२.युरोप आणि भारत स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Europ aani Bharat swadhyay prashn uttare iyatta 8vi etihas.

Europ aani Bharat swadhyay iyatta aathvi | युरोप आणि भारत स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास

Itihas swadhyay 8th | Europ aani Bharat Swadhyay prashn uttare | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | युरोप आणि भारत प्रश्न उत्तरे


प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने  पुन्हा लिहा.

 

(१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी .............  हे शहर जिंकून घेतले.

(अ) व्हेनिस

(ब) कॉन्स्टॅन्टिनोपल

(क) रोम

(ड) पॅरिस

उत्तर: इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल  हे शहर जिंकून घेतले.

 

युरोप आणि भारत प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी युरोप आणि भारत धडा दुसरा  स्वाध्याय युरोप आणि भारत स्वाध्याय दाखवा इयत्ता आठवी विषय इतिहास धडा दुसरा  प्रश्न उत्तरे इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे स्वाध्याय युरोप आणि भारत ८वी इतिहास


(२) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ......... मध्ये झाला.

(अ) इंग्लंड

(ब) फ्रान्स

(क) इटली

(ड) पोर्तुगाल

उत्तर: औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंड मध्ये झाला.


 

(३) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ........... याने केला.

(अ) सिराज उद्दौला

(ब) मीर कासीम

(क) मीर जाफर

(ड) शाहआलम

उत्तर: इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासीम याने केला.

 


युरोप आणि भारत स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय इतिहास धडा दुसरा  प्रश्न उत्तरे | इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे | स्वाध्याय युरोप आणि भारत ८वी इतिहास

२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.


(१) वसाहतवाद

उत्तर:

१) आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेचवसाहतवाद’ होय.

२) युरोपीय देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून त्या ठिकाणची सत्ता बळकावून त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या.

३)   युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला.

 

(२) साम्राज्यवाद

उत्तर:

१) विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेचसाम्राज्यवाद’ होय.

२)आपल्या राज्याच्या भौगोलिक सिमेपलीकडील अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय.

३)आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली.

४) औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद मोठ्या प्रमाणवर वाढीस लागला आणि विसाव्या शतकात साम्राज्यवादाचा अंत झाला.

 

(३) प्रबोधनयुग

उत्तर:

१)    युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते.

२)   या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’ असे म्हणतात.

३) प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले.

४) प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

५)  प्रबोधन काळात धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.



(४) भांडवलशाही

उत्तर:

१) ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात, त्या अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात.

२) या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल, श्रमिक आणी उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.

३)   अधिकाधिक नफा मिळवणे, हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट्ये असते.\

४) व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.

 


 

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

 

(१) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव  झाला

उत्तर:

१) सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला.

२)   रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले.

३)   इ.स.१७५७ मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली.

४) परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला.

 

 

Europ aani Bharat Swadhyay prashn uttare | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | युरोप आणि भारत प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी युरोप आणि भारत धडा दुसरा  स्वाध्याय

(२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.

उत्तर:

१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले.

२)   या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात होते.

३) तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.

 

(३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी  संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.

उत्तर:

१) नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.

२)   सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले.

३) मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला.

४) यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या.

५)  पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे.

६) त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.

 


४.पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.

 

उत्तर:

 

दर्यावर्दी

कार्य

बार्थोलोम्यू डायस

आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत  पोहचला.

ख्रिस्तोफर कोलंबस

भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावपोहचला.

वास्को- द-गाम

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील

कालिकत बंदरात पोहचला.

  


युरोप आणि भारत स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय इतिहास धडा दुसरा  प्रश्न उत्तरे | इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे | स्वाध्याय युरोप आणि भारत ८वी इतिहास

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.