British Satteche Parinam swadhyay iyatta aathvi | ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय इयत्ता ८वी इतिहास
British Satteche Parinam swadhyay 8vi | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | ब्रिटिश सत्तेचे परिणाम प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी ब्रिटिश सत्तेचे परिणाम धडा ३रा स्वाध्याय
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) पोर्तुगीज, ...........
, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
(अ) ऑस्ट्रियन
(ब) डच
(क) जर्मन
(ड) स्वीडीश
उत्तर:
पोर्तुगीज, डच , फ्रेंच,
ब्रिटिश हे भारताची
बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
(२) १८०२
मध्ये ......... पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(अ) थोरले
बाजीराव
(ब) सवाई
माधवराव
(क) पेशवे
नानासाहेब
(ड) दुसरा
बाजीराव
उत्तर: १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(३) जमशेदजी टाटा यांनी ........... येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
(अ) मुंबई
(ब) कोलकाता
(क) जमशेदपूर
(ड) दिल्ली
उत्तर: जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
ब्रिटिश सत्तेचे परिणामस्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय इतिहास धडा तिसरा प्रश्न उत्तरे
ब्रिटिश सत्तेचे परिणामप्रश्न उत्तरे \ स्वाध्याय ब्रिटिश सत्तेचे परिणाम ८वी इतिहास
प्रश्न २. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही
उत्तर:
१)राज्यकर्त्यांना
राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी
यंत्रणा उभी केलेली असते, तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात.
२) भारतात
इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड
कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली.
३)
प्रशासनाच्या सोईसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली
जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख
नेमला.
४) नोकरशाही
साठी नियम घालून देण्यात आले. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक
बनला.
(२) शेतीचे व्यापारीकरण
उत्तर:
१)पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे.
२) कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले.
३) अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, त्या प्रक्रियेला ‘शेतीचे व्यापारीकरण’ असे म्हणतात.
(३) इंग्रजांची आर्थिक धोरण
उत्तर:
१) इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली.
२) उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली.
३) रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली गेली.
४) अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला.
५) तसेच भारतातून बाहेर जाणाऱ्या मालावर कमी कर आणि इंग्लड वरून भारतात येणाऱ्या मालवार जास्त कर आकारले जाऊ लागले.
8th std history digest pdf Maharashtra board | 8vi British Satteche Parinam prashn uttare
Itihas swadhyay 8th | British Satteche Parinam swadhyay 8vi
प्रश्न ३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
उत्तर:
१) रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली गेली आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्यचा नियम सरकारने केला.
२) नव्या जमीन महसूलव्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले.
३) शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले.
४) व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले.
५) प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले.
(२) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
उत्तर:
१) भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येत असे.
२) इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होत असे.
३) अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले.
४) परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले .
प्रश्न ४. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
व्यक्ती |
कार्य |
लॉर्ड कॉर्नवालिस |
भारतात नोकरशाहीची निर्मिती केली. |
लॉर्ड बेंटिंक |
सतीबंदीचा कायदा केला. |
लॉर्ड डलहौसी |
दत्तक विधान मंजूर करून संस्थाने
खालसा केली. |
विल्यम जोन्स |
‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ची स्थापना |