्यादी घटक ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करतात.

२) उदा. तीव्र उताराच्या जमिनीचे निवासासाठी उपयोजन केले जात नाही, अशा जमिनीचे पायऱ्यांच्या शेतीसाठी उपयोजन केले जाते.

२]नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक

१) नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकिकरण, वाहतूक मार्ग, व्यापार, भूक्षेत्राचे स्थान, क्रीडांगण , सरकारी धोरण इत्यादी घटक नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करतात.

२) उदा. सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक, बाजारपेठा यांपासून जवळचे स्थान असणाऱ्या भूक्षेत्राचे सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी जास्तीत जास्त उपयोजन केले जाते.

 

(इ) ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा.

उत्तर:

ग्रामीण भूमी उपयोजन

नागरी भूमी उपयोजन

१.ग्रामीण भागातील भूमीचे मर्यादित कारणांसाठी उपयोजन केले जाते.

१. नागरी भागातील भूमीचे विविध कारणांसाठी उपयोजन केले जाते.

२.ग्रामीण भूमी उपयोजनाचा आकृतीबंध साधा असतो.

२. नागरी भूमी उपयोजनाचा आकृतीबंध जटील असतो.

३. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती क्षेत्राला खूप महत्व असते.

३. नागरी भूमी उपयोजनात निवास क्षेत्र व व्यावसायिक क्षेत्र यांना खूप महत्व असते.

 

 

भूमी उपयोजन स्वाध्याय ८वी | भूमी उपयोजन स्वाध्याय प्रश्न उत्तरे | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf

 

(ई) सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिका यांतील फरक स्पष्ट करा

उत्तर:

सातबारा उतारा

मिळकत पत्रिका

१.शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत सातबारा दिला जातो.

१. शासकीय नगर भूमापन विभागामार्फत मिळकत पत्रिका दिली जाते.

२.सातबारा उतारा अप्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवतो.

२. मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते.

 

 

                        समाप्त

  हे सुद्धा पहा :



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.