१.इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Itihasachi Sadhane Swadhyay Prashn Uttare iyatta 8vi etihas.

8vi itihasachi sadhane prashn uttare Itihas swadhyay 8th इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी इतिहासाची साधने
Admin

Itihasachi Sadhane swadhyay iyatta aathvi | इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास

8vi itihasachi sadhane prashn uttare | mItihas swadhyay 8th | इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf | इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे


प्रश्न १.    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.


(१) इतिहासाच्या साधनांमधील .......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

(अ) लिखित

(ब) मौखिक

(क) भौतिक

(ड) दृक्-श्राव्य

उत्तर: (ड) दृक्-श्राव्य

 

8th std history digest pdf Maharashtra board 8vi itihasachi sadhane prashn uttare Itihas swadhyay 8th इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे

 

(२) पुण्यातील .......... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.

(अ) आगाखान पॅलेस

(ब) साबरमती आश्रम

(क) सेल्युलर जेल

 (ड) लक्ष्मी विलास पॅलेस

उत्तर: (अ) आगाखान पॅलेस

 

(३) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे .......... होय.

(अ) पोवाडा

(ब) छायाचित्र

(क) मुलाखती

(ड) चित्रपट

उत्तर: (ड) चित्रपट

 

 

इयत्ता आठवी इतिहासाची साधने धडा पहिला स्वाध्याय | इतिहासाची साधने स्वाध्याय दाखवा | इयत्ता आठवी विषय इतिहास धडा पहिला प्रश्न उत्तरे | इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे

प्रश्न २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.

उत्तर:

१)    ब्रिटीशकाळात वृत्तपत्रांनी साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना लोकशिक्षण तसेच लोकजागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले.

२)   वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील दुष्ट चालीरीती आणि रूढीपरंपरा यांच्यावर टीका करण्यात आली.

३)   स्त्रियांवर होणारे अत्याचार, बालविवाह, विधवा पुनर्विवाह यांसारख्या सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले गेले.

४) वृत्तपात्रांच्या माध्यामतून इंग्रजांनी केलेल्या जुलमाबद्दल लिखाण करत असतानाच, पाश्चात्य विद्या, स्वातंत्र्य आणि समता तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन यांसारख्या मूल्यांचे महत्व देखील पटवून दिले.

            म्हणून , ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती.

 

 

(२) चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली  जातात.

उत्तर:

१)    चित्रफितीमुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या रुपात आपल्याला आज पाहायला मिळतात.

२)   भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत.

            म्हणून , चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली  जातात.

 

 

३. टीपा लिहा.


(१) छायाचित्रे

उत्तर:

१)    छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणांस व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले, त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते.

२)   मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत.

३)   व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते.

४) प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो.

५)  वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे त्या वेळीचे स्वरूप लक्षात येते.

 

8th std history digest pdf Maharashtra board | 8vi itihasachi sadhane prashn uttare | Itihas swadhyay 8th

(२)वस्तुसंग्रहालये आणि इतिहास

उत्तर:

१) ज्या ठिकाणी प्राचीन नाणी, वस्त्रे, भांडी, वस्तू, कागदपत्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात, अशा संग्रहाला ‘वस्तूसंग्रहालय’ असे म्हणतात.

२) या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपल्याला तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासाबाबत माहिती मिळते.

३)   वास्तूच्या स्वरूपावरून त्या वेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते.

४)  शिल्पकला, चित्रकला, धातुकला यांसारख्या कलांमधील त्या काळातील प्रगती समजते.

            वस्तुसंग्रहालये आणि इतिहास यांचा एकमेकांशी निकट संबंध आहे. इतिहास लेखनाचे ते एक महत्वाचे साधन आहे.

 

 

(३) श्राव्य साधने

उत्तर:

१)    ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स  इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत.

२) आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत.

३) आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच इतर महत्वाची भाषणे ध्वनीमुद्रित उपलब्ध आहेत, हे ध्वनीमुद्रित साहित्य इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरते.

४) या श्राव्य साधनाच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाबाबत माहिती उपलब्ध होते.



४. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा


भौतिक साधने

उत्तर:

१)    इमारती

२)   रस्ते

३)   पूल

४) पुतळे

५)  राजवाडे

६)   तुरुंग

७) स्मारके

८)  नाणी


इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे| इयत्ता आठवी इतिहासाची साधने धडा पहिला स्वाध्याय | इतिहासाची साधने स्वाध्याय दाखवा

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.